Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest निबंध लेखन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

12th Marathi Guide निबंध लेखन Textbook Questions and Answers

कृती

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

प्रश्न 1.
वर्णनात्मक निबंध-
पहाटेचे सौंदर्य.
आमची अविस्मरणीय सहल.
उत्तर :
वर्णनात्मक निबंध दैनंदिन जीवनात आपण पाहिलेल्या व्यक्तींचे, प्रसंगांचे, दृश्यांचे किंवा वस्तूंचे शब्दांनी केलेले प्रत्ययकारक चित्रण म्हणजे वर्णनात्मक निबंध होय.

वर्णिलेल्या प्रसंगांतील, दृश्यांतील, मानवी स्वभावांतील बारकाव्यांचा तपशील येणे वर्णनात्मक निबंधात आवश्यक असते. समजा, आपण एखादया व्यक्तीचे वर्णन करीत आहोत; अशा वेळी त्या निबंधात त्या व्यक्तीच्या सद्गुणांचे वर्णन येणारच. पण त्याचबरोबर (त्या व्यक्तीमधील उणिवाही सांगितल्या पाहिजेत. तसेच, तिच्या हालचाली, लकबी, सवयी यांतील बारकावे सांगितले पाहिजेत. म्हणजे ती व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते. असे लेखन घडले, तर तो चांगला वर्णनात्मक निबंध ठरेल.

व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणेच वस्तू, ठिकाण, दृश्य, प्रसंग यांचेही हुबेहूब, प्रत्ययकारी वर्णन लिहिता आले पाहिजे. ती वस्तू , ते ठिकाण आपण समोर उभे राहून पाहत आहोत, असा प्रत्यय आला पाहिजे. प्रत्ययकारकता हा वर्णनात्मक निबंधाचा प्राण आहे.

नोंद : येथे निबंधात विदयार्थ्यांच्या मार्गदर्शनार्थ मुद्दे दिलेले आहेत. परीक्षेत केवळ निबंधांचे विषय देण्यात येतात, याची नोंद घ्यावी.

वर्णनात्मक निबंधाचा एक नमुना :

घरातील एक उपद्रवी कीटक

[मुद्दे : उपद्रवकारक कीटकांचा प्राथमिक परिचय – त्रासाचे स्वरूप – कीटकांविषयी कुतूहल – कीटकांचे स्थूल स्वरूप – वागण्याची वैशिष्ट्यपूर्ण रीत – कीटकांपासून होणारा महत्त्वाचा त्रास – त्या कीटकांची पैदास – त्या कीटकांच्या निर्मूलनाचा मार्ग.]

माशी ही परमेश्वराप्रमाणे सर्वव्यापी व सर्वसंचारी आहे. कोठेही जा. तुम्हांला माशी आढळणारच. मी तरी माशी नसलेले ठिकाण अजून पाहिलेले नाही. माझ्या मते, माणसाला उपद्रव देणाऱ्या कीटकांमध्ये, माशीचा पहिला क्रमांक लागतो. डास त्रासदायक आहे, यात शंकाच नाही. पण त्याच्यापेक्षा माशी अधिक त्रासदायक आहे, असे माझे ठाम मत आहे. डासांना अटकाव करण्यासाठी वा त्यांना मारण्यासाठी औषधे, फवारण्या व अगरबत्त्या बाजारात मिळतात. पण माश्यांविरुद्ध असे काही उपाय केले जात असल्याचे दिसत नाही.

माश्या आणि उपद्रव या दोन्ही बाबी सोबत सोबतच असतात. डासांप्रमाणे माश्या चावत नाहीत. काही रोगांशी डासांचा संबंध घट्ट जोडला गेला आहे. तसे माश्यांबाबत नाही. म्हणून माश्या निरुपद्रवी वाटत असाव्यात. आणि माश्यांना बहुधा हे कळले असावे. त्यामुळे त्या एकदम अंगचटीलाच येतात. त्यांना हाकलण्याचा कितीही प्रयत्न करा; त्या तात्पुरत्या सटकतात आणि पुन्हा पुन्हा अंगावर येतात. आपण एकाग्रतेने अभ्यासाला बसावे किंवा निवांतपणे टीव्ही पाहत असावे, तर माशीचा फेरा सुरू झालाच म्हणून समजा.

आपण तिला अगदी अव्वल गुप्तहेराच्या चतुराईने मारण्याचा प्रयत्न केला, तरी ती तावडीत सापडत नाहीच. त्यानंतर ती परत येऊन बसते कुठे? तर पाठीवर, मानेवर वा कपाळावर अशा आपल्याला न दिसणाऱ्या जागेवर! मग तिला फक्त निकराने हाकलतच राहावे लागते. ती मात्र सुरक्षितरीत्या पळत राहते, एखादया कुशल खो – खो खेळाडूप्रमाणे! अशा वेळी ती आपल्याला कुत्सितपणे हसत असणार, असे अनेकदा माझ्या मनात येऊन गेले आहे. ती चावत नाही; पण सारखी सुळसुळत राहते. त्यामुळे चित्त विचलित होत राहते. चैन पडत नाही. आपण एकाग्रतेने काहीही करू शकत नाही. मन अस्वस्थ होते आणि मनाची चिडचिड चिडचिड होते!

खरे पाहता, माशीच्या आकाराच्या तुलनेत आपण म्हणजे महाकाय, अक्राळविक्राळ राक्षसच! तरीही ती आपल्याला घाबरत कशी नाही? पुन्हा पुन्हा अंगावर येऊन बसते कशी? प्रत्येक वेळी ती यशस्वीरीत्या सटकते कशी? याचे मला प्रचंड कुतूहल होते. हे कुतूहल मला काही केल्या गप्प बसू देईना. मग मी मराठी विश्वकोश उघडला. त्यातील माशीची माहिती वाचली आणि थक्कच झालो. तिच्या सुरक्षितरीत्या पळण्याचे रहस्यच मला उलगडले.

माशीच्या डोक्यावर दोन मोठे टपोरे डोळे असतात. त्या डोळ्यांत प्रत्येकी चार हजार नेत्रिका असतात. नेत्रिका म्हणजे काय माहीत आहे का? आपण सूक्ष्मदर्शक उपकरणाच्या साहाय्याने अत्यंत लहान, सूक्ष्म वस्तू मोठी करून पाहतो. सूक्ष्मदर्शकाच्या ज्या भिंगातून आपण पाहतो, त्या भिंगाला नेत्रिका म्हणतात. म्हणजे आठ हजार भिंगांमधून माशी भोवतालचा परिसर पाहते. शिवाय तिला आणखी तीन साधे डोळे असतातच. त्यामुळे माशी मान न हलवता एकाच क्षणी सर्व दिशांनी भोवताली पाहू शकते. लक्षात घ्या – आपल्याला फक्त समोरचेच दिसते. माशीला मात्र हालचाल न करता सगळीकडचे दिसते. म्हणूनच तिला कोणत्याही दिशेने येणाऱ्या संकटाची चाहूल तत्काळ लागते आणि ती त्वरेने पळ काढू शकते.

एकदा दुपारी मी शाळेतून घरी आलो आणि समोरचे दृश्य पाहून चकितच झालो. एका बशीच्या काठावर माश्या ओळीने गोलाकार बसल्या होत्या – उंच टांगलेल्या केबलवर कावळे ओळीने बसतात तशा. गुपचूप बाजूला झालो. माझ्या काकांचे मोठे बहिर्गोल भिंग घेऊन आलो आणि त्या भिंगातून माश्यांचे निरीक्षण करू लागलो.

प्रत्येक माशीला सहा पाय होते. सर्व माश्या सहाही पायांवर उभ्या होत्या. मधूनमधून पुढचे दोन पाय वर उचलून ते हातासारखे वापरत होत्या. ” कधी दोन्ही हात एकमेकांवर घासायच्या; तर कधी चेहऱ्यावरचे पाणी निपटून टाकावे त्याप्रमाणे चेहऱ्यावरून हात फिरवायच्या. जणू त्यांचा स्वच्छतेचा कार्यक्रम चालू होता! मला हसूच येऊ लागले. कुजलेले पदार्थ, शेण, लीद, मलमूत्र, गटारे अशा ठिकाणी रममाण होणाऱ्या आणि तिथेच अंडी घालणाऱ्या या माश्या स्वच्छता करीत होत्या!

त्यांच्या पायांवर दाट केस होते. या केसांत अक्षरश: लाखो सूक्ष्म रोगजंतू घर करून राहतात. त्या आपल्या अन्नपदार्थांवर येऊन बसतात. मग ते रोगजंतू आपल्या अन्नात मिसळतात. आपल्याला कॉलरा, हगवण, टायफॉईड यांसारख्या रोगांची लागण होते. आपल्या देशात या रोगांमुळे काही हजार माणसे दरवर्षी दगावतात. केवढा हा माश्यांचा उपद्रव!

माश्यांच्या उपद्रवामुळे मी त्यांचा बारकाईने विचार केला आहे. मला एक शोध लागला आहे. माश्यांचा नायनाट करायला औषधे, फवारण्या वगैरेंची अजिबात गरज नाही. माश्यांना घाण प्रिय असते. म्हणून आपण घाणच नाहीशी करायची. घाण होऊच दयायची नाही. सदोदित स्वच्छता पाळायची, बस्स. केवढा सुंदर महामार्ग आहे हा!

प्रश्न 2.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध –
माझा आवडता कलावंत.
माझे आवडते शिक्षक.
उत्तर :
व्यक्तिचित्रणात्मक निबंध

व्यक्तिचित्रणात्मक निबंधात व्यक्तीचे चित्रण केलेले असते. प्रसंगवर्णनात प्रसंगाचे शब्दचित्र असते. त्या चित्रणात प्रसंगाचे लक्षवेधक, प्रभावी वर्णन केलेले असते. तो प्रसंग वाचकाच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आपण जणू काही तो प्रसंग पाहतच आहोत, असा वाचकाला प्रत्यय येत राहतो. त्याप्रमाणेच व्यक्तिचित्रणात व्यक्ती डोळ्यांसमोर उभी करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. जिवंत व्यक्तीच आपण पाहत आहोत, असा वाचकाला प्रत्यय आला पाहिजे. म्हणून व्यक्तीचे दिसणे, तिच्या हालचाली, लकबी, बोलण्याच्या पद्धती, विचार, दृष्टिकोन वगैरेंपैकी काही घटकांच्या किंवा अनेक घटकांच्या आधारे ती व्यक्ती साकार करता यायला हवी.

व्यक्तिचित्रणासाठी व्यक्ती नामवंत, वलयांकित, इतिहासप्रसिद्ध असली पाहिजे असे मुळीच नाही. व्यक्ती कोणीही असू शकते. अट एकच – चित्रण हुबेहूब वठले पाहिजे. त्यात व्यक्तिमत्त्वाचे जास्तीत जास्त पैलू प्रकट झाले पाहिजेत. असे व्यक्तिचित्रण हे यशस्वी व्यक्तिचित्रण होय.

व्यक्तिचित्रणात्मक निबंधाचा एक नमुना :

आमचे मनोहरकाका

[मुद्दे : व्यक्तीची प्राथमिक ओळख – लेखकाशी नाते – दर्शनी रूप – पेहराव – वृत्ती – व्यक्तीची इतरांशी वागण्याची पद्धत – सहवासाचा परिणाम – व्यक्तीचे उपजीविकेचे साधन – छंद – छंदाचे महत्त्व – लेखकाला झालेला फायदा.]

आमच्या शेजारचे मनोहरकाका आमच्या कॉलनीतील आम्हा मित्रमंडळींचे लाडके दोस्त आहेत. आम्हा सगळ्यांना ते खूप आवडतात. नेहमी हसतमुख चेहरा. आम्ही त्यांना कधीही कंटाळलेले, वैतागलेले, त्रागा करीत असलेले असे पाहिलेले नाही. त्यांच्या अंगावर स्वच्छ, इस्त्री केलेले नीटनेटके कपडे असतात. शर्ट नेहमी पँटीत खोचलेले असते. ते ठरावीक दोन – तीनच रंगांचे कपडे वापरतात, असे नाही. त्यांच्या अंगावर विविध रंग सुखाने नांदत असतात.

त्यातही त्यांना टी – शर्ट खूप प्रिय आहेत. हे टी – शर्टसुद्धा ते पॅन्टीत खोचतात, साधारणपणे टी – शर्ट खोचल्यानंतर बहुतेक लोक कमरेचा पट्टा बांधतात. पण मनोहरकाकांच्या बाबतीत गमतीची गोष्ट अशी की त्यांनी कधीही कमरेचा पट्टा वापरलेला नाही. त्यांची प्रकृती नेहमी टुणटुणीत असते. मनोहरकाका आणि प्रसन्नता नेहमी एकत्रच येतात.

मनोहरकाकांचा एक गुण आम्हांला खूप म्हणजे खूपच आवडतो. त्यांनी आम्हांला, “आज अभ्यास केला की नाही? की नुसता खेळण्यात वेळ गेला? किती गुण मिळाले?” असले प्रश्न कधीही विचारले नाहीत. पण त्यांचे आमच्या शिक्षणाकडे लक्ष नव्हते, असे नाही. आम्हा मित्रांच्या आई – बाबांशी त्यांची सतत कोणत्या ना कोणत्या योजनांविषयी चर्चा चालू असे. त्यांनी कॉलनीतील आठवी – नववी – दहावीतील मुलांसाठी विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली आहे. तसेच, त्यांचे आम्हांला एक आग्रहाचे सांगणे असते, “इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा. इंग्रजी वर्तमानपत्रे, मासिके वाचा. इंग्रजी पुस्तके वाचत राहा.

इंग्रजी कार्यक्रम पाहा. इंग्रजी बातम्या पाहा. डिक्शनरीची फिकीर करू नका”. मी आठवीत असल्यापासून त्यांचे हे म्हणणे मनावर घेतले. मी मराठी माध्यमातून शिकलो. दहावीनंतर मी कॉलेजमध्ये गेलो. तिथे मला इंग्रजीचा काहीही त्रास झाला नाही. मी आरामात आणि आनंदाने कॉलेजमध्ये वावरलो. शिकतानाही अडथळे आले नाहीत. खरे सांगू? मनोहरकाका माझ्या सोबतच आहेत, असे मला सतत वाटत राहिले आहे.

मनोहरकाकांची स्मरणशक्ती अफाट आहे. त्यांना देशोदेशीच्या इतक्या घटना, माणसे स्मरणात आहेत की विचारता सोय नाही. त्यांचे घर पुस्तकांनी भरलेले आहे. त्यांचे वाचन अफाट आहे. ते प्राध्यापक आहेत. कॉलेजात इतिहास शिकवतात. इतिहास त्यांच्या जिभेवर असतो. त्यांच्याकडे माहितीचा प्रचंड खजिना आहे. शिवाय त्याचे सगळे छापील पुरावे त्यांनी जपून ठेवले आहेत. साठ – सत्तर वर्षांपासूनची वर्तमानपत्रांची, साप्ताहिकांची, मासिकांची कात्रणे त्यांनी जमा केलेली आहेत. विषयानुसार कालानुक्रमे त्यांनी ती कात्रणे लावली आहेत. त्यांच्या फाईली करून ठेवल्या आहेत. स्पर्धांसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी मनोहरकाकांचा आम्हांला खूप उपयोग होतो.

मी दहावी पास झालो. मला चांगले गुण मिळाले. मनापासून माझे कौतुक केले. पण त्याच वेळी आमच्या घरात एक पेच निर्माण झाला होता. मला आर्ट्स शाखेत प्रवेश घ्यायची इच्छा होती. माझ्या आई – ५ बाबांना ती कल्पना पसंत नव्हती. आम्ही मनोहरकाकांचा सल्ला घ्यायला गेलो. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी माझ्या निर्णयाचे कौतुक केले. मी आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. या वर्षी मी बारावीत आहे. कॉलेजातला माझा सगळा काळ आनंदात गेलेला आहे. असे आहेत आमचे मनोहरकाका. त्यांना तुम्ही एकदा जरी भेटलात, तरी त्यांचे मित्र होऊन जाल!

प्रश्न 3.
आत्मवृत्तात्मक निबंध-
मी सह्याद्री बोलतोय.
वृत्तपत्राचे मनोगत.
उत्तर :
आत्मवृत्तात्मक (आत्मकथनात्मक) निबंध

या प्रकारच्या निबंधामध्ये सजीव व निर्जीव वस्तू स्वत:च स्वत:च्या जीवनाचे कथन करीत आहेत, अशी कल्पना केलेली असते. या प्रकाराला आत्मनिवेदन, आत्मवृत्त, मनोगत, कैफियत, गाहाणे इत्यादी वेगवेगळे शब्दही योजले जातात.

या निबंधप्रकारात, निवेदक स्वत:च बोलत असल्याने प्रथमपुरुषी वाक्यरचना येते. या कथनात निवेदकाच्या जन्मापासूनच्या संपूर्ण बारीकसारीक तपशिलांची अपेक्षा नसते. त्याच्या जीवनातील ठळक, महत्त्वाचे मोजकेच प्रसंग वा घडामोडी नमूद कराव्यात. त्या आधारे त्याच्या व्यथा – वेदना कथन कराव्यात; या व्यथा – वेदना कथन करता मानवी जीवनातील, माणसाच्या वर्तनातील विसंगती दाखवून दयाव्यात, अशी अपेक्षा असते. मनोगत व्यक्त करताना सुप्त, अतृप्त इच्छा प्रकट करावी. गा – हाणी, कैफियत लिहिताना निवेदकाच्या सुखदुःखावर भर दयावा. निवेदक स्वतः वाचकाशी बोलत असतो. म्हणून या निबंधाची भाषा साधी व ओघवती असावी. निवेदनात जिव्हाळा, कळकळ, भावनेचा ओलावा व्यक्त झाला पाहिजे.

आत्मवृत्तात्मक (आत्मकथनात्मक) निबंधाचा एक नमुना :

भटक्या जमातीतील एका भटक्याचे मनोगत

[मुद्दे : भटकी जमात सतत भटकत असते – पण दारिद्र्य त्यांच्या पाचवीला पुजलेले – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रयत्न – भटके जीवन – स्थिरता नाही – गावोगावी भटकणे – भटकंतीमुळे सतत ताटातूट – भटकंतीत साथ प्राण्यांची – अपमानित जीवन – फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्यामुळे नवीन जीवन – प्रेरणा – अजूनही सुधारणेची गरज.]

“खरोखर आज मला फार आनंद झाला आहे. कारण अशा त – हेने आपल्या मनातील विचार समाजातील सगळ्या लोकांपुढे आपण कधी मांडू शकू, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. खरं सांगू का? असं एका जागी उभं राहून बोलण्याचीही मला सवय नाही, कारण… कारण आम्ही आहोत ‘भटके’ लोक ! सतत भटकतच असतो! आमच्या पायांना मुळी चक्रच लावलेलं असतं. पण एक शंका माझ्या मनात बरेच दिवस रेंगाळते आहे. ती तुमच्यापुढे मांडतो. असं म्हणतात की – जो चालतो, त्याचं नशीबही जोरात चालतं. जर असं आहे तर आम्हां भटक्यांचं नशीब का कधीच जोरात धावत नाही? आमची गाठ सदैव दारिद्र्याशीच का? आज वर्षानुवर्षे आम्ही हिंडत आहोत, पण जगातील कोणाचंही आमच्याकडे लक्ष गेलं नाही.

“आता मात्र दिवस हळहळ पालटू लागले आहेत. आमच्या दैन्यावस्थेकडे समाजाचे थोडं थोडं लक्ष जाऊ लागलं आहे. आमच्या मुलांपैकी काहीजण शिकू लागले आहेत. हे घडू लागलं आहे ते आमच्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी आम्हांला नवीन डोळे दिले; नवी दृष्टी दिली ! आम्ही अंधश्रद्धेच्या गुडूप अंधारात घनघोर झोपलो होतो. बाबासाहेबांनी आपल्या विचारांनी आम्हांला गदागदा हलवलं; आम्हांला जागं केलं. आम्हांला नवा मार्ग दाखवला. आम्ही त्या मार्गावर एकेक पाऊल टाकत आहोत.

“आता मी माझं मनोगत सांगतोय, तेव्हा मी माझी सुखदुःखे सांगावीत, असं तुमच्या मनात येईल. पण खरं सांगू का? सुखाचे क्षण मला शोधावेच लागतील. सगळं दु:खच दु:ख आलं आहे आमच्या वाट्याला! आम्हां भटक्यांना ना घर ना गाव! आम्ही सर्वजण गटागटाने हिंडत असतो… या गावातून त्या गावात. गावात गेल्यावर मुक्काम गावकुसाबाहेर. तेथेच फाटक्यातुटक्या कापडाच्या राहुट्या उभारतो. त्यांना आम्ही ‘पालं’ म्हणतो. दोन – चार दिवस राहतो. गावात दारोदार हिंडून काही काम मिळालं तर करतो आणि खातो आणि मग पालं गुंडाळून नव्या गावाच्या दिशेने पावलं टाकतो. वर्षानुवर्षे हे असंच चालू आहे.

“खरं सांगू का माझा जन्म कधी झाला व कोठे झाला, हे मला सांगता येणार नाही. आम्ही सगळी भावंडं अशीच भटकंतीत जन्मलो. आमचे जन्म, बारसे, लग्न सगळे या भटकंतीतच. जवळच्या माणसाचा मृत्यू झाला, तरी आम्हांला हे कळतं ते काही महिन्यांनी, कधी कधी तर वर्षानंतरही ! या भटक्या जीवनामुळे सगळ्या भावंडांची गाठ पडते, तीसुद्धा वर्षावर्षानंतर!

“भटक्या जीवनामुळे आम्हांला खडतर जीवनाची सवयच झाली आहे. कष्ट, दैन्य, हालअपेष्टा, मानापमान अशा गोष्टींचं काही वाटेनासंच झालं आहे. कधी कधी आम्ही पालं टाकतो आणि कोणीतरी येऊन शिवीगाळ करून आम्हांला हुसकावतं! आम्ही काहीही न बोलता भीतीने व दुःखी अंत:करणाने तिथून उठतो आणि दुसरीकडे जातो! आम्हांला कायम साथ देतात ती आमची मेंढरं, कुत्री आणि गाढवं ! आजारी पडायलाही आम्हांला फुरसत नसते.

आता आता आमच्यात थोडा बदल झाला आहे. छत्रपती शाहू महाराज हे देवदूतासारखे आमच्यासाठी धावून आले. आमच्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. आपल्या राजेपणाचे सर्व अधिकार त्यांनी आमच्यासाठी वापरले. आम्हांला स्थिर जीवन मिळावे म्हणून अनेक कल्पक योजना आखल्या. अनेकांची टीका सहन करीत त्या राबवल्या. आम्हांला माणसात आणण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्यांच्या प्रयत्नांमुळे आता आमची मुलं शिकू लागली आहेत. वरच्या पदापर्यंत जाऊ लागली आहेत.

“इतर समाजसुद्धा हळूहळू बदलत आहे. लोक आमची स्थिती समजून घेत आहेत. सरकार आमच्यासाठी विविध योजना आखत आहे, कायदे करीत आहे. पण तरीही अजून खूप सुधारणा होण्याची गरज आहे. मग आपण एकसमान होऊ. आपला देश समर्थ बनेल.”

प्रश्न 4.
कल्पनाप्रधान निबंध –
सूर्य मावळला नाही तर…
पेट्रोल संपले तर…
उत्तर :
कल्पनाप्रधान निबंध

अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाल्यास काय घडेल या कल्पनेचा मुक्त वापर करून लिहिलेल्या निबंधाला कल्पनाप्रधान निबंध म्हणतात. आधुनिक जीवनव्यवहारात काही वस्तू अगदी अपरिहार्य झाल्या आहेत. त्या उपलब्ध नसल्यास काय घडेल, याचे वर्णन कल्पनाप्रधान निबंधात करता येते. परंतु त्याच वेळी त्या वस्तूंची आवश्यकता किती आहे, त्यामुळे आपल्या जीवनात किती सौंदर्य निर्माण झाले आहे किंवा किती कृत्रिमता निर्माण झाली आहे, हेही सांगता आले पाहिजे.

या निबंधप्रकाराची सुरुवात एखादया दैनंदिन प्रसंगातून करता येते. अशा निबंधाच्या विषयाची मांडणी करताना आपणाला ज्या गोष्टी सांगायच्या असतात, त्या एखादया कल्पनेभोवती गुंफून सांगाव्यात.

कल्पनाप्रधान निबंधाचा एक नमुना :

आषाढघनाचे आगमन झाले नाही तर?

[मुद्दे : असा प्रश्न मनात येण्याचे कारण – प्रथम जाणवणारा दुष्परिणाम – – निसर्गसौंदर्याचा नाश – आषाढ धो धो पावसाचा महिना – अतिवृष्टीच्या परिणामांपासून मुक्ती – पाण्याच्या अभावाचे परिणाम – मानवी प्रयत्न – पाणी मिळवणे महागडे – पाण्याविना तडफडणारी सर्वच प्राणिसृष्टी – आधुनिक जीवन ठप्प – गरीबश्रीमंत दरी – सर्वनाशाकडे वाटचाल.]

मध्यंतरी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती. माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे. निसर्गाने माणसाला शिक्षाच दयायला सुरुवात केली नसेल ना? गेली दहा हजार वर्षे माणूस स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडतो आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. त्याचा बदला तर नाही ना हा? आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे! सध्याचाच ताप पाहा आधी. तापमानाचा पारा ४०°ला स्पर्श करीत आहे. आता पाऊस येईल तेव्हाच गारवा. त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर? अरे देवा! पण तो आलाच नाही तर? आषाढघनाचे दर्शनच घडले नाही तर?

परवाच बा. भ. बोरकर यांची कविता वाचत होतो. वाचता वाचता हरखून गेलो होतो. या पावसाळ्यात जायचेच, असा आमच्या घरात बेत आखला जात होता. गावी जायला मिळाले, तर आषाढघनाने नटलेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहता येईल. कोमल, नाजूक पाचूच्या रांगांची हिरवीगार शेते, पोवळ्याच्या रंगाची लाल माती, रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे, सोनचाफा, केतकी, जाईजुई यांचे आषाढस्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल, हे खरे आहे. पण पाऊसच नसेल तर?

आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना. गडगडाटासह धो धो कोसळणाऱ्या पावसाचा महिना. कधी कधी हे आषाढघन रौद्ररूप धारण करतात. गावेच्या गावे जलमय होतात. डोंगरकडे कोसळतात. घरे बुडतात. गटारे ओसंडून वाहतात. सांडपाण्याची, मलमूत्राची सर्व घाण रस्तोरस्ती पसरते. घराघरात घुसते. मुकी जनावरे बिचारी वाहून जातात. हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत, अशी भीषण संकटे समोर उभी ठाकतात. दैनंदिन जीवन कोलमडून पडते. रोगराईचे तांडव सुरू होते. पाऊस नसेल, तर हे सर्व टळेल, यात शंकाच नाही.

मात्र, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे. तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल. समुद्राचे पाणी वापरण्याजोगे करण्याचे कारखाने सुरू होतील. त्यामुळे प्यायला पाणी मिळेल. काही प्रमाणात शेती होईल. पण हे जेवढ्यास तेवढेच असेल.

सर्वत्र पाऊस पडत आहे. रान हिरवेगार झाले आहे. फळाफुलांनी झाडे लगडली आहेत, अशी दृश्ये कधीच आणि कुठेही दिसणार नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे असेल फक्त.

समुद्रातून पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा असेल. त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल. उपासमार मोठ्या प्रमाणात होईल. दंगली घडतील. लुटालुटीचे प्रकार सुरू होतील.

थोडकीच माणसे शिल्लक राहिली, तर ती जगूच शकणार नाहीत. इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत. माणूस फक्त स्वत:साठी पाणी मिळवील. पण उरलेल्या प्राणिसृष्टीचे काय? ही प्राणिसृष्टी माणसांवर चाल करून येईल. वरवर वाटते तितके जीवन सोपे नसेल. माणसांचे, प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील. त्यांतून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल. एकूण काय? ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल.

पाऊस नसेल, तर वीजही नसेल. एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील. पाणी नसल्यामुळे शेती नसेल. फळबागाईत नसेल. नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील, इथपर्यंत ठीक आहे. पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल. या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील. बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील. त्यातून प्रचंड अराजक माजेल. याची भीषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही. अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल. उरेल फक्त रखरखीत, रणरणते वाळवंट. सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना?

नको, नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने! एकच चिरकालिक सत्य आहे. ते म्हणजे पाऊस हवा, आषाढघन बरसायला हवाच!

प्रश्न 5.
वैचारिक निबंध –
तंत्रज्ञानाची किमया.
वाचते होऊया.
उत्तर :
वैचारिक निबंध

वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते. मात्र, सर्व वैचारिक निबंध एकाच स्वरूपाचे नसतात. (यामध्ये विचारप्रधान, चिंतनपर, समस्याप्रधान, चर्चात्मक अशा स्वरूपांचे निबंध असतात.) काही निबंधांत विचाराला महत्त्व असते. उदा., ‘अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म’, ‘दया, क्षमा, शांती हाच जीवनाचा आधार’, ‘त्यागात मैत्रीचा आत्मा’ इत्यादी. काही निबंध समस्याप्रधान असतात. उदा., ‘पर्यावरणाचा हास’, ‘फॅशनचे वेड’, ‘बालमजुरी’, ‘बेकारी’, ‘स्त्रियांवरील अत्याचार’ इत्यादी. अशा निबंधांत समस्या मांडलेली असते आणि त्या अनुषंगाने लेखक आपले विचार मांडतो. तर काही निबंध हे वादविवादात्मक स्वरूपाचे असतात. उदा., ‘मोबाइल – शाप की वरदान’, ‘आजचे तरुण बिघडले आहेत काय?’, ‘आजची स्त्री – अबला की सबला?’ इत्यादी.

वैचारिक निबंध कोणत्याही स्वरूपाचा असला, तरी त्यात एक विचार मांडलेला असतो. कोणत्याही विषयाला नेहमी दोन बाजू असतात. एक अनुकूल आणि दुसरी प्रतिकूल. अशा निबंधात केवळ आपलीच बाजू – म्हणजे अनुकूल बाजू – मांडून चालत नाही. त्या विषयाची दुसरी बाजू – म्हणजे आपल्याला न पटणारी बाजूसुद्धा – मांडावी लागते.

अशा प्रकारच्या निबंधाची मांडणी साधारणपणे पुढील प्रकारची असते :

प्रास्ताविकात विषयाची सदयःस्थिती मांडावी. त्यानंतर विरुद्ध बाजू मांडावी. लगेचच त्या बाजूतील उणिवा दाखवाव्यात. याला ‘खंडन’ असे म्हणतात. मग आपली बाजू मांडावी. याला ‘मंडन’ असे म्हणतात. खंडन – मंडन करताना दाखले दयावेत. अखेरीला आपल्या विचाराबाबतचा स्वत:चा निष्कर्ष नोंदवावा.

वैचारिक निबंधाचा एक नमुना :

सादरीकरण – एक जीवनावश्यक कौशल्य

[मुद्दे : समूहात राहणे ही माणसाची जीवनावश्यक गरज – त्यामुळे इतरांसमोर कौशल्याने सादर होणे – दैनंदिन जीवनात अनौपचारिक सादरीकरण – आधुनिक जीवन गुंतागुंतीचे – सतत विविध समूहांसमोर सादर होण्याची निकड – विशिष्ट कौशल्ये आवश्यक – पूर्वीचे जीवन शांत, संथ – सादरीकरणाचा अभ्यास करणे निकडीचे.]

असे म्हणतात की, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समूह करून राहतो. तो एकेकटा, स्वतंत्रपणे जगूच शकणार नाही. तो माणसांत, माणसांसोबत राहतो. तो त्याचा जगण्याचा आधारच आहे. हा आधार नसेल, तर माणूस वेडापिसाच होईल. म्हणूनच, प्राचीन काळापासून ते अगदी आजतागायत जगभर सर्व देशांमध्ये माणसाला शिक्षा केली जाते ती तुरुंगवासाची. त्याला त्याच्या कुटुंबीयांपासून, मित्रांपासून, समाजापासून तोडून टाकण्याची ती शिक्षा असते. बाह्य जगाशी कोणताही संपर्क येऊ दयायचा नाही, हीच ती शिक्षा असते. ही शिक्षा माणसाला मृत्युदंडापेक्षाही भीषण वाटत आलेली आहे. समाजात राहणे ही त्याची जीवनावश्यक गरज आहे.

समाजात राहायचे म्हणजे दुसऱ्यांच्या सोबतीने, त्यांच्या सहकार्याने राहायचे. म्हणूनच ज्यांच्यासोबत आपण राहतो, वावरतो त्यांना आपल्या इच्छा – आकांक्षा, भावना – विचार समजावून सांगणे आवश्यक ठरते. इतरांच्या इच्छा – आकांक्षांना तडे न जाता आपल्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे. म्हणूनच आपल्या कल्पना – भावना, विचार इतरांना समजावून सांगणे हे अत्यंत कौशल्याचे ठरते. याच्यासाठी सादरीकरणाची गरज आहे. स्वत:ची मते पद्धतशीरपणे समजावून सांगण्यासाठी खास युक्तिवाद करावा लागतो. ही सर्व पद्धत म्हणजेच ‘सादरीकरण’ होय.

सादरीकरणाशिवाय माणूस नाही. सादरीकरण हा माणसाच्या जगण्याचाच एक भाग आहे. आपले बोलणे, चालणे, उठणे, बसणे, वागणे, हातवारे करणे किंबहुना आपली देहबोली हे आपले सादरीकरणच होय. या सादरीकरणातून आपले व्यक्तिमत्त्व व्यक्त होत असते. आपण फारच थोड्या कृती एकट्याने, खाजगीरीत्या करतो. आपले बहुतांशी जगणे इतरांसमोर, इतरांसोबतच घडत असते. म्हणजे आपण इतरांसमोर सदोदित सादरीकरणच करीत असतो म्हणा ना!

हे सादरीकरण अनौपचारिक पद्धतीने घडत असते. म्हणूनच आईवडील किंवा अन्य वडीलधारी माणसे “उठता – बसता काळजी घे”, “असा उभा राहू नकोस, तसा राहा’ या अशा सूचना करतात. इतरांसमोर आपले व्यक्तिमत्त्व चांगल्या रितीने प्रकट व्हावे, ही त्यांची इच्छा असते. म्हणजेच आपल्या देहबोलीला, आपल्या वागण्याबोलण्याला किती महत्त्व आहे, हे लक्षात येईल.

मात्र, आताचे जीवन खूप जटिल बनले आहे. खूप व्यामिश्र बनले आहे. जागतिकीकरणामुळे संपूर्ण मानवी जीवनच ढवळून निघाले आहे. कामांचे स्वरूप व व्याप्ती वाढली आहे. विविध प्रकारचे उदयोगव्यवसाय निर्माण झाले आहेत. संगणक, इंटरनेट, मोबाइल यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाच्या दूतांमुळे सर्व व्यवहारांचे स्वरूप आरपार बदलले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रांत अनेकानेक घडामोडी घडताहेत. यासाठी चर्चा, परिषदा, मेळावे, बैठका, संमेलने, शिबिरे इत्यादी आयोजित केली जात आहेत. माणसांना विविध कारणांनी असे एकत्र यावे लागत आहे.

अशा वेळी समूहासमोर आपल्या कल्पना, आपली मते व्यक्त करण्याची, सगळ्यांना आपले विचार समजावून सांगण्याची वेळ येते. आधुनिक काळात या सगळ्याला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हे टाळता येणे शक्यच नाही. अन्यथा आपल्याला नोकरी, धंदा वा व्यवसाय करताच येणार नाही. येथे सादरीकरणाचा संबंध येतो. अशा या सादरीकरणाशिवाय आपण जगूच शकणार नाही.

काही वर्षांपूर्वीचे जीवन हे शांत, संथ होते. तेथे कोणाला, कशाचीही घाई नव्हती किंवा अगत्यही नव्हते. म्हणून कोणीही सैलपणाने वागला तरी ते चालून जाई. आता मात्र ते शक्य नाही. म्हणून सादरीकरणाचा अभ्यासही करावा लागेल. दुसऱ्यांसमोर आपण सादर होतो तेव्हा, उभे राहणे, बोलणे, हातवारे करणे या सगळ्यांचा काटेकोर अभ्यास करावा लागेल. कोणत्या हेतूने व कोणत्या प्रकारच्या लोकांसमोर आपण उभे राहिलो आहोत, हे लक्षात घेऊन आपल्याला आपल्या सादरीकरणाची रीत ठरवावी लागेल. सादरीकरण हे आता दुर्लक्ष करण्याएवढे बिनमहत्त्वाचे राहिले नाही. आपण शाळा – कॉलेजात अभ्यास करतो, तसा सादरीकरणाचा अभ्यास करावा लागेल. सातत्याने सराव करावा लागेल. तर आणि तरच आपला आधुनिक जगात टिकाव लागणार आहे.

निबंध लेखन प्रस्तावना

निबंध हा गदयलेखनाचा एक प्रकार आहे. त्यात एखादया विषयाची सांगोपांग माहिती सुसंगतपणे दयायची असते.

निबंधात कधी एखादया समस्येचा ऊहापोह केलेला असतो. समस्येचे स्वरूप, कारणे व उपाय या रितीने त्यात मांडणी केलेली असते. कधी एखादी वस्तू, ठिकाण, परिसर, प्रसंग, व्यक्ती यांचे वर्णन असते; तर कधी विविध सजीव – निर्जीव गोष्टींचे आत्मकथन असते. कधी कधी कल्पनेवर स्वार होऊन अनेक गोष्टींच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे नकारात्मक गुणांचाही निर्देश करायला हरकत नसते. अशा प्रकारे निबंधात आशय विविध रितींनी मांडलेला असतो.

1. लक्षात ठेवा

  • निबंधाची सुरुवात आकर्षक, लक्षवेधक हवी आणि आपले मत ठाशीवपणे मांडणारा परिणामकारक शेवट हवा.
  • सुरुवातीच्या काळात कोणालाही कोणताही निबंध एका दमात, एका झटक्यात लिहिता येत नाही. पुन:पुन्हा सुधारणा करून पुनर्लेखन करावे लागते.
  • परीक्षेत ठरावीक मिनिटांत निबंध लिहावा लागतो. पुन:पुन्हा लिहिण्यास वेळ नसतो. निबंध लिहिण्याचा सातत्याने सराव केला पाहिजे. निबंधाच्या विषयानुसार प्रथम मुद्दे तयार करावेत. ते क्रमाने मांडावेत. मुद्द्यांना अनुसरून परिच्छेद पाडले पाहिजेत.
  • निबंध ठरावीक शब्दसंख्येत बसवावा. या त – हेने वेगवेगळ्या विषयांवरचे निबंध तयार करावेत.
  • म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, विविध भाषांतील अवतरणे यांचा गरजेनुसार व प्रमाणशीर वापर करावा.
  • शब्दरचना व वाक्यरचना अर्थपूर्ण असावी. ज्या शब्दांचा अर्थ निश्चितपणे माहीत नाही, त्यांचा उपयोग करू नये.
  • पाल्हाळीकपणा टाळावा.
  • स्वत:च्या शब्दांतच निबंध लिहावा. दुसऱ्याचा निबंध उतरवून काढू नये किंवा त्याची घोकंपट्टी करू नये.
  • लेखनाचे नियम, विरामचिन्हे यांबाबत दक्षता बाळगावी.
  • शब्दसंपत्ती, भाषाशैली यांचा विकास व्हावा, म्हणून वृत्तपत्रे व पाठ्यपुस्तकेतर पुस्तके यांचे नियमित वाचन अवश्य करावे.
  • टिपणे, कात्रणे यांचा संग्रह करण्याची सवय लावावी.
  • शा प्रकारे सराव केल्यास मुद्देसूदपणे व आटोपशीरपणे निबंध लिहिण्याचे कौशल्य प्राप्त होते. परीक्षेत कोणत्याही विषयावरचा निबंध लिहिण्यास हे कौशल्य उपयोगी पडते.

2. अभ्यासक्रमातील निबंधाचे प्रकार :

निबंधाच्या आशयानुसार निबंधाचे अनेक प्रकार मानले जातात. त्यांपैकी पुढील पाच प्रकार इयत्ता १२वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत :

कल्पनाप्रधान निबंधाचा एक नमुना :

आषाढघनाचे आगमन झाले नाही तर?

[मुद्दे : असा प्रश्न मनात येण्याचे कारण – प्रथम जाणवणारा दुष्परिणाम – निसर्गसौंदर्याचा नाश – आषाढ धो धो पावसाचा महिना – अतिवृष्टीच्या परिणामांपासून मुक्ती – पाण्याच्या अभावाचे परिणाम – मानवी प्रयत्न – पाणी मिळवणे महागडे – पाण्याविना तडफडणारी सर्वच प्राणिसृष्टी – आधुनिक जीवन ठप्प – गरीबश्रीमंत दरी – सर्वनाशाकडे वाटचाल.]

मध्यंतरी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती. माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे. निसर्गाने माणसाला शिक्षाच दयायला सुरुवात केली नसेल ना? गेली दहा हजार वर्षे माणूस स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडतो आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. त्याचा बदला तर नाही ना हा? आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे! सध्याचाच ताप पाहा आधी. तापमानाचा पारा ४०°ला स्पर्श करीत आहे. आता पाऊस येईल तेव्हाच गारवा. त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर? अरे देवा! पण तो आलाच नाही तर? आषाढघनाचे दर्शनच घडले नाही तर?

परवाच बा. भ. बोरकर यांची कविता वाचत होतो. वाचता वाचता हरखून गेलो होतो. या पावसाळ्यात जायचेच, असा आमच्या घरात बेत आखला जात होता. गावी जायला मिळाले, तर आषाढघनाने नटलेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहता येईल. कोमल, नाजूक पाचूच्या रांगांची हिरवीगार शेते, पोवळ्याच्या रंगाची लाल माती, रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे, सोनचाफा, केतकी, जाईजुई यांचे आषाढस्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल, हे खरे आहे. पण पाऊसच नसेल तर?

आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना. गडगडाटासह धो धो कोसळणाऱ्या पावसाचा महिना. कधी कधी हे आषाढघन रौद्ररूप धारण करतात. गावेच्या गावे जलमय होतात. डोंगरकडे कोसळतात. घरे बुडतात. गटारे ओसंडून वाहतात. सांडपाण्याची, मलमूत्राची सर्व घाण रस्तोरस्ती पसरते. घराघरात घुसते. मुकी जनावरे बिचारी वाहून जातात. हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत, अशी भीषण संकटे समोर उभी ठाकतात. दैनंदिन जीवन कोलमडून पडते. रोगराईचे तांडव सुरू होते. पाऊस नसेल, तर हे सर्व टळेल, यात शंकाच नाही.

मात्र, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे. तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल. समुद्राचे पाणी वापरण्याजोगे करण्याचे कारखाने सुरू होतील. त्यामुळे प्यायला पाणी मिळेल. काही प्रमाणात शेती होईल. पण हे जेवढ्यास तेवढेच असेल.

सर्वत्र पाऊस पडत आहे. रान हिरवेगार झाले आहे. फळाफुलांनी झाडे। लगडली आहेत, अशी दृश्ये कधीच आणि कुठेही दिसणार नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे असेल फक्त.

समुद्रातून पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा असेल. त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल. उपासमार मोठ्या प्रमाणात होईल. दंगली घडतील. लुटालुटीचे प्रकार सुरू होतील. थोडकीच माणसे शिल्लक राहिली, तर ती जगूच शकणार नाहीत. इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत. माणूस फक्त स्वत:साठी पाणी मिळवील. पण उरलेल्या प्राणिसृष्टीचे काय? ही प्राणिसृष्टी माणसांवर चाल करून येईल. वरवर वाटते तितके जीवन सोपे नसेल. माणसांचे, प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील. त्यांतून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल. एकूण काय? ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल.

पाऊस नसेल, तर वीजही नसेल. एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील. पाणी नसल्यामुळे शेती नसेल. फळबागाईत नसेल. नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील, इथपर्यंत ठीक आहे. पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल. या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील. बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील. त्यातून प्रचंड अराजक माजेल. याची भीषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही. अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल. उरेल फक्त रखरखीत, रणरणते वाळवंट. सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना?

नको, नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने! एकच चिरकालिक १ सत्य आहे. ते म्हणजे पाऊस हवा, आषाढघन बरसायला हवाच!

वैचारिक निबंध

वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते. मात्र, सर्व वैचारिक निबंध एकाच स्वरूपाचे नसतात. (यामध्ये विचारप्रधान, चिंतनपर, समस्याप्रधान, चर्चात्मक अशा स्वरूपांचे निबंध असतात.) काही निबंधांत विचाराला महत्त्व असते. उदा., ‘अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म’, ‘दया, क्षमा, शांती हाच जीवनाचा आधार’, ‘त्यागात मैत्रीचा आत्मा’ इत्यादी. काही निबंध समस्याप्रधान असतात. उदा., ‘पर्यावरणाचा हास’, ‘फॅशनचे वेड’, ‘बालमजुरी’, ‘बेकारी’, ‘स्त्रियांवरील अत्याचार’ इत्यादी. अशा निबंधांत समस्या मांडलेली असते आणि त्या अनुषंगाने लेखक आपले विचार मांडतो. तर काही निबंध हे वादविवादात्मक स्वरूपाचे असतात. उदा., ‘मोबाइल – शाप की वरदान’, ‘आजचे तरुण बिघडले आहेत काय?’, ‘आजची स्त्री – अबला की सबला?’ इत्यादी.

वैचारिक निबंध कोणत्याही स्वरूपाचा असला, तरी त्यात एक विचार मांडलेला असतो. कोणत्याही विषयाला नेहमी दोन बाजू असतात. एक अनुकूल आणि दुसरी प्रतिकूल. अशा निबंधात केवळ आपलीच बाजू – म्हणजे अनुकूल बाजू – मांडून चालत नाही. त्या विषयाची दुसरी बाजू – म्हणजे आपल्याला न पटणारी बाजूसुद्धा – मांडावी लागते.

अशा प्रकारच्या निबंधाची मांडणी साधारणपणे पुढील प्रकारची असते :

प्रास्ताविकात विषयाची सदय:स्थिती मांडावी. त्यानंतर विरुद्ध बाजू मांडावी. लगेचच त्या बाजूतील उणिवा दाखवाव्यात. याला ‘खंडन’ असे म्हणतात. मग आपली बाजू मांडावी. याला ‘मंडन’ असे म्हणतात. खंडन – मंडन करताना दाखले दयावेत. अखेरीला आपल्या विचाराबाबतचा स्वत:चा निष्कर्ष नोंदवावा.

वैचारिक निबंधाचा एक नमुना :

सादरीकरण – एक जीवनावश्यक कौशल्य

[मुद्दे : समूहात राहणे ही माणसाची जीवनावश्यक गरज – त्यामुळे इतरांसमोर कौशल्याने सादर होणे – दैनंदिन जीवनात अनौपचारिक सादरीकरण – आधुनिक जीवन गुंतागुंतीचे – सतत विविध समूहांसमोर सादर होण्याची निकड – विशिष्ट कौशल्ये आवश्यक – पूर्वीचे जीवन शांत, संथ – सादरीकरणाचा अभ्यास करणे निकडीचे.]

असे म्हणतात की, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समूह करून राहतो. तो एकेकटा, स्वतंत्रपणे जगूच शकणार नाही. तो माणसांत, माणसांसोबत राहतो. तो त्याचा जगण्याचा आधारच आहे. हा आधार नसेल, तर माणूस वेडापिसाच होईल. म्हणूनच, प्राचीन काळापासून ते अगदी आजतागायत जगभर सर्व देशांमध्ये माणसाला शिक्षा केली जाते ती तुरुंगवासाची. त्याला त्याच्या कुटुंबीयांपासून, मित्रांपासून, समाजापासून तोडून टाकण्याची ती शिक्षा असते. बाह्य जगाशी कोणताही संपर्क येऊ दयायचा नाही, हीच ती शिक्षा असते. ही शिक्षा माणसाला मृत्युदंडापेक्षाही भीषण वाटत आलेली आहे. समाजात राहणे ही त्याची जीवनावश्यक गरज आहे.

समाजात राहायचे म्हणजे दुसऱ्यांच्या सोबतीने, त्यांच्या सहकार्याने राहायचे. म्हणूनच ज्यांच्यासोबत आपण राहतो, वावरतो त्यांना आपल्या इच्छा – आकांक्षा, भावना – विचार समजावून सांगणे आवश्यक ठरते. इतरांच्या इच्छा – आकांक्षांना तडे न जाता आपल्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे. म्हणूनच आपल्या कल्पना – भावना, विचार इतरांना समजावून सांगणे हे अत्यंत कौशल्याचे ठरते. याच्यासाठी सादरीकरणाची गरज आहे. स्वत:ची मते पद्धतशीरपणे समजावून सांगण्यासाठी खास युक्तिवाद करावा लागतो. ही सर्व पद्धत म्हणजेच ‘सादरीकरण’ होय.

सादरीकरणाशिवाय माणूस नाही. सादरीकरण हा माणसाच्या जगण्याचाच एक भाग आहे. आपले बोलणे, चालणे, उठणे, बसणे, वागणे, हातवारे करणे किंबहुना आपली देहबोली हे आपले सादरीकरणच होय. या सादरीकरणातून आपले व्यक्तिमत्त्व व्यक्त होत असते. आपण फारच थोड्या कृती एकट्याने, खाजगीरीत्या करतो. आपले बहुतांशी जगणे इतरांसमोर, इतरांसोबतच घडत असते. म्हणजे आपण इतरांसमोर सदोदित सादरीकरणच करीत असतो म्हणा ना!

हे सादरीकरण अनौपचारिक पद्धतीने घडत असते. म्हणूनच आईवडील किंवा अन्य वडीलधारी माणसे “उठता – बसता काळजी घे”, “असा उभा राहू नकोस, तसा राहा” या अशा सूचना करतात. इतरांसमोर आपले व्यक्तिमत्त्व चांगल्या रितीने प्रकट व्हावे, ही त्यांची इच्छा असते. म्हणजेच आपल्या देहबोलीला, आपल्या वागण्याबोलण्याला किती महत्त्व आहे, हे लक्षात येईल.

मात्र, आताचे जीवन खूप जटिल बनले आहे. खूप व्यामिश्र बनले आहे. जागतिकीकरणामुळे संपूर्ण मानवी जीवनच ढवळून निघाले आहे. कामांचे स्वरूप व व्याप्ती वाढली आहे. विविध प्रकारचे उदयोगव्यवसाय निर्माण झाले आहेत. संगणक, इंटरनेट, मोबाइल यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाच्या दूतांमुळे सर्व व्यवहारांचे स्वरूप आरपार बदलले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रांत अनेकानेक घडामोडी घडताहेत. यासाठी चर्चा, परिषदा, मेळावे, बैठका, संमेलने, शिबिरे इत्यादी आयोजित केली जात आहेत. माणसांना विविध कारणांनी असे एकत्र यावे लागत आहे. अशा वेळी समूहासमोर आपल्या कल्पना, आपली मते व्यक्त करण्याची, सगळ्यांना आपले विचार समजावून सांगण्याची वेळ येते. आधुनिक काळात या सगळ्याला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हे टाळता येणे शक्यच नाही. अन्यथा आपल्याला नोकरी, धंदा वा व्यवसाय करताच येणार नाही. येथे सादरीकरणाचा संबंध येतो.

अशा या सादरीकरणाशिवाय आपण जगूच शकणार नाही.

काही वर्षांपूर्वीचे जीवन हे शांत, संथ होते. तेथे कोणाला, कशाचीही घाई नव्हती किंवा अगत्यही नव्हते. म्हणून कोणीही सैलपणाने वागला तरी ते चालून जाई. आता मात्र ते शक्य नाही. म्हणून सादरीकरणाचा अभ्यासही करावा लागेल. दुसऱ्यांसमोर आपण सादर होतो तेव्हा, उभे राहणे, बोलणे, हातवारे करणे या सगळ्यांचा काटेकोर अभ्यास करावा लागेल. कोणत्या हेतूने व कोणत्या प्रकारच्या लोकांसमोर आपण उभे राहिलो आहोत, हे लक्षात घेऊन आपल्याला आपल्या सादरीकरणाची रीत ठरवावी लागेल. सादरीकरण हे आता दुर्लक्ष करण्याएवढे बिनमहत्त्वाचे राहिले नाही. आपण शाळा – कॉलेजात अभ्यास करतो, तसा सादरीकरणाचा अभ्यास करावा लागेल. सातत्याने सराव करावा लागेल. तर आणि तरच आपला आधुनिक जगात टिकाव लागणार आहे.

सरावासाठी काही विषय

पुढील विषयावर सुमारे ३०० शब्दांत निबंध लिहा :

[टीप : बारावीच्या अभ्यासक्रमातील निबंधांच्या प्रकारांचे विवरण करताना प्रत्येक प्रकारातील एक – एक निबंध नमुन्यादाखल दिला आहे. येथे सरावासाठी निबंध – प्रकारानुसार निबंधांचे विषय व त्यांचे मुद्दे दिलेले आहेत.]

1. वर्णनात्मक निबंध

(१) माझा महाविदयालयातील पहिला दिवस

[मुद्दे : महाविदयालयात अधीरतेने प्रवेश – भुरळ घालणारे वातावरण – वर्गाचे आनंददायी दर्शन – महाविदयालयात फेरफटका – प्राचार्यांचे स्वागतपर भाषण – अखेरीला घरी परत.]

(२) आमच्या महाविदयालयातील स्नेहसंमेलन

[मुद्दे : स्नेहसंमेलनाचा दिवस – रंगमंचावर नाटक सादर करण्याची धुंदी पडदयामागील कृतींमध्येही – सर्वांच्या अंगात संमेलनाचा संचार – संमेलनात माझा सहभाग – कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी – प्राध्यापकांच्या नकला, गायन, वादन, नर्तन, नाट्यछटा इत्यादी – गमतीदार स्पर्धा – संमेलन यशस्वी – सहभागाचा फार मोठा आनंद.]

(३) सूर्योदयाची सुवर्णशोभा

[मुद्दे : दिवसाचे प्रहर – नवीन दिवसाची सुरुवात – अंधाराचा नाश – सकाळचा निसर्ग व प्रसन्न वातावरण – चराचरात बदल – मानवाला दिलासा व कार्य करण्याची उमेद – सूर्योदयाचे सौंदर्य.]

(४) श्रावणातला पाऊस

[मुद्दे : प्रास्ताविक – आषाढातला पाऊस – धसमुसळेपणा करणारा – श्रावणातला पाऊस – अलवारपणा, मुलायमपणा यांचे दर्शन घडवणारा – जीवनातील सर्व कोमलता श्रावणातील पावसाकडे; म्हणूनच निसर्गाची, सौंदर्याची विविध लेणी – श्रावणातील पावसाचे एक अद्भुत दर्शन.]

(५) आमचे कनिष्ठ महाविद्यालय

[मुद्दे : कनिष्ठ महाविदयालयात प्रवेश घेण्यापूर्वी हुरहुर, उत्सुकता – काही दिवसांनी नावीन्य संपले – दैनंदिन जीवनाचा भाग – सर्वत्र मित्रांसोबत हास्य – उल्हासात वावर – आवार फार मोठे, विस्तृत नाही – इमारतही लहानच – अत्याधुनिकता, चकचकीतपणा नाही – तरीही सुंदर – विविध वर्गखोल्या, वाचनालय येथे बसण्याची, अभ्यासाची जागा निश्चित – मैदान, मनोरंजन कक्ष, कँटीन ही आनंदाची ठिकाणे – त्याचबरोबर माहितीत, ज्ञानात नवनवीन भर – नवीन कौशल्ये आत्मसात – व्यक्तिमत्त्व विकसित.]

(६) माझे आवडते शिक्षक

[मुद्दे : आवडते शिक्षक कोण? – सर्व विदयार्थ्यांचे आवडते – व्यक्तिमत्त्व वर्णन – वेशभूषा – विषय समजावून सांगण्याची हातोटी – शैक्षणिक साधनांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग – दैनंदिन जीवनातील साध्या प्रसंगाच्या वर्णनातून विषय शिकवायला सुरुवात – कल्पक उपक्रम – असे शिक्षक लाभले हे माझे भाग्यच.]

(७) मी पाहिलेला क्रिकेटचा सामना

[मुद्दे : आवडता खेळ – संधी मिळेल तेव्हा हाच खेळ खेळतो – कोणाचाही खेळ पाहायला आवडते – एकदा एका गल्लीतील खेळ – सुरुवातीपासून अटीतटीचा खेळ – रोमहर्षक – दोन्ही संघांची सरस कामगिरी – कोणाचा विजय, कोणाचा पराजय सांगणे अशक्य – क्षेत्ररक्षणामुळे एका संघाचा विजय – दोघांनीही एकमेकांचे अभिनंदन केले – दोन्ही कप्तानांनी प्रतिस्पर्धी संघाचे भरभरून कौतुक केले.]

(८) पावसाळ्यातील एक दिवस

[मुद्दे : नकोसा झालेला उन्हाळा – पावसाची प्रतीक्षा – कडक उन्हाचा वातावरणावर झालेला परिणाम – वरुणाची आराधना – शेतकऱ्यांची केविलवाणी स्थिती – पावसाचे अचानक आगमन – आनंदाची लहर – पावसाचे रौद्र स्वरूप – पावसाने केलेली किमया – वातावरणातील सुखद बदल – पक्ष्यांचा आनंद – पावसाचे स्वागत – शेतकऱ्याची बदललेली मन:स्थिती.]

(९) डोंगरमाथ्यावरील गाव

[मुद्दे : आंबोली – निसर्गाचे वरदान लाभलेले एक गाव – गरिबांचे महाबळेश्वर – सुंदर ठिकाणे – महादेवगड, नारायणगड – आंबोलीतील नदी – धबधबा – आंबोलीतील झाडे – साधेपणा हाच आगळेपणा.]

2. व्यक्तिचित्रणात्मक निबंध

(१०) माझे आवडते शेजारी

[मुद्दे : आमच्या वाडीवरचे शेजारी – परिसरातील सर्वांचे आवडते – व्यक्तिमत्त्व वर्णन – वेशभूषा – परिसरातील लोकांच्या हिताची कळकळ – परिसरातील मुलांना नवीन नवीन उपक्रम देण्याची कल्पकता – आम्ही भाग्यवान शेजारी.]

(११) आमची आरोग्यसेविका

[मुद्दे : गावातील एका सर्वसाधारण पदावरील व्यक्ती – सगळ्यांशी आपुलकीचे वागणे – कामाचे स्वरूप – कामाच्या प्रारंभीच घडलेले दर्शन – कार्यतत्परतेची उदाहरणे – स्वत:च्या कक्षेबाहेर जाऊन लोकहिताचे काम करण्याची वृत्ती – व्यापक दृष्टी – लोकांवर पडलेला प्रभाव.]

(१२) आमची आजी

[मुद्दे : उत्साही वयस्क स्त्री – म्हाताऱ्या स्त्रीच्या रूढ प्रतिमेविरुद्धचे दर्शन – आधुनिक वळणाची – व्यायाम करणारी – नोकरीमुळे बाह्यजगाची ओळख – प्रकृतीची काळजी, आर्थिक नियोजन, ताणतणाव समायोजन – स्वत:च्या आवडीनिवडी जोपासणे.]

(१३) माझी आई

[मुद्दे : आठवणीचा प्रसंग – दिनक्रम – कामांची त्वरा – अनेक आघाड्यांवरील कामे – कडक शिस्त – प्रसंगी धपाटे घालणारी – पण अत्यंत प्रेमळ – आमच्या बरोबर स्वत:च्या करिअरचाही विचार – आदर्श जीवनाचा विचार.]

3. आत्मवृत्तात्मक (आत्मकथनात्मक) निबंध

(१४) पृथ्वीचे मनोगत

[मुद्दे : प्रास्ताविक – पृथ्वीविषयी विचार येण्याचा एखादा प्रसंग – पृथ्वीचे निवेदन – पृथ्वीचे वय – जडणघडण – सर्व सजीव – निर्जीवांची साखळी – पर्यावरणाचे संतुलन – माणसांची संख्यावाढ – पृथ्वीचा – हास – सर्वांच्याच नाशाची शक्यता – पृथ्वीचा उपदेश – ‘पर्यावरणाचा समतोल राखा.’]

(१५) वटवृक्षाची आत्मकहाणी

[मुद्दे : वृक्ष – लहान रोपट्याचे मोठे रूप – माणसाच्या विसाव्याचे ठिकाण – मुळापासून पानापर्यंत सर्व अवयवांचा माणसाला उपयोग – माणसाच्या अनेक कृतींचा साक्षीदार – माणसाला सर्वस्वाने मदत – पर्यावरणाचा आधारस्तंभ – मी टिकलो तरच जीवसृष्टी टिकेल – मी नसेन तर जीवसृष्टी नष्ट – माणूस कृतघ्न – वृक्षाला चिंता – माणसाला विनंती.]

(१६) मी आहे पर्जन्य!

[मुद्दे : मी पाऊस! – माझी अनेक नावे – मी कसा निर्माण होतो? – वर्षाचक्र – मानवावर उपकार – नवनिर्मिती – अन्न, वस्त्र, निवारा – मी नसेन तर… दुष्काळ व जीवनाचा अंत – माझे कर्तव्य व माणसाची जबाबदारी.]

(१७) कर्जबाजारी शेतकऱ्याची कैफियत शेतकऱ्याचे मनोगत

[मुद्दे : कर्जबाजारी शेतकऱ्याचा बोलण्याचा प्रसंग – हताश – आत्महत्या करावी का, या विचारात – चहूबाजूंनी कोंडमारा – अनेकांचा गैरसमज आम्ही आळशी – सुका – ओला दुष्काळ – माणसे, गुरेढोरे यांचे अनंत हाल – आमच्या उत्पादनाला नगण्य किंमत – शिक्षण, आरोग्य यांची प्रचंड आबाळ – कर्जाला दुसरा पर्यायच नसतो – शासनाकडून आम्हांला कर्जमाफी किंवा नको – रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतमालासाठी विपणन व्यवस्था एवढीच शासनाकडून अपेक्षा – संपूर्ण देशाचेच चित्र बदलता येईल.]

(१८) शौर्यपदक विजेत्या सैनिकाचे मनोगत

[मुद्दे : शौर्यपदक जाहीर झाले त्या वेळची भावना – सैन्यदलात प्रवेश घेण्याचा हेतू सफल – मनात भूतकाळ जागा – सैन्यदलाचे आकर्षण का व कसे? – आधुनिक काळातील संकटे कोणत्या स्वरूपाची? – माहितीजालावरील युद्धे – देशाला त्या दृष्टीनेही तयार राहण्याची गरज – सैनिकाचे काम न संपणारे.]

(१९) एका संगणकाचे मनोगत

[मुद्दे : कामे सुलभ, अचूक व वेगाने – प्रवास, बँका, खरेदी – विक्री इत्यादींसंबंधातील सर्व कामे सुलभ, घरबसल्या – कामकाजात पारदर्शकता – भ्रष्टाचाराला अटकाव – सर्व जग जवळ – जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल – माझ्या नावाला बट्टा लागला – गेम खेळणे, इतर कामे बाजूला ठेवून माझ्यातच बुडून जाणे, आरोग्याची काळजी न घेणे वगैरे – संकेतस्थळे हॅक करणे ही गुंडगिरीच – या अपप्रवृत्तींविरुद्ध लढणे आवश्यक.]

(२०) नापास झालेल्या विदयार्थ्याचे आत्मकथन

[मुद्दे : नापास होण्याचा दिवस – त्या दिवसाचा अनुभव – नापासानंतर पुढचा टप्पा? – कारणांचा शोध – निश्चय – अन्य कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न – पुढील शिक्षणात यश – अन्य कौशल्यांचा फायदा – व्यावसायिक यश.]

(२१) वृद्धाश्रमातील वृद्धाचे मनोगत

[मुद्दे : प्रवेश केला तेव्हा एक प्रकारची हुरहुर – बरेचसे दु:ख पण थोडी आशा – कालांतराने वातावरण स्पष्ट – सगळेच वृद्ध, सगळेच कमकुवत – आजारांनी त्रस्त झालेले – कंटाळलेले, हताश, दु:खी – घरातले चैतन्य नाही – – आधुनिक जीवनाची आपत्ती – मुलांना घरात म्हातारी माणसे नकोत – समविचारी, समानशील व्यक्तींनी, मित्रांनी म्हातारपणी एकत्र राहण्याचा निर्णय घेणे आवश्यक – स्वत:ला स्वत:तच रमवणारा छंद जोपासणे आवश्यक.]

(२२) सर्कशीतील हत्तीचे मनोगत

[मुद्दे : वृद्ध हत्ती – मनोगत – सध्या सर्कशीत प्राण्यांना बंदी – खूप आनंद – अत्याचार, फटके, गुलामगिरी यांतून सर्वांची मुक्तता – नाइलाजास्तव मनाविरुद्ध कामे करणे – खूप यातना – प्राणिमित्रांमुळे सुटका – पुढच्या जन्मात प्राणिमित्राचा जन्म मिळावा.]

(२३) पूरग्रस्ताची कैफियत

[मुद्दे : पूरग्रस्त मुलगा – जुन्या आठवणी – अनपेक्षित धक्का – झाडा – घरांची पडझड – अनेक घरांत मृत्यू – प्रचंड वाताहत – सगळीकडून मदतकार्य – भ्रष्टाचारामुळे अनेकजण मदतीला वंचित.]

4. कल्पनाप्रधान निबंध

(२४) माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर…

[मुद्दे : हास्य – फक्त माणसाला लाभलेली शक्ती – हास्य हे आनंदाचे, सुखाचे निदर्शक – हसण्याने दु:ख हलके – हास्यवृत्ती असलेली व्यक्ती स्वत:च्या उणिवांकडे तटस्थपणे पाहू शकते – विसंगती हेरण्याची शक्ती लाभते – कोणालाही न दुखावता उणिवा दाखवण्याची शक्ती लाभते – मन सदोदित उत्साहात राहते – कार्यशक्ती वाढते – सहकार्याची वृत्ती वाढते – ही शक्ती गमावल्यास माणसाचे फार मोठे नुकसान – जीवन रूक्ष वाळवंट होईल.]

(२५) झाडांनी प्राणवायू सोडायचे बंद केले तर…

[मुद्दे : झाडांमुळे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण टिकते – हवा शुद्ध राहते – झाडांनी प्राणवायू सोडणे बंद केल्यास भीषण परिणाम – वातावरणातील प्राणवायू हळूहळू नष्ट होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढेल – हरितगृह परिणाम दिसू लागतील – जागतिक तापमानात वाढ होईल – विविध सूक्ष्म जीवांची वाढ होईल – दोन्ही ध्रुवांकडील बर्फ वितळेल – समुद्रपातळीत वाढ होईल – हळूहळू बराच भाग पाण्याखाली जाईल – ऋतूंची साखळी विस्कटेल – जीवसृष्टीच नष्ट होईल.]

(२६) माणूस बोलणे विसरला तर…

[मुद्दे : माणसाला लाभलेली फार मोठी देणगी – विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्याचे साधन – सर्व माणसांना एकत्र ठेवणारी शक्ती – – एकमेकांशी संपर्क साधणे ही माणसाची मूलभूत गरज – भाषा नसेल तर माणसाची घुसमट – अनेक व्यावहारिक अडचणी – प्रगतीत फार मोठे अडथळे – न बोलण्यातून गमतीदार प्रसंग – भाषेअभावी आनंदाचा लोप – भाषेशिवाय माणूस अपूर्ण.]

(२७) परीक्षा नसत्या तर…
[मुद्दे : परीक्षांमध्ये गोंधळ उडण्याचे प्रसंग – परीक्षांचा त्रास – दडपण, भीती – सर्वांच्या अपेक्षांचे दडपण – परीक्षा नसत्या तर या अडचणी दूर – विदयार्थ्यांना मोकळा वेळ – पण नवीन अडचणी – कुवत, क्षमता तपासणे अशक्य – विविध पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड करणे कठीण – कोणतेही काम दर्जेदार होणे अशक्य – उच्च जीवनमान न मिळणे – प्रगती कठीण – समाजाचे नुकसान – परीक्षा आवश्यक.]

(२८) पाऊस पडलाच नाही तर…

[मुद्दे : पाऊस नकोसा वाटावा असा प्रसंग – पाऊस पडलाच नाही, तर पावसामुळे होणारे नुकसान टळेल – सर्वत्र चिखल होऊन सहन करावा लागणारा त्रास टळेल – गटारे तुंबणे, रस्त्यात पाणी साचणे इत्यादी अडचणी उद्भवणार नाहीत – रोगराईचा प्रसार उद्भवणार नाही – पुरामुळे होणारी अपरिमित हानी टळेल – परंतु शेती नसेल – अन्नधान्याचे उत्पादन नाही – वीज नसेल – शेती व उदयोगधंदे नष्ट – विलोभनीय सृष्टिसौंदर्याला पारखे होण्याची वेळ – पाऊस, पाणी हे सर्व निर्मितीचे आदिकारण – पाऊस हवाच.]

(२९) सूर्य उगवला नाही तर…

[मुद्दे : सकाळी वेळेवर उठण्याचा त्रास नाही – रस्त्यावर घाईगडबड नाही – घामाच्या धारा वा उन्हाचा ताप नाही – उन्हामुळे ओढे – नदी – नाले आटणार नाहीत – कितीही वेळ टी. व्ही. पाहता येणे – दिवस नसल्याने शाळेतील मित्र नाहीत – ज्ञानाचा विकास नाही – कारखाने – कार्यालये नसतील – नोकऱ्या नाहीत – पाऊस नसल्याने शेती नाही – उपासमार – प्राणिसृष्टी धोक्यात – सूर्य जीवनदाता – तो हवाच.]

(३०) वृत्तपत्रे बंद पडली तर…

[मुद्दे : हा विचार मनात आणणारा प्रसंग – वर्तमानपत्रात आदल्या दिवसापर्यंतच्याच बातम्या – वाचकांच्या प्रतिसादाला मर्यादित जागा – ताज्या ताज्या घडामोडींच्या समावेशाने इलेक्ट्रॉनिक माध्यमे सत्य लवकर जगासमोर आणतात – बातम्यांची विश्वासार्हता कमी होण्याचा धोका – बातमी पुन्हा तपासून पाहण्याची संधी जाणार – बातम्यांचे स्पष्ट आकलन होण्यास मदत – वर्तमानपत्र कुठेही वाचता येते – वर्तमानपत्रे बंद होणे अशक्य.]

(३१) परीक्षा नसत्या तर…

[मुद्दे : परीक्षा नसत्या तर हा विचार मनात आणणारा प्रसंग – वर्षअखेरीला तीन तासांत तपासणी ही चुकीची पद्धत – परीक्षेमुळे विदयार्थ्यांमध्ये भेदभाव – परीक्षेचा चुकीचा अर्थ – परीक्षा नसेल तर अनागोंदी – मिळालेल्या ज्ञानाची तपासणी म्हणजे परीक्षा – जीवनात प्रत्येक क्षणाला परीक्षा – परीक्षा नसेल तर कामे अशक्य – प्रगती अशक्य.]

(३२) भ्रमणध्वनी (मोबाइल) बंद झाले तर…

[मुद्दे : काही कारणांनी मोबाइलवर बंदी – अनेक दुरुपयोग थांबले – गैरवर्तन नियंत्रणात – पण अल्पावधीतच हाहाकार – अनेक अडचणींना सुरुवात – संवाद थांबला – व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बंद – म्हणून बैठकांमध्ये वेळाचा अपव्यय – कामांचा, निर्णयांचा वेग मंदावला – बँक सुविधांना वंचित – खरेदीविक्रीत अडथळे – आर्थिक मंदी – नोकऱ्यांमध्ये कपात – अभ्यासात, शासकीय कामांत अडथळे – नागरिकांच्या हातचे एक समर्थ साधन गायब.]

5. वैचारिक निबंध

(३३) स्त्री – कुटुंबव्यवस्थेचा कणा

[मुद्दे : कुटुंब हा समाजाचा महत्त्वाचा मूलभूत घटक – समाजाला टिकवून ठेवणारा – कुटुंबातील मुले, प्रौढ व वृद्ध या सगळ्यांची काळजी वाहिली जाते – म्हणून कुटुंब महत्त्वाचे – कुटुंबातील मुख्य स्त्रीमुळे कुटुंब टिकून राहते – मुलांच्या खाण्यापिण्याची, अभ्यासाची, भवितव्याची चिंता मुख्यतः स्त्रीच वाहते – वृद्धांच्या गरजांबाबत तीच दक्ष असते – घरातील सगळी माणसे भावनिकदृष्ट्या स्त्रीला बांधलेली – स्त्री नसेल तर घरातील वातावरण कोरडे होते; नाती विस्कटतात – स्त्रीच कुटुंबाला धरून ठेवते.]

(३४) समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी

[मुद्दे : आज देशापुढे अनेक आव्हाने – या आव्हानांना तरुणच सामोरे जाऊ शकतात – उदा., भ्रष्टाचार – कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास मानसिकदृष्ट्या तरुणच तयार असतात – ज्येष्ठ व्यक्ती तडजोडीला पटकन तयार होतात – यामुळे भ्रष्टाचाराला वाव – राजकारण – समाजकारण यांत सुधारणा आवश्यक – आधुनिक जीवनाला अनुसरून नवीन समाजरचना हवी – ज्येष्ठांना नवीन रचना झेपत नाही – उदयोग – व्यापारात धडाडी हवी – ज्येष्ठांपेक्षा तरुणच धडाडीने काम करू शकतात.].

(३५) संगणक साक्षरता : काळाची गरज

[मुद्दे : मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा प्रवेश – संगणकाबद्दल अनेक तक्रारी – मात्र, संगणकाचे अनेक फायदे – पावलोपावली संगणकाची गरज – संगणक साक्षरता अटळ – – अन्यथा प्रगती नाही.]

(३६) आजच्या काळातील बदलते स्त्री – जीवन

[मुद्दे : स्त्री – परंपरा – दोन पिढ्यांतील अंतर – शिक्षणाचे , परिणाम – पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण – स्त्रीचे वळण – 3 स्त्रीचे नवे वळण – नवी स्त्री स्वावलंबी – पुरुषप्रधान । संस्कृतीचे वर्चस्व – विविध क्षेत्रांत आघाडी – स्त्री – मुक्तीची वाटचाल – परिवर्तन.]

(३७) विज्ञानयुगातील अंधश्रद्धा

[मुद्दे : खूप पूर्वीपासून अंधश्रद्धांचा पगडा – एकोणिसाव्याविसाव्या शतकांत विज्ञानाचा प्रसार – विज्ञानावर आधारित यंत्रसामग्री व उपकरणे यांचा वाढता वापर – जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा वापर – पण वैज्ञानिक दृष्टीचा अभाव – अजूनही अंधश्रद्धा – अज्ञानी जनतेची फसवणूक, लुबाडणूक, पिळवणूक – प्रबोधनाची प्रचंड आवश्यकता.]

(३८) नववर्षाचे स्वागत

[मुद्दे : अलीकडच्या काळात फोफावलेला उत्सव – मागील वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत – जातपात, धर्म, पंथ, भाषा वगैरे सर्व भेदांच्या पलीकडे जाणारा उत्सव – सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी – पण अनिष्ट प्रवृत्तींचा आढळ – अनेक ठिकाणी केवळ धांगडधिंगा व धूम्रपान, मदयपान, अमली पदार्थांचे सेवन – याचे शुद्धीकरण आवश्यक.]

(३९) मुलगी झाली हो!
स्वागत करू या मुलीच्या जन्माचे!

[मुद्दे : मुलगी जन्मली की दुःख – स्त्रीला कमी लेखणे – मुलींना घरकामाला जुंपणे – मुलींच्या शिक्षणाला कमी महत्त्व – पण स्त्रीमुळे घराची प्रगती – स्त्री सुशिक्षित तर सगळे घर सुशिक्षित – अनेक उच्च पदांवर स्त्रिया समर्थपणे कार्यरत – स्त्रियांना समान हक्क आवश्यक – नाही तर देशाची प्रगती अशक्य – म्हणून ‘मुलगी झाली हो!’ या घटनेचे स्वागत करू या.]

(४०) संगणक : आपला मित्र

[मुद्दे : संगणकाच्या दुष्परिणामांची एक – दोन उदाहरणे – मुलांकडून होणारा दुरुपयोग – वृत्तींवर परिणाम – संगणकाचे उपयोग मुले कोणत्या कारणांसाठी करतात – संगणक मोकळेपणाने वापरू देणे व समजावून सांगणे – नवीन सुधारणांमुळे नवीन संकटे – म्हणून बंदी घालणे अयोग्य – संगणक आपला मित्र आहे – त्याचा योग्य उपयोग करायला शिकवणे आवश्यक.]

(४१) वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे

[मुद्दे : संत तुकाराम महाराजांची सुप्रसिद्ध उक्ती – त्या उक्तीतून वनस्पती, प्राणी, माणूस या सर्वांविषयीचे प्रेम व्यक्त – पृथ्वीवर फक्त माणूसच महत्त्वाचा नाही – अन्य जीवही महत्त्वाचे – सूक्ष्मातिसूक्ष्म जीवजंतूंपासून ते देवमाशासारख्या महाकाय प्राण्यांपर्यंत सर्वांना महत्त्व – यात पर्यावरणाचा समतोल – माणसाचे जीवन सुखकर होण्यासाठी, त्याच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा – झाडे लावा, झाडे जगवा.]

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 1 मामू Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

11th Marathi Digest Chapter 1 मामू Textbook Questions and Answers

1. अ. कोण ते लिहा.

प्रश्न 1.
चैतन्याचे छोटे कोंब :
उत्तर :
शाळेतील लहान मुले

प्रश्न 2.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:
उत्तर :
मामू

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 3.
शाळेबाहेरचा बहुरूपी :
उत्तर :
मामू

प्रश्न 4.
अनघड, कोवळे कंठ :
उत्तर :
शाळेतील लहान मुले.

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 3

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 4

इ. खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

प्रश्न 1.

  1. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ……………..
  2. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ………………
  3. मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.” ………………….
  4. माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो.” ……………..
  5. मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. ………………….

उत्तर :

  1. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. – देशभक्ती
  2. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. – मातृप्रेम/भावणाशीलता
  3. मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ – वात्सल्य
  4. माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो.” – हुशारी
  5. मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. – अभ्यासू वृत्ती

ई. खलील शब्द समूहाचा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
थोराड घंटा
उत्तर :
थोराड घंटा- दणकट, मोठी व वजनदार घंटा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
अभिमानाची झालर
उत्तर :
अभिमानाची झालर – झालरीमुळे शोभा येते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता. त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे.

2. व्याकरण.

अ. खलील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

प्रश्न 1.
इशारतीबरहुकूम
उत्तर :
हुकूम, तीर, रती, हुशार, रतीब

प्रश्न 2.
आमदारसाहेब
उत्तर :
आम, आब, आहे, आरसा, आमदार, दार, दाम, दाब, बसा, साम, सार, साहेब, बदाम, रसा(पृथ्वी), हेर, हेम (सोने), मदार.

प्रश्न 3.
समाधान
उत्तर :
नस, मान, मास, समान, मानस

आ. खलील वाक्प्रचाराचा अर्थ लिहन वाक्यात उपयोग करा :

प्रश्न 1.
चौवाटा पांगणे
उत्तर :
चौवाटा पांगणे – चहूबांजूना (चारी वाटांवर) विखुरणे, सर्वत्र पांगणे.
वाक्य : गावात दुष्काळ पडला नि गावकरी चौवाटा पांगले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
कंठ दाटून येणे
उत्तर :
कंठ दाटून येणे – गहिवरणे.
वाक्य : मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईंचा कंठ दाटून आला.

प्रश्न 3.
हरवलेला काळ मुठीत पकडणे.
उत्तर :
हरवलेला काळ मुठीत पकडणे – भूतकाळातील आठवणी जागृत होणे.
वाक्य : कैक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला.

इ. खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.

प्रश्न 1.
अनुमती, घटकाभर, नानातन्हा, अभिवाचन, जुनापुराणा, भरदिवसा, गुणवान, साथीदार, ओबडधोबड, अगणित
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 5
उत्तरः

उपसर्गघटितप्रत्ययघटितअभ्यस्त
भरदिवसासाथीदारओबडधोबड
अभिवाचनगुणवानजुनापुराणा
अनुमतीघटकाभर
नानातन्हा
अगणित

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

3. स्वमत:

प्रश्न अ.
‘शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे’, या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
‘मामू’ हा शिवाजी सावंत यांच्या ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणात्मक संग्रहातून घेतलेला पाठ आहे. या पाठात ‘मामू’ या व्यक्तीची व्यक्तिरेखा रेखाटताना त्याचे विविध पैलू दाखवले आहेत. प्रामाणिक, देशाभिमानी असलेला मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. कोल्हापूर संस्थान आणि लोकशाही अशा दोन्ही राज्यांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे.

असा हा मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो विविध भूमिका बजावताना दिसतो. शाळेत शिपायाचे काम करणारा मामू अतिशय प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतो. तो विविध भूमिकांतून आपल्यासमोर येतो. जसा एखादा बहुरूपी विविध रूपं घेऊन आपल्यासमोर येतो तसाच शाळेच्या बाहेर मामू आपल्याला विविध रूपांमध्ये भेटतो. कधी तो फळांच्या मार्केटमध्ये एखादया बागवानाच्या दुकानावर घटकाभर का होईना पण तेथे बसणारा दुकानदार होतो. ज्याप्रमाणे बहुरूपी सोंग चांगल्या रितीने वठवल्यावर मिळेल तेवढ्या पैशांवर समाधानी राहतो तसेच दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे देवाचा प्रसाद मानणारा समाधानी मामू भेटतो.

कधी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दूची शिकवण देणारा शिक्षक तर कधी मौलवी, व्यापारी, उस्ताद अशी विविध रूपे घेतो. कधी कुणाच्या पायाला लागलं तर कुठला पाला वाटून लावावा, पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा घ्यावा, शरीरयष्टी कशी कमवावी हे सांगणारा वैदय बनतो. वक्ता कसा बोलला हे सांगणारा परीक्षक बनतो, तर कधी चक्कर आलेल्या मुलाला डॉक्टरकडे नेताना आईच्या मायेने जपणारा, धीर देणारा, संवेदनशीलवृत्तीच्या व्यक्तीची भूमिका निभावतो. अशाप्रकारे मामू केवळ शाळेत काम करणारा शिपाई राहत नाही तर शाळेबाहेच्या लोकांना त्याची अनेक रूपे दिसतात. शाळेबाहेर वावरणारा तो बहुरूपीच आहे.

प्रश्न आ.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
शिवाजी सावंत यांच्या ‘मामू’ या कथेत मामूच्या स्वभावाचे, प्रामाणिकपणाचे, कष्टाळूपणाचे, संवदेनशील वृत्तीचे वर्णन आले आहे. ‘मामू’ गेल्या चाळीस वर्षापासून शाळेत शिपाई म्हणून काम करतो. तो अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आहे. त्याच बरोबर सहदयी आहे. मामूची म्हातारी आई गेल्यानंतर तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळतं.

‘दुनियेत सारं मिळेल सर; पण आईची माया कुणाकडनं न्हाई मिळायची’ हे बोलताना नातवंड असलेला मामू स्वतः लहान मुलासारखा भासतो तेव्हा त्याच्या संवेदनशीलवृत्तीचा परिचय येतो. शाळेतील एखादा मुलगा खेळताना किंवा प्रार्थनेच्या वेळी चक्कर येऊन पडला तर त्याला रिक्षातून दवाखान्यात नेताना त्या लहान मुलाला मायेने धीर देताना “घाबरू नकोस’ म्हणतो. यातून त्याची संवेदनशीलता व सहदयता दिसून येते.

मामूच्या संवेदनशीलतेची अनेक उदाहरणे मामूचे व्यक्तिचित्रण करताना शिवाजी सावंत यांनी दिली आहेत. (इ) मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा. उत्तरः ‘मामू’ या व्यक्तिचित्रणात्मक पाठात लेखक शिवाजी सावंत यांनी ‘मामू’ या व्यक्तिरेखेचे लक्षणीय शब्दचित्र रेखाटले आहे.

मामू हा शाळेचा शिपाई आहे. परंतु तो शाळेचा अविभाज्य भाग आहे. मामू डोक्याला अबोली रंगाचा फेटा बांधतो, अंगात नेहरू शर्ट आणि त्यावर गर्द निळं जाकीट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच असतं. खाली घेराची व घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान आणि पायात जुना पुराणा पंपशू असे अत्यंत साधे राहणीमान मामूचे आहे. मामूच्या चेहऱ्यावर सफेद दाढी आहे. परंतु चेहऱ्यावर कायम समाधान आणि नम्रतेचा भाव, चांगल्या व वाईट अनुभवाने समृद्ध मामू साधारणतः साठीचा आहे. परंतु म्हाताऱ्या शरीरातील मान मात्र उमदं आहे. अतिशय चित्रदर्शी लेखन शैलीत रंगवलेले मामूचे व्यक्तिचित्र त्याच्या राहणीमानामुळे व गुणांमुळे आपल्या चांगलेच लक्षात राहते व मामू डोळ्यासमोर उभा असल्यासारखे भासते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

4. अभिव्यक्ती

प्रश्न अ.
‘मामू’ या पाठाची भाषिक वैशिष्टये स्पष्ट करा.
उत्तर :
‘मामू’ हा पाठ शिवाजी सांवत यांनी लिहिलेला आहे. सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे शिवाजी सावंत हे त्यांच्या ‘मृत्युजंय’ आणि ‘छावा’ या दोन कादंबऱ्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुस्तकाबरोबरच अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना गौरवान्वित केले आहे… मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन या पाठात केले आहे.

समर्पक शब्दरचना आणि चित्रदर्शी लेखनशैली हे शिवाजी सावंत यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य पाठामध्ये अनेक वेळेला अनुभवायला येते. त्यांची शैली ही मध्ये मध्ये आलंकारिक होते, म्हणूनच प्रार्थना म्हणणारे विद्यार्थी असा सरळ उल्लेख न करता ते लिहितात ‘रांगा धरून उभे राहिलेले अनघड, कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात.

त्यांच्या या वर्णनामुळे निरागस भावनेने पटांगणावर प्रार्थना म्हणणारे विद्यार्थी अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहतात आणि गद्यलेखनाला काव्यात्मकतेचे रूप येते. विदयार्थ्याचा उल्लेख ते ‘चैतन्याचे छोटे कोंब’ असा करतात तर शाळेतील मोठ्या घंटेचा उल्लेख ‘थोराड घंटा’ असा करतात. इथे शब्दांची अनपेक्षित वेगळी रचना करून भाषेचे सौंदर्य ते वाढवितात. उदा. ‘कोंब’ हा शब्द झाडांच्या बाबतीत वापरला जातो तर ‘थोराड’ हा शब्द प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात वापरला जातो.

पण अर्थाचे रूढ संकेत लेखक झुगारून देतो आणि शब्दांबरोबरच अर्थाला नवीन सौंदर्य बहाल मामू हे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर शब्दशः ते उभे करतात, मामूची पांढरी दाडी, भुवया, डोक्याचा फेटा, अंगावरील नेहरू शर्ट, त्यावरील जाकीट पकिट वाँच, चुणीदार तुमान, पंपशू यांचे ते तंतोतत वर्णन करतात. त्यामुळे मामू या व्यक्तिमत्त्वाची छबी हुबेहुब डोळा हा उर्दू जाणणारा मुस्लिम माणूस असल्याने त्यांच्या तोंडची भाषा तशीच वापरून ते उर्द, हिंदी आणि बोलीभाषेचा समर्पक वापर करतात आणि लिहितात, ‘परवा परवा मामुची बुली आई अल्लाला प्यारी झाली.’

किंवा ‘लग्न ठरलं’ या शब्दाऐवजी मुस्लिम संस्कारातील ‘शादी मुबारक’, ‘अल्लाची खैर’ असे शब्द वापरतात. ‘अभिमानाची झालर त्यांच्या मुखड्यावर उतरते’ अशा शब्दांमुळे अर्थाचा आंतरिक गोडवा जाणवतो. त्यांच्या बऱ्याच शब्दरचनांमध्ये आशयाची आणि विचारांची संपन्नता जाणवत राहते. उदा. ‘धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी.’ परीक्षा केंद्रावर परीक्षेआधी जी तयारी करावी लागते त्याचे वर्णन ते अत्यंत बारकाईने करतात आणि या परीक्षेच्या जोरावर आयुष्यात यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्या विदयार्थ्याच्या मागे शाळेतील शिपाई वर्ग किती जबाबदारीचे काम पार पाडतात हे दाखवून देतात. त्यामुळे ते नुसते पूर्वपरीक्षा वर्णन राहत नाही तर चतुर्थ श्रेणी वर्गाच्या श्रमाची दखल यानिमित्ताने ते घेतात. लेखकाची लेखणी जेव्हा सर्वसंपन्न असते तेव्हा सामान्य व्यक्तिमत्त्वाचे असामान्य पैलूही दमदारपणे साकार होतात याचा प्रत्यय हे लेखन वाचताना येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न आ.
‘मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.
उत्तर :
लेखक शिवाजी सावंत यांच्या लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रण संग्रहातून ‘मामू’ हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ घेतला आहे. या पाठात मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण केलेले आहे. मामू हा शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. गेली चाळीस वर्षे शाळेत शिपाई म्हणून काम करणारा मामू शाळेबाहेरही विविध भूमिकांतून आपल्यासमोर येतो. फळांच्या मार्केटमध्ये एखादया बागवानाच्या दुकानावर बसतो. दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे अल्लाची देन मानतो, त्याविषयी कोणतीही तक्रार करत नाही. यातून त्याची नि:स्वार्थी वृत्ती, नम्रता, सेवाभाव जाणवतो. तर कधी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दूची शिकवण देतो. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मामू’ आहे.

कर्तबगार, समाधानी आयुष्य जगणारा मामू मुलाच्या लग्नाला आलेल्या अधिकारी वर्गाचे आभार मानायला विसरत नाही. इतका तो कृतज्ञशील आहे. तो मुलांनाही आपल्यासारखे केवळ गुणवान बनवत नाही तर आज्ञाधारकही बनवतो. त्यांच्यासाठी कर्तव्यतत्पर असतो. बदलत्या काळानुसार मुलाला शिक्षणाची संधी देतो. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळेच त्याच्या मुलांच्या लग्नाला आमदार, खासदारपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वच उपस्थित राहातात.

हीच त्याच्या आयुष्यभराची कमाई आहे, आईविषयीच्या आठवणी सांगताना भावूक झालेल्या मामूचे मातृप्रेमही जाणवते. कोणत्याही वर्षीचं रजिस्टर अचूक शोधून मामू माजी विदयार्थ्याला मदत करतो तर सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांची तयारी करताना त्याची कार्यतत्परता दिसून येते. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेस एखादा विदयार्थी चक्कर येऊन पडला तर त्याला दवाखान्यात नेणारा मामू माणुसकीचे दर्शन घडवतो. राष्ट्रीय सणांच्या दिवशी ध्वजवंदन करताना देशाविषयी नितांत प्रेम, आदर व कर्तव्यनिष्ठा दिसून येते.

वैदयकक्षेत्रातील ज्ञानही त्याला आहे आणि सहज जाता जाता तो त्याची माहिती देतो, यात कुठेही सल्ले देण्याचा आव नसतो. शाळेतील एखादया कार्यक्रमात वक्ता कसा बोलतो यासंबंधी निरीक्षणक्षमतादेखील त्याच्याकडे आहे. अशाप्रकारे मामू ही फार साधी, सरळ, प्रामाणिक, नम, कर्तव्यपरायण, देशाबद्दल प्रेम असणारी, सेवाभवी, सहृदयी, नि:स्वार्थी, हुशार अशी व्यक्ती आहे.

प्रश्न इ.
‘माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!’ या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
माणूस कोणत्याही जाती, धर्माचा असो त्याच्यामध्ये माणुसकी नसेल तर त्याला माणूस कसं बरं म्हणावं? आज समाज फारच बदलतोय, प्रत्येक गोष्टीसाठी माणसं फार आग्रही होत चालली आहेत. जात, धर्म यांच्या नावावर माणसं स्वतःचे स्वार्थ साधून संधीसाधू होऊ पाहत आहेत. अशावेळी माणसाचा माणसावरचा विश्वास संपत चालला आहे असं वाटतं खरं पण गंमत अशी की जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा एकमेकांच्या विरोधात भांडणारी, सूड उगवणारी माणसं मदत करण्यासाठी पुढे सरसावतात.

मग त्यांच्यातील वैर संपून जातं. एखादं पोर गाडीखाली येत असेल तर चटकन कुणीतरी पुढं होऊन त्याला वाचवतं, कणी हॉस्पिटलमध्ये असेल त्याला रक्ताची गरज असेल तर कित्येक लोक मदतीला धावून जातात, आताच्या काळात कोणी कोणाचं नसतं असं म्हटलं जातं खरं पण तरीही एनजीओ चालवणाऱ्या संस्था वाढत आहेत, त्यामुळे माणूस कितीही स्वार्थी असला तरी तो त्याचं सामाजिक भान विसरलेला नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रकल्प :

प्रश्न 1.
‘तुमच्या परिसरातील अशी सामान्य व्यक्ती की जी तिच्या स्वभावामुळे असामान्य झाली आहे त्या व्यक्तीचे वर्णन तुमच्या शब्दात करा.
उत्तर :
रजनी ही आमच्या घरी काम करायला येणारी ताई. प्रचंड हुशार आणि तल्लख बुद्धीची तितकीच विनम्रही. आमच्याकडे ती कामाला यायला लागली तेव्हा ती आईला म्हणाली, ‘ताई, मी लहानपणापासून घरकाम करतेय पण प्रत्येक घराची पद्धत वेगळी. तुम्ही तुमच्या घरातील कामं शिकवाल ना? हे ऐकून आई खूप आनंदित झाली. असं तिला मायेने बोलणारी बाई पहिल्यांदाच भेटली होती. आईने जे शिकवलं तसं तसं ती अजून नीट काम करू लागली. माझ्या धाकट्या भावालाही जीव लावला.

घरातल्या पैपाहुण्यांची उठबस करावी ती रजनीताईनेच. हळूहळू तिनं आमच्या कॉलनीत सर्वच घरकाम करणाऱ्या बायकांना एकत्र आणलं. प्रत्येकीला मदत करण्याच्या स्वभावामुळे बायका तिच्याजवळ मन मोकळं करू लागल्या. त्या सर्वांच्या मनात ताईबद्दल केवळ स्नेह आहे. आता काही महिन्यांपूर्वी ताईने या बायकांसाठी एक भिशी सुरू केली. त्यातील पैसे घरकामवाल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असा निर्धार तिने केला.

आश्चर्य म्हणजे आमच्या आईने, शेजाऱ्यांनी पुढाकार घेऊन घरकामवाल्या मावशांच्या मुलांसाठी शाळेची फी भरण्यासाठी वर्गणी जमा केली आणि बँकेत ती रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केली. जवळजवळ एक लाख रुपये जमा झाले. या सर्वांचे क्रेडिट केवळ रजनीताईला दिलं जातंय. असं म्हटलं जातं की ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास’ हे रजनीताईकडे बघून यथार्थ वाटतं.

11th Marathi Book Answers Chapter 1 मामू Additional Important Questions and Answers

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
मामूच्या घरी असलेला कार्यक्रम – [ ]
उत्तरः
मामूच्या घरी असलेला कार्यक्रम – गृहप्रवेश

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 6
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 7

प्रश्न 3.
मामूने माईक हातात घेतला कारण –
उत्तरः
लग्नासाठी जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी मामूने माईक हातात घेतला.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

उपयोजित कृती :

खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांच्या जाती ओळखा.

प्रश्न 1.
त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली.
पैसा कमावतात म्हणून माज नाही.
उत्तर :
पांढरी – विशेषण, राहिली- क्रियापद
म्हणून – उभयान्वयी अव्यय.

प्रश्न 2.
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
मामून पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं,
उत्तर:
संयुक्त क्रियापद

खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

प्रश्न 1.
अ. पाखरागत : ………
आ. मजल्यावर : ………..
उत्तर :
अ. पाग, पारा, राग, रात, गत, खत, खग, खरा, तग, गरा
आ. मज, वर, जर, रज, जम, जमव

खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.

प्रश्न 1.
अ. सर्टिफिकेट (certificate) –
उत्तर :
अ. प्रमाणपत्र, कॉमर्स (commerce) वाणिज्य / व्यापार

आकलन कृती

प्रश्न 1.
मामूची शाळा या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचे केंद्र आहे.
उत्तरः
ड्रॉईंगच्या
कॉमर्सच्या

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
परीक्षेच्या काळात मामू करत असलेली कामं
उत्तरः
नंबर टाकणं
बैठक व्यवस्था करणं
पाण्याची व्यवस्था करणं

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 8
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 9

खालील ओघतक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 10
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 11

प्रश्न 2.
राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहण्याची पद्धत –
उत्तर :
राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उचावून बघत राहण्याची पद्धत – फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवणे

स्वमत:

प्रश्न 1.
मामूच्या जनसंपकाविषयी तुमचे मत व्यक्त करा.
उत्तर :
मामू हा पडेल ती काम करणारी व्यक्ती, शिपाई असूनही त्याची शाळा, समाज यांविषयीची आस्था त्याच्या कामातून, वागण्यातून दिसून येते. मामू ज्या शाळेत काम करतो ती शाळा सरकारी आहे. तिथं पडेल ती कामे तो करतो. शाळेतल्या मुलांच्या, भावनांची, शरीराची, अभ्यासाचीही काळजी घेतो. तिथल्या शिक्षकांची, इमारतीची त्याला काळजी असते. त्याच्या अशा काळजीवाहू स्वभावामुळे लोक त्याच्यावरही जीव टाकतात. त्यामुळे राष्ट्रीय सणांना त्याच्या हस्ते ध्वनही फडकवला जातो.

शाळेत कुणी पाहुणे आले तर त्याला त्यांच्या पाहुणचाराविषयी फार सांगावे लागत नाही. तो त्यांच्या पदाला साजेसे आदरातिथ्य करतो. या त्याच्या लाघवी स्वभावामुळे तो सर्वानाच हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्याच्या मुलाच्या लग्नातही बडी बडी मंडळी आलेली होती. शाळेतल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना कधीच तो मागे पाहत नाही. प्रेमळ, नम्र, लाघवी बोलण्यामुळे त्याचा चाहता वर्ग त्याने निर्माण केला आहे. तो सर्वांच्या मदतीला गेल्यामुळे त्याच्याही मदतीला लोक धावून जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

मामू Summary in Marathi

प्रस्तावनाः

लेखक शिवाजी सावंत यांचे चरित्रात्मक कादंबरीलेखन हे आवडते लेखनक्षेत्र, ‘छावा’, ‘युगंधर’, ‘लढत’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत. ‘मृत्युंजय’ ही त्यांची लोकप्रिय कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखनकर्तृत्वाचे शिखर आहे. ‘अशी मने असे नमुने’, ‘मोरावळा’ ‘लाल माती रंगीत मने’ हे ‘व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध’ भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ तसेच सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने पाच वेळा त्यांचा गौरव केला असून पुणे विद्यापीठातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचे नामांकन झालेले होते.

सर्वोत्कृष्ट वाङ्मयकार म्हणून परिचित असलेले शिवाजी सावंत’ यांनी ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणातून मामू या व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी, सहृदयी असलेला ‘मामू’ माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. ‘मामू’ च्या जीवन प्रवासाचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

पाठाचा परिचय :

सर्वोत्कृष्ट वाङमयकार म्हणून परिचित असलेले ‘शिवाजी सावंत’ यांनी ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणातून मामू या व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी, सहदयी असलेला ‘मामू’ माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. ‘मामू’ च्या जीवन प्रवासाचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

शाळेची घंटा वाजवल्यानंतर मुलांनी प्रार्थनेसाठी रांगा केल्या व हात जोडून, डोळे मिटून भावपूर्ण सुरात प्रार्थना म्हटली. ‘मामू’ मात्र दगडी खांबाला टेकून विचारमग्न झालेला होता. ‘जनगणमन’ सुरू होताच पाय जोडून सावधान स्थितीत उभा होता.

कोल्हापूर संस्थानातील राजाराम महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत मामू चाळीस वर्षे या शाळेत काम करतो आहे. त्यानं दोन राज्य बंधितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं, कोल्हापूरच्या कैक पिढ्या त्याने बघितल्या आहेत, संस्थानाच्या काळात महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर असताना मामूची चौदा मैलांची पायपीट व त्याच्या साथीदारांसह आलेला अनुभव तो अभिमानाने सांगतो. संस्थाने विलीन झाली, मामूसारखा चाकर वर्ग (कामगार वर्ग) पांगला गेला आणि मामू या शाळेत शिपाई म्हणून हजर झाला.

डोक्यावर अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्ट व त्यावर निळे जाकिट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं जुनं घड्याळ, घोट्यापर्यंत पायजम्यासारखी तुमान, पायात जुना बूट (पंपशू) अशी मामूची साधी राहणी आहे.

शाळेच्या बाहेरही माम् अनेक कामे करतो. फळांच्या दुकानावर काही वेळा फळे विकणे आणि तो मालक जो मोबदला देईल तो घेणे. एखादया मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दू शिकवणे, त्याचप्रमाणे मौलवी, व्यापारी, उस्ताद अशी अनेक रूपे त्यांची दिसतात.

लेखक मामूला दहा वर्षांपासून अनुभवतो आहे. मामू गरीब असला तरी हुशार आहे. त्याची मुलं गुणवान आहेत, पैसे कमवतात, मामूचा शब्द पाळतात, मामूच्या निमंत्रणानुसार त्याच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाला लेखक गेले. तेथे खासदार, आमदार, शिक्षक, व्यापारी, प्राध्यापक, उपस्थित होते. त्याचं समाधान सर्वांचे आभार मानताना त्याच्या सफेद दाढीवर दिसत होतं.

धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. या विचारांची रुजवणूक ‘मामू’ कडे बघून होते. मामूचा शेवटचा मुलगा एस.एस.सी पास झाल्यावर लेखकाच्या सांगण्यावरून त्यानं त्याला कॉलेजात दाखल केलं.

मामूची आई देवाघरी गेल्यानंतर आईची आठवण सांगताना नातवंडं असलेला मामू लहान मुलासारखा वाटतो आणि आईची माया जगात कुठेच मिळत नाही, असे सांगताना त्याचे डोळे पाणावतात.

शंभर वर्षे जुना असलेल्या शाळेतला रेकॉर्ड मामू अचूक शोधून आणतो. माजी विद्यार्थी 1920-22 सालचा दाखला मागतो. त्यावेळी मामू अचूक ते रजिस्टर शोधून काढतो व वेळेत दाखला मिळाल्यावर त्या विदयाथ्याने मामूला चहासाठी आग्रह केल्यावर, चहा पिताना मामूच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षा शाळेत असल्या की, म्हाताऱ्या मामूच्या पाखरासारख्या हालचाली सुरू होतात.

कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळी एखादा मुलगा चक्कर येऊन कोसळला तर मामू रिक्षा आणून त्या मुलाला मायेने धीर देकन डॉक्टरकडे घेऊन जातो. त्याला वैदयकाचंही ज्ञान आहे. तो एखादया शिक्षकाला तब्येत सुधारण्यासाठी खारका खाण्याची पद्धत सांगतो. कुणाच्या पायाला लागलं तर कोणता पाला वाटून त्यावर लावावा याचा सल्ला मामू द्यायला विसरत नाही.

सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मामूच्या हाताने राष्ट्रध्वज दंडावर चढतो व राष्ट्रगीत संपेपर्यंत मामू मान उंचावून झेंड्याकडे अभिमानाने बघत राहतो.

लेखकाकडे कुणी पाहुणा आला आणि नुसती मान डोलवली की, तोच इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. मामू एखादया कार्यक्रमाच्या वेळी मुलांसमोर दहा-वीस मिनिटे बोलू शकतो.

शाळेतील कार्यक्रमाचे नेहमीप्रमाणे मामू नियोजन करत असतो. त्या कार्यक्रमात वक्ता कसा बोलतो ते एका कोपऱ्यात उभे राहून ऐकतो. कार्यक्रम संपल्यानंतर मामूला कार्यक्रमाबद्दल विचारणा झाली तर तो म्हणतो. बोलला चांगला तो, पण म्हणावी तशी रंगत आली नाही.

सरकारी नियमाप्रमाणे आणखी वर्षभरानंतर मामू आमच्यात नसेल पण असेच मामूच्या हातांनी शाळेत घंटेचे घण घण घण टोल पडत राहावे आणि हात जोडून व मिटल्या डोळ्यांनी प्रार्थना ऐकत बूला मामू दगडी खांबाला रेलून विचारात कायम हरवलेला बघायला मिळावा अशीच लेखकाची इच्छा आहे.

शाळेत शिपाई म्हणून काम करत असताना कर्तव्यनिष्ठ, नम्र, तत्पर, संवेदनशील वृत्तीमुळे मामू स्वतःचे वेगळे स्थान शाळेत निर्माण करतोच पण त्याची ग्रामीण भाषाही मनाला भिडणारी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. चर्या – भाव/छटा – (feeling, emotion)
  2. अंतर्भाव – समाविष्ट – (inclusion)
  3. अनघड – अपरिपक्व, न घडलेला – (immature)
  4. मासला – उदाहरण – (example)
  5. कंठ – स्वर निघतो तो अवयव – (throat)
  6. अज्ञात – अपरिचित, माहिती नसलेला – (unknown)
  7. आळवणे – सुस्वराने गाणे
  8. कोंब – अंकुर – (a sprout)
  9. मुखडा – चेहरा – (face)
  10. विलीन – समाविष्ट – (absorbed in. mereed)
  11. अवाढव्य – खुप मोठे – (hure)
  12. इमानी – प्रामाणिक – (an honest)
  13. तुमान – पॅन्ट – (loose trousers)
  14. पंपश् – पायातील बूटाचा प्रकार
  15. चण – शरीरयष्टी – (figure)
  16. उमदा – उदार, मोकळ्या मनाचा – (noble, generous)
  17. उय – पद्धत (manner of action)
  18. अगणित – असंख्य, मोजता न येणारे – (countless, innumerable)
  19. वैदयक – वैदयशास्त्र – (the science of medicine).

वाक्प्रचार व त्याचे अर्थ :

  1. गुंतून पडणे – विचारमग्न होणे.
  2. इशारत मिळणे – आदेश मिळणे, खुणावणे, ऑर्डर मिळणे.
  3. चौबाटा पांगणे – चहुकडे पांगणे.
  4. पारख करणे – ओळखता येणे.
  5. चाकरी करणे – नोकरी करणे.
  6. चीज होणे – योग्य फळ मिळणे, यश प्राप्त होणे, कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.
  7. निधार बांधणे – ठाम निश्चय करणे.
  8. आब असणे – नाव असणे / नावलौकिक असणे / भूषण असणे.
  9. रुजू होणे – दाखल होणे.
  10. लकडा लावणे – एखादया गोष्टीसाठी खूप मागे लागणे.
  11. नेट धरणे – धीर धरणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 2 प्राणसई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

11th Marathi Digest Chapter 2 प्राणसई Textbook Questions and Answers

कृती

1. अ. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. कवयित्रीने जिला विनंती केली ती – [ ]
  2. कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा – [ ]
  3. कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी – [ ]
  4. शेतात रमणारी व्यक्ती – [ ]

उत्तर :

  1. कवयित्रीने जिला विनंती केली ती – प्राणसई
  2. कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा – राक्षसी
  3. कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी – पाखरे.
  4. शेतात रमणारी व्यक्ती – सखा.

आ. कारणे लिहा :

प्रश्न 1.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत;
उत्तर :
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 2.
बाळांची तोंडे कोमेजली;
उत्तर :
बाळांची तोंडे कोमेजली; कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत.

इ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 2

2. अ. खालील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
विहिरीच्या तळीं खोल दिसू लागलें ग भिंग :
उत्तर :
कडाक्याच्या उन्हामुळे भूमी करपून गेली, नदया, विहिरीदेखील आटून गेल्या. विहिरीच्या तळाला अगदी कमी पाणी राहिल्यामुळे ते अगदी भिंगासारखे दिसू लागले आहे. भिंगाचा वापर केल्यावर कोणतीही छोटी गोष्ट मोठी दिसू लागते. इथे पाणी विहिरीच्या तळाशी गेले यावरून पाण्याची समस्या किती मोठं रूप धारण करणार आहे याची जाणीव कवयित्री व्यक्त करते.

प्रश्न 2.
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
उत्तर :
पाऊस न आल्यामुळे सगळं वातावरण बिघडून गेले आहे. वातावरण तप्त झालेले आहे, म्हणून कवयित्री आपल्या प्राणसईला मैत्रीखातर बोलावत आहे. या प्राणसईने दौडत धावत आपल्या शेतावर यावं असं वाटतं. शेतात धान्याची बीज पेरलेली आहेत त्यांना वेळेवर पाणी मिळालं नाही तर ती सुकून जातील, शेतातील पिकावरच अवघं जग जगत असते. म्हणून कवयित्री आपल्या शेतावर येण्याचं निमंत्रण पावसाच्या सरींना देते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 3.
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं:
उत्तर:
प्राणसई असलेल्या पावसाच्या सरींनी भूमीवरच्या सर्वांना भेटायला यावे असे कवयित्रीला वाटते. ती यावी याकरता ती पाखरांसवे प्राणसई पावसाला निरोप पाठवत आहे. त्या पावसाच्या सरींनी गार वाऱ्यासवे झुलत झुलत आपल्या समवेत यावे असे कवयित्रीला वाटते. त्या पावसाच्या सरींनी आपले घरही चिंब भिजावे असं मनोमन तिला वाटते.

आ. खालील तक्त्यात सुचवल्याप्रमाणे कवितेच्या ओळी लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 3
उत्तर :

प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळीप्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळीप्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळीमालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी
ये गये ग घनावळी मैत्रपणा आठवून ……प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून ?मन लागेना घरांत : कधी येशील तू सांग ?शेला हिरवा पांघरमालकांच्या स्वप्नांवर

3. काव्यसौंदर्य

अ. खालील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘कां ग वाकुडेपणा हा,
कांग अशी पाठमोरी?
वाऱ्यावरून भरारी.
ये ग ये ग प्राणसई’
उत्तर :
कवयित्री इंदिरा संत या पावसाच्या सरींना घनावळींना आपली मैत्रीण मानतात. या मैत्रिणीने आता फार विसावा घेतला. तिच्या भेटीची आतुरता कवयित्रीला लागून राहिली आहे. पण ही हट्टी घनावळी मात्र पाखरांसवे निरोप पाठवून, विनवणी करूनही येत नाही, त्यामुळे कवयित्रीचा जीव कासावीस होतो. शेतात बैल काम करेनासे झाले आहेत, तान्हुल्या बाळांचे चेहरे उन्हाच्या झळांमुळे सुकून गेले आहेत.

नदीचे, विहिरीचे पाणी आटू लागले आहे. अशी जीवघेणी परिस्थिती पाऊस वेळेवर न आल्यामुळे झाली आहे. जर हा पाऊस आपला सखा आहे असं आपण म्हणतो, जर ती सखी आहे असं कवयित्रीला वाटतं तर तिनं फार आढेवेढे न घेता आपल्या सख्यांना भेटायला यायला हवे. तिच्यावर अवधी सृष्टी अवलंबून आहे. त्यांचे प्राण कंठाशी येईपर्यंत तिने वाट पाहू नये. त्यामुळे कवयित्रीला वाटतेय की या प्राणसईने वाकडेपणा सोडावा, राग, रुसवा सोडावा. पाठमोरी होकन राग रुसवा धरून मनं व्याकूळ करण्यापेक्षा वायसवे धावत ये. सगळ्यांना चिंब कर. इतरांना सुख देण्यातच आनंद असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 2.
‘शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नावर’.
उत्तर :
प्राणसईने या वर्षी भेटीसाठी विलंब केल्यामुळे सगळेचजण हवालदिल झाले आहेत. जमीनही तप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी आपली कर्तव्ये पूर्ण केली आहेत. कवयित्रीचा सखाही शेतकरी आहे. प्राणसई धावून आली की संपर्ण शेत हिरवेपणाने भरून जाईल. हिरवेपणाचा शेला (शाल) धरतीवर पांघरला जाईल. अवधी सृष्टी चैतन्यमय होईल. तिचं सोबत असणं गरजेचं आहे. मालकाची स्वप्नंही तिच्यावर अवलंबन आहेत. ही घनावळी आली की पिके जोमानं वाढतील. घरीदारी आनंद निर्माण होईल. आपल्या घरात, देशात आपल्या कष्टामुळे आनंद मिळावा हे मालकाचं स्वप्नं पूर्ण होईल.

आ. कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पीठ कांडते राक्षसी –
उत्तर :
उन्हामुळे सगळीकडे तप्त झालेले वातावरण (राक्षसी) प्रतीक

प्रश्न 2.
बैल झाले ठाणबंदी
उत्तर:
उन्हाची तीव्रता अधिक झाल्यामुळे बैलही काम करेनासे झाले. (ठाणबंदी) प्रतीक

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 3.
तोंडे कोमेली बाळांची
उत्तर:
उन्हाच्या झळांमुळे बाळांची तोंडे कोमेजली आहेत. (कोमेली) प्रतीक,

इ. कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे, स्पष्ट करा.

प्रश्न 1.
कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे, स्पष्ट करा.
उत्तर:
कवयित्री इंदिरा संत यांची प्राणसई घनावळी आहे म्हणजे पावसाच्या सरी आहेत. ही घनावळी कवयित्रीची प्राणसखीच आहे. तिच्या भेटीसाठी कवयित्री आतुर झालेली आहे. कवयित्रीने अगदी हक्काने तिला भेटण्यासाठी आमंत्रणं पाठवली आहेत. प्राणसई कुठे तरी गुंतून राहिली याबाबत कवयित्री काळजी व्यक्त करते.

पाखरांच्या हाती तिने या घनावळीला निरोप पाठवला आहे. आपला मैत्रपणा आठवून तिनं दौडत यावं असं कवयित्रीला वाटत आहे. ती आल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही असंही ती म्हणते. आपल्या या सखीने येऊन शेत, घरं, दारं यांना चिंब भिजवावं असं हक्काने सांगते असा हक्क मैत्रीतच दाखवता येतो. ही सखी आल्यानंतर तिने कितीही आढेवेढे घेतले तरी कवयित्री तिला समजावून सांगणार आहे की तिचे येणे या भूतलावर किती महत्त्वाचे आहे ते. तिच्याशी गप्पा मारून आपल्या सख्याचे कौतुक ती सांगणार आहे.

4. अभिव्यक्ती:

प्रश्न अ.
तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
उत्तर :
मी मुंबईतील एका चाळीत राहतो. मार्च ते मे महिन्याचा कालावधी मुंबईकरांच्या दृष्टीने त्रासदायक असतो. मार्चपासून जो तीव्र उन्हाळा सुरू होतो तो जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनुभवतो. उन्हामुळे जीवाची काहिली होते त्यात वीजपुरवठा मधून मधून जात असतो. काही विभागात तर पाणीपुरवठाही कमी असतो. दोन दिवसाआड पाणी आले की ते पाणी भरण्यासाठी माणसांची झुंबड उडते. घामाच्या धारा इतक्या वाहू लागतात की घरात ए.सी., पंखा लावून शांत बसावं असं वाटतं. याच काळात परीक्षा असतात. विदयाथ्यांचे वीज नसल्यामुळे हाल होतात. इथल्या वातावरणाला कंटाळून गावालाही जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न आ.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
उत्तर :
उन्हाळ्यामुळे वैतागून गेलेला जीव पावसाची आतुरतेने वाट पहात असतो. पावसाच्या आधी महानगरपालिकेने साफसफाईची धोरणं आखून काम केलेलं असत, आमच्या विभागात आम्ही नागरिक चाळीची कौलं, घरांची छप्परं यांची दुरुस्ती करून घेतो. पाऊस आल्यानंतर सुखद गारवा सगळीकडे पसरतो, ओलीचिंब झालेली धरणी, त्यावर चढू लागलेली हिरवळ मनाला आनंद देते. जोरजोरात पाऊस पडताना कौलांतून गळणारे पाणी अडवण्यासाठी आमची जाम धावपळ होते. कधीकधी आमच्या विभागात पाणीदेखील साठतं, मग त्यांना मदत करण्यासाठी अख्खी वस्ती पुते येते, गटार, नाले यांचा दुर्गध सर्वत्र पसरतो आणि नंतरचे काही दिवस रोगराईला सामोरं जावं लागतं. मैदाने, रस्ते यांच्यावर फेकलेला कचरा त्यातून निघणारा कुबट वास जीव नकोसा करतो. आधी हवाहवा वाटणारा पाऊस अशावेळी मात्र नकोसा वाटू लागतो.

प्रश्न इ.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो ते लिहा.
उत्तर:
पाऊस म्हणजे आनंद, तृप्ती, मलाही पाऊस आवडतो. पावसानंतर सर्वात जास्त आनंद होत असेल तर कोणाला ? धरित्रीला. हो. पृथ्वीला. आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पृथ्वीलाही त्याला भेटण्याची ओढ लागलेली असते. पावसानंतर सष्टीला चैतन्य प्राप्त है भरभरून वाहू लागतात. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही अंशी संपलेला असतो. मुंबईतील तलाव भरले गेले की मुंबईकर आपल्याला वर्षभर पाणी मिळेल- या आशेने आनंदीत होतात. बळीराजा जो सातत्याने कष्ट करत असतो त्याच्या शेतात आता धनधान्य पिकणार असतं. पाऊस हा अशी आनंदाची पर्वणी घेऊन आलेला असतो.

5. रसग्रहण.

प्रश्न 1.
‘प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर:
कवयित्री इंदिरा संत या मराठी साहित्यविश्वातील एक ख्यातनाम ज्येष्ठ कवयित्री आहेत. प्राणसई ही त्यांची कविता पावसाला उद्देशून आहे. उन्हाळ्यामुळे वातावरण तापलेले आहे. राक्षसासारखे ऊन कडाडले आहे. ते अक्षरशः वातावरणाचे पीठच काढते आहे. तीव्र उन्हाळ्याचे चटके कोणालाही सहन होईनासे झाले आहेत हे एका प्रतीकातून इंदिराबाई स्पष्ट करतात ‘पीठ कांडते राक्षसी पीठ कांडते’ हे कष्टमय काम पण ते भरपूर प्रमाणात केले जाते तेव्हा त्याला राक्षसी म्हटले जाते. अशावेळी प्राणसई म्हणजे पाऊस कुठे बरी गुंतून राहिली? असा प्रश्न कवयित्रीला पडतो.

सई म्हणजे सखी हा शब्द योजताना कवयित्रीच्या मनात पाऊस हा सगळ्यांचाच प्राण आहे त्यामुळे कवयित्रीने प्राणसई ही उपमा पावसासाठी उपयोजिली आहे. प्राणसईने भेट दयायला फारच दिरंगाई केली त्यामुळे कवयित्रीने आपल्या सखीला भेटण्याकरता पाखरांसवे बोलावणे पाठवले आहे, या पावसांच्या सरींना ती घनावळी म्हणतेय, व्याकूळ मनाला घनावळीच साद देऊ शकतात. आपल्यातील सख्य, मैत्रपणा आठवून आता या पृथ्वीवर धावत ये, दौडत ये अशी विनवणी कवयित्री करत आहे.

प्राणसखी धनावळी भेटायला येण्याचा काळ ओसरून गेला परंतु ती आली नाही.पाऊस आला की सगळे वातावरण ओले चिंब होते. भाज्या, धान्य यांच्या बी-बियाण्यांच्या आळी जमिनी भाजून करून ठेवल्या आहेत. ती आली की या बियाण्यांमधून रोपे तयार होतील आणि त्याच्या वेली सर्वत्र पसरतील, पावसाळ्यात डासांचा, कीटकांचा त्रास होतो. अशावेळी शेणकुळी जाळल्या जातात.

त्यासाठी घरातील कोपरा रिकामा करून तिथे शेणी ठेवल्या आहेत. तीव्र उन्हाळ्यामुळे बैलही ठाणबंदी झाले आहेत. कामासाठी ते तयार नसल्यामुळे मालकालाही काहीच सुचेनासे झाले आहे. तप्त झालेल्या धरणीतून गरम वाफा येतात त्यामुळे वाराही तप्त झालेला आहे. वरून उन्हें आग ओकत आहेत. याचा परिणाम कोवळ्या जीवावरही होऊ लागला आहे. लहान बाळांचे कोवळे जीव कासावीस झाले आहेत. त्यांचे चेहरे कोमेजून गेले आहेत हे स्पष्ट करताना कवयित्री ‘तोंडे कोमेली बाळांची’ अशी रचना करते.

उन्हाळ्याचे चार महिने संपले की आपसूकच ओढ लागते पावसाची. पण पावसाचे दिवस सुरू झाले असताना पावसाची’ एकही सर आली नाही त्यामुळे व्याकुळलेली कवयित्री आपल्या पाऊस सखीला पृथ्वीवर येण्यासाठी विनवणी करते आहे. ती प्राणसई न आल्यामुळे विहिरीचे पाणीदेखील अगदी तळाशी गेले आहे. ते भिंगासारखे दिसू लागले आहे.

असं कवयित्री म्हणते. भिंग ज्याप्रमाणे सूक्ष्म असलेली गोष्ट मोठी करून दाखवते त्याप्रमाणे हे पाण्याचे भिंगदेखील येणाऱ्या सूक्ष्म संकटाची चाहूल देत आहे असे कवयित्रीला वाटत आहे. हे संकट भीषण रूप धारण करायच्या आगोदर माझ्या घरी, शेतावर तू दौडत ये असं कवयित्री पाऊस धारेला विनवणी करते, तू आलीस की आमच्या या शेतावर हिरवळ येईल, मातीत ओलावा येईल आणि मातीतील बी-बियाण्यांना अंकुर फुटेल. मालकांच्या मनातीलही स्वप्नं पूर्ण होतील.

पावसाच्या सरी वायसवे झुलत-सुलत येतात म्हणून कवयित्री म्हणते की तू वाऱ्यासोबत झुलत झुलत माझ्या घरापाशी ये. माझ्या घराजवळ आलीस की माझी पोरं तुझ्या पावसाच्या सरींना झोंबतील. इथे कवयित्री पावसाच्या धारा-सरी यांना जरीची उपमा देते. सोनेरी जरीमध्ये स्वतःची ताकद असते, ती सहसा तुटत नाही. ती मौल्यवान असते. तसंच ही पावसाची सरही मौल्यवान आहे. तिच्या जरीचा घोळ म्हणजे पावसाचे साठलेले पाणी या पाण्यात कवयित्रीची पोरं खेळतील.

भोपळ्याची, पडवळाची आळी, मालकाने कधीपासून तयार करून ठेवली आहेत. प्राणसईच्या येण्याने ती भिजतील, त्यांना कोंब फुटेल. तू आलीस की तुझ्या जलसाठ्याने त्या विहिरींना पण तुडुंब भर. घरदार संपूर्ण सृष्टी चिंब भिजायला हवी आहे कारण पाण्याविना काहीच चैतन्य नाही. अशी धावत धावत ही प्राणसई आली की कवयित्री तिच्यासोबत खप गप्पा मारणार आहे. तिच्याशी आपल्या सख्याच्या गजगोष्टी सांगणार आहे. त्याचं कौतुक आपल्या मैत्रिणीला सांगताना तिला अभिमान वाटणार आहे.

पावसाच्या या धनावळीने आता वाकडेपणा सोडावा आणि भूतलावर अगदी तीव्रतेने धावत यावं असं कवयित्रीला वाटतं. आमच्या सगळ्यांकडे अशी पाठ करून तू काय साधशील बरं? असा त्रास देण्यापेक्षा प्रेमानं तुझ्या धारांमध्ये भिजवलंस तर सगळेजण आनंदी होतील. च मिळेल, त्यामुळे वाऱ्यावर भरारी मारून अगदी लवकर भेटीयला ये अशा आत्यंतिक जिव्हाळयाने कवयित्री आपल्या सखीला बोलावते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

शब्दसंपत्ती.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून शब्दमनोरा पूर्ण करा.
उदा.,
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 4
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 5

11th Marathi Book Answers Chapter 2 प्राणसई Additional Important Questions and Answers

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. विहिरीच्या तळी दिसू लागले ते – [ ]
  2. घनावळीने हिचा मैत्रपणा आठवावा – [ ]
  3. प्राणसईने वाऱ्यासोबत असे यावे – [ ]

उत्तर:

  1. भिंग
  2. मैत्रिणीचा
  3. भरारी मारून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

कारणे लिहा.

प्रश्न 1.
पाखरांच्या हाती पावसाला सांगावा धाडला, कारण – ……….
उत्तर:
पाखरांच्या हाती पावसाला सांगावा धाडला, कारण पावसाने यायला उशीर केला म्हणून लवकर यावे.

प्रश्न 2.
पडवळा – भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, कारण – ………
उत्तर:
पडवळा – भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, कारण या भाज्यांची लागवड करावयाची आहे.

कृती करा.

प्रश्न 1.
प्राणसई आल्यावर कवयित्री या गोष्टी करेल – …………..
उत्तर :
प्राणसई आल्यावर कवयित्री या गोष्टी करेल – दारात उभी राहून तिच्याशी आपल्या सख्याबददलच्या गप्पा सांगेल.

प्रश्न 2.
सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन:
उत्तर :
पावसाची वाट पाहणं हे शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेलं असत. कवयित्रीचा सखा शेतकरी आहे, त्याने काबाडकष्ट करून पेरणी केलेली आहे.
पाऊस न आल्यामुळे तो सुद्धा चिंतेत पडला आहे. शेत, अन्नधान्य, घर हेच त्याचं विश्व आहे. त्यामुळे तो त्यात रमतो, कष्ट करतो. याचं
कौतुक कवयित्रीला आहे. त्यामुळे कवयित्रीला आपल्या सख्याचे कौतुक आपल्या प्राणसईला सांगावेसे वाटत आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

आकलन कृती :

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
मालक बेचैन झाले कारण – [ ]
उत्तर:
मालक बेचैन झाले कारण – तीव्र उन्हाळ्यामुळे बैल कामासाठी तयार नाहीत म्हणून

प्रश्न 2.
विहिरीच्या तळाशी भिंग दिसू लागले कारण – [ ]
उत्तर:
विहिरीच्या तळाशी भिंग दिसू लागले कारण – पाऊस न आल्याने विहिरीचे पाणीदेखील तळाशी गेले आहे.

जोड्या लावा.

प्रश्न 1.

आळी ठेविलीसजवून
शेणी ठेविल्याभाजून
रचून

उत्तर:
आळी ठेविली – भाजून
शेणी ठेविल्या – रचून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

उपयोजित कृती :

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 8
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 9

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 6
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 7

प्रश्न 2.
बैलांच्या अगतिक झालेल्या अवस्थेसाठी कवयित्रीने उपयोजिलेला शब्द –
उत्तर :
बैलांच्या अगतिक झालेल्या अवस्थेसाठी कवयित्रीने उपयोजिलेला शब्द – ठाणबंदी

क्रमवारी लावा.

प्रश्न 1.

  1. झाले मालक बेचैन
  2. झळा उन्हाच्या लागून
  3. तोंड कोमेली बाळांची
  4. बैल झाले ठाणबंदी

उत्तर:

  1. बैल झाले ठाणबंदी
  2. झाले मालक बेचैन
  3. तोंड कोमेली बाळांची
  4. झळा उन्हाच्या लागून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

काव्यसौंदर्य:

प्रश्न 1.
‘तोंडे कोमेली बाळांची
झळा उन्हाच्या लागून
या पक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री इंदिरा संत यांच्या प्राणसई कवितेत पावसाच्या आगमनापूर्वीच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे. उन्हाने तप्त झालेल्या वातावरणाचे परिणाम लहान तान्हुल्या बाळांनाही सोसावे लागत आहे. त्यांच्याही जीवाची काहिली झाली आहे. त्यांची कोवळी तोंडे, कोमेजून गेली आहेत. त्या कोवळ्या चेहऱ्यांचा कोमेजून जाळ्याची उल्लेख करताना कवयित्री कोमेली ही नवीन सौंदर्य प्रतिमा वापरतात त्यामुळे त्या तान्हुल्या बाळांच्या चेहऱ्यावरील कोमल भाव प्रकट होतात.

स्वमतः

प्रश्न 1.
पावसाच्या आगमनासाठी तुम्ही कसे आतुर असता?
उत्तर :
पावसाळा हा ऋतू माझा सर्वात आवडीचा ऋतू. पाऊस कधीही यावा आणि त्यात चिंब भिजावे अशी माझी मनस्थिती असते. उन्हाळ्याचे चार महिने सोसल्यावर, त्याची दाहकता अनुभवल्यावर साहजिकच मनाला ओढ लागते ती पावसाची. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीच्या सुगंधालाही मी आसुसलेला असतो. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी भरपूर पाऊस पडावा असं खूप वाटत असतं. पावसाळ्यात ट्रेकिंगला जायला मला प्रचंड आवडतं. निसर्गाच्या सानिध्यातील भटकंती मला माझ्यातील खुजेपण शोधायला भाग पडते. निसर्ग भरभरून देतो. आपण केवळ त्याचा आनंद घेतो त्याला काही देत नाही. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पावसाळ्यात मी आणि माझे काही मित्र बागांमध्ये झाडे लावण्याचा उपक्रम करत असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्राणसई Summary in Marathi

प्रस्तावनाः

कवयित्री इंदिरा संत यांची मराठी साहित्यात विशुद्ध भावकाव्य लिहिणारी कवयित्री अशी ओळख आहे. इंदिराबाई मूळच्या शिक्षिका. बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या होत्या. प्रा. ना, मा. संत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकवू लागल्या. १९७१ मध्ये त्यांचा शेला हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. सोप पण गहिरं असं लेखनाचे स्वरूप इंदिरा संतांचे होते.

‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘चित्कळा’, ‘बाहुच्या वंशकुसुम’ ‘गभरेशमी’, ‘निराकार’ असे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ, प्रेम आर्तता व्यक्त करण्यासाठी निसर्गातील विविध प्रतिमांचा वापर त्या सहजगत्या करताना दिसतात.

‘फुलवेल’ हा त्यांचा ललितलेख संग्रह. मृदगंध यात त्यांनी तरुण भारतसाठी लिहिलेला स्तंभलेख ‘मृदगंध’ या ग्रंथात संग्रहित आहे. लेखांमधून, कवितांमधून इंदिराबाईनी निसर्गाची अनेकविध रूप रेखाटली. सुखद, सुंदर असा निसर्ग इंति

कवितेचा आशय :

उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले असताना सर्वांच्याच मनाला पावसाची ओढ लागलेली असते. पाऊस येणार या कल्पनेने सर्वच जण आनंदित होत असतात. पाऊस बेभरवशाचा असतो, त्याच्या आगमनाकरता शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया यांनी तयारी करून ठेवलेली असते. पेरणी झालेली असते. पण भूमीत पेरलेले बियाणे उगवण्यासाठी पावसाचे येणे महत्त्वाचे असते.

या पावसाची वाट पाहताना कवयित्री तिला पृथ्वीवरील परिस्थिती आपल्या कवितेतून कथन करते, तसेच या घनावळीने आपल्या मैत्रीला जपत पृथ्वीवर बरसावे अशी विनंती या कवितेतून व्यक्त करते. पृथ्वीवर उन्हाची दाहकता प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. एखादी राक्षसी पीठ कांडत राहते आणि त्याचा धुराळा सर्वत्र पसरतो.

तसंच उन्हाची दाहकता तप्तता सर्वत्र पसरली आहे. अशा वेळी कवयित्रीला चिंता वाटत राहते की आपली प्राणसखी प्राणसई आपल्याला भेटायला का बरं येत नाही आहे? ती कुठं वरं गुंतून राहिली आहे ? या घनावळीला आपली चिंता नाही का ? आपल्या जवळ तिनं आता असायला हवं असं कवयित्रीला वाटत राहतं. घनावळी पृथ्वीतलावर यावी याकरता कवयित्री पाखरांच्या हाती सांगावा पाठवून देत आहे की आपला मैत्रपणा आठवून तू धावत ये.

ठीचा काळ असतो. आपल्या घरातल्यांच्या सोयीकरता कवयित्रीनेही आपल्या मालकाप्रमाणे भाज्यांची लागवड केली आहे, भोपळा-पडवळ यांची लागवड करण्यासाठी जमिनीमध्ये आळी तयार करून ठेवली आहेत. त्यात भाज्यांची बियाणे पेरली आहेत. घरात शेणीचा थर रचून ठेवला आहे. पावसाळ्यात त्यांचा धूर करून डास, चिलटे यांना दूर करता येतं म्हणून त्यांचीही रास एका कोनाड्यात ठेवली आहे.

बैलही उन्हाच्या झळांमुळे काम करेनासे झाले आहेत, त्यांनाही उष्माघात सहन होत नाही त्यामुळे मालकही बैचेन झाले आहेत. बाळांची कोमल, नाजूक तोंडेही पार वाळून गेली आहेत.

विहिरीच्या तळी पाण्याचे भिंग दिसत आहे. तळाला गेलेले पाणी भिंगासारखे दिसते आहे. विहिर ही दुर्बिणीसारखी आणि तळाला गेलेले पाणी भिंग असं कवयित्रीला सुचवायचे आहे. भिंगातून जशी एखादी लहान वस्तू मोठी दिसते तसंच पाण्याचे दुर्भिक्ष्य आता मोठ्या स्वरूपात सोसायला लागणार असं वाटू लागतं. कवयित्रीचं मन या सगळ्या ताणतणावात लागत नाही आहे. आपली प्राणसखी कधी येईल याची ती तीव्रतेने वाट पाहत आहे.

ही घनावळी आली की तिनं धावत आपल्या शेतावर हजेरी लावावी असं कवयित्रीला वाटतं. ती आली की तिच्यामुळे शेतावर हिरवा शेला पांघरला जाईल म्हणजे हिरवळ दाटेल. मालकाच्या स्वप्नांनाही अंकुर फुटतील, त्यांनाही जिवंतपणा लाभेल.

ही प्राणसई वाऱ्यासोबत येईल तेव्हा त्याच्या साथीनं तिन झुलत-झुलत यावं आपल्या घराशी थांबावं. तिच्या जररूपी धारांचे तळे होईल त्यात कवियत्रीची पोरं-बाळं नाचतील, खेळतील, वागडतील ही मुलं या प्राणसईची भाचे मंडळीच आहेत. त्यांच्या निरागसपणाचे या प्राणसईलाही कौतुक वाटेल.

कवयित्रीच्या दारात लावलेले पडवळ, भोपळे यांच्या वेलीचे आळे भिजून चिंब होऊ दे, विहिरी पाण्याने तुडुंब भरून वाहू दे, घर, दार, अंगण या सर्वच ठिकाणी पावसाच्या पाण्याने थंडगार वारा अनुभवायला मिळू दे.

असं संपूर्ण सुंदर, चैतन्यमय वातावरण अनुभवताना तुझ्याशी मी दारात उभी राहून बोलेन. माझा सखा शेतात कसा दमतो, रमतो. त्याचे कौतुक ती या प्राणसईला सांगणार आहे.

ही प्राणसई वेळेवर येत नाही म्हणून कवयित्री तिला पुन्हा विनवणी करतेय की ए, प्राणसखी तू आता वाकडेपणा बाजूला ठेव, तू रागावली असलीस तरी तो राग आता सोड, अशी पाठमोरी तू होऊ नकोस. वाऱ्यावरून भरारी मारून तू वेगावे धावत, दौडत ये, तू माझी प्राणसई आहेस, माझ्यासाठी पृथ्वीसाठी, लेकरांसाठी, शेतासाठी तुला यायलाच हवं.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. घनावळ – मेघमाला.
  2. सांगावा – निरोप – ( message).
  3. हुडा – गोवांचा ढीग.
  4. शेणी – गोवऱ्या – (dried cakes of cowdung)
  5. ठाणबंदी – पशुंना गोठ्यात बांधून ठेवणे.
  6. कोमेली – कोमेजला.
  7. भिंग – आरसा – (a piece of glass).
  8. शेला – पांघरण्याचे, उंची वस्त्र – (a silken garment, a rich scraft).
    तुडुंब – भरपूर, काठोकाठ – (upto the brim, quite full).
  9. भरारी – उड्डाण – (a quick flight ).
  10. भाचा – बहिणीचा किंवा भावाचा मुलगा – (a nephew).
  11. जर – विणलेले वस्त्र – (brocade)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण अलंकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

12th Marathi Guide व्याकरण अलंकार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

(१) वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!
(२) सागरासारखा गंभीर सागरच!
(३) या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान
(४) न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे की हिरे।

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

(५) अनंत मरणे अधी मरावी,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.

(६) मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!

(७) फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलात तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?
उत्तर :
(१) अतिशयोक्ती अलंकार
(२) अनन्वय अलंकार
(३) अपन्हुती अलंकार
(४) अपन्हुती अलंकार
(५) अर्थान्तरन्यास अलंकार
(६) अतिशयोक्ती अलंकार
(७) अर्थान्तरन्यास अलंकार

2. खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 3

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

3. खालील कृती करा.

(१) कर्णासारखा दानशूर कर्णच.
वरील वाक्यातील-
उपमेय ………………………….
उपमान ………………………….

(२) न हे नभोमंडल वारिराशी आकाश
न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-
उपमेय ………………………….
उपमान ………………………….

दुसऱ्या ओळीतील
उपमेय ………………………….
उपमान ………………………….
उत्तर :
(१) उपमेय : कर्ण (दानशूरत्व)
उपमान : कर्ण

(२) पहिल्या ओळीतील – उपमेय : नभोमंडल (आकाश)
उपमान : आकाश
दुसऱ्या ओळीतील – उपमेय : तारका
उपमान : तारका

4. खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 4

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

अलंकार म्हणजे काय?

अलंकार म्हणजे आभूषणे किंवा दागिने. अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने घालतात, त्याप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक आकर्षक व अधिक परिणामकारक करण्यासाठी कवी (साहित्यिक) भाषेला अलंकाराने सुशोभित करतात.

एखादया माणसाचे शूरत्व सांगताना → तो शूर आहे → सामान्य वाक्य तो वाघासारखा शूर आहे → आलंकारिक वाक्य. ← असा वाक्यप्रयोग केला जातो.

अशा प्रकारे ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात.

भाषेच्या अलंकारांचे दोन मुख्य प्रकार आहेत :

  • शब्दालंकार
  • अर्थालंकार.

आपल्याला या इयत्तेत

  • अनन्वय
  • अपन्हुती
  • अतिशयोक्ती
  • अर्थान्तरन्यास हे चार अर्थालंकार शिकायचे आहेत.

उपमेय आणि उपमान म्हणजे काय?
पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया : भीमा वाघासारखा शूर आहे.
‘भीमा’ हे उपमेय आहे; कारण भीमाबद्दल विशेष सांगितले आहे. भीमाला वाघाची उपमा दिली आहे.
‘वाघ’ हे उपमान आहे; कारण भीमा हा कसा शूर आहे, ते सांगितले आहे.

म्हणून,

  • ज्याला उपमा देतात, त्यास उपमेय म्हणतात.
  • ज्याची उपमा देतात, त्यास उपमान म्हणतात.

म्हणून,

  • भीमा → उपमेय
  • वाघ → उपमान
  • साधर्म्य गुणधर्म → शूरत्व.

अनन्वय अलंकार
पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती सोडवा :

  • आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
  • या आंब्यासारखा गोड आंबा हाच.
  • वरील दोन्ही उदाहरणांतील उपमेये – ताजमहाल, आंबा
  • वरील दोन्ही उदाहरणांतील उपमाने – ताजमहाल, आंबा

निरीक्षण केल्यानंतर वरील उदाहरणांत उपमेय व उपमान एकच आहेत, असे लक्षात येते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही व जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. [अन् + अन्वय (संबंध) = अनन्वय (अतुलनीय)]

अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • उपमेय हे अद्वितीय असते. त्यास कोणतीच उपमा लागू पडत नाही.
  • उपमेयाला योग्य उपमान सापडतच नाही; म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दयावी लागते.

अनन्वय अलंकाराची काही उदाहरणे :

  • ‘झाले बहु, होतिल बहू, आहेतहि बहू, परंतु या सम हा।’
  • या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
  • आईसारखे दैवत आईच!

अपन्हुती अलंकार

पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती सोडवा :
उदा., न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतिल।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।।

वरील उदाहरणातील –

वरील उदाहरणांत उपमेयांचा निषेध केला आहे व उपमेय, उपमान हे उपमानेच आहे, अशी मांडणी केली आहे.

जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे, असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा अपन्हुती अलंकार होतो.

अपन्हुती अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • उपमेयाला लपवले जाते व निषेध केला जातो.
  • उपमेय हे उपमेय नसून उपमानच असे ठसवले जाते.
  • निषेध दर्शवण्यासाठी ‘न, नव्हे, नसे, नाहे, कशाचे’ असे शब्द येतात.

अपन्हुती अलंकाराची काही उदाहरणे :

  1. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे।
  2. हे हृदय नसे, परि स्थंडिल धगधगलेले।
  3. मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलीतो।
    नाही ग बाई, फणा काढुनि नाग हा डोलतो।।
  4. हे नव्हे चांदणे, ही तर मीरा गाते
  5. आई म्हणोनि कोणी। आईस हाक मारी
    ती हाक येई कानी। मज होय शोकारी
    नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

अतिशयोक्ती अलंकार
पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व त्यातील अतिरेकी (असंभाव्य) वर्णन समजून घ्या :
दमडिचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं
मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून सांगितल्या आहेत.

जसे की, एका दमडीच्या (पैशाच्या) विकत आणलेल्या तेलात काय काय घडले? →

  • सासूबाईचे न्हाणे
  • मामंजीची दाढी
  • भावोजीची शेंडी
  • कलंडलेले तेल वेशीपर्यंत ओघळले
  • त्यात उंट वाहून गेला.

या सर्व अशक्यप्राय गोष्टी घडल्या. म्हणजेच अतिशयोक्ती केली आहे.
जेव्हा एक कल्पना फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता (अशक्यप्रायता) अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.

अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे, घटनेचे, कल्पनेचे अतिव्यापक फुगवून अशक्यप्राय केलेले वर्णन.
  • त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट केलेली असते.

अतिशयोक्ती अलंकाराची काही उदाहरणे :

  1. ‘जो अंबरी उफाळतां खुर लागलाहे।
    तो चंद्रमा निज तनुवरि डाग लाहे।।’
  2. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर।
    रामायण आधी मग झाला राम जानकीवर।।
  3. सचिनने आभाळी चेंडू टोलवला।
    तो गगनावरी जाऊन ठसला।।
    तोच दिवसा जैसा दिसतो चंद्रमा हसला।।

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

अर्थान्तरन्यास
पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व समजून घ्या :
‘बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल।
श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरल।।
[खल = दुष्ट, अहि = साप, गरल = विष, श्वान = कुत्रा, पुच्छ = शेपटी]
दुष्ट माणसाला कितीही उपदेश केला तरी तो आवडत नाही, हे स्पष्ट करताना सापाला पाजलेल्या दुधाचे रूपांतर विषातच होते, हे उदाहरण देऊन ‘कुत्र्याची शेपटी नळीत घातली, तरी वाकडीच राहणार’, हा सर्वसामान्य सिद्धांत मांडला आहे.
एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ ठेवणे, हा या अलंकाराचा उद्देश असतो.

एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे म्हणजेच ५ एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे व सर्वसामान्य सिद्धांत मांडणे, यास अर्थान्तरन्यास अलंकार म्हणतात.

अर्थान्तरन्यास अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत मांडणे.
  • सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण देणे.
  • अर्थान्तर – म्हणजे दुसरा अर्थ. न्यास – म्हणजे शेजारी ठेवणे.

अर्थान्तरन्यास अलंकाराची काही उदाहरणे :

  1. तदितर खग भेणे वेगळाले पळाले।
    उपवन-जल-केली जे कराया मिळाले।।
    स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो।
    कठिण समय येता कोण कामास येतो?
  2. होई जरी सतत दुष्टसंग
    न पावती सज्जन सत्त्वभंग
    असोनिया सर्प सदाशरीरी Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार
    झाला नसे चंदन तो विषारी
  3. अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा
  4. जातीच्या सुंदरा काहीही शोभते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण प्रयोग Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

12th Marathi Guide व्याकरण प्रयोग Textbook Questions and Answers

कृती

1. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

प्रश्न 1.
(a) मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विदयार्थ्यांना बोलावले.
(b) कप्तानाने सैनिकांना सूचना दिली.
(c) मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात.
(d) तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.
(e) मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले.
(f) राजाला नवीन कंठहार शोभतो.
(g) शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली.
(h) आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले.
(i) युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले..
(j) आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात.
उत्तर :
(a) भावे प्रयोग
(b) कर्मणी प्रयोग
(c) कर्तरी प्रयोग
(d) कर्तरी प्रयोग
(e) भावे प्रयोग
(f) कर्तरी प्रयोग
(g) कर्मणी प्रयोग
(h) भावे प्रयोग
(i) कर्मणी प्रयोग
(j) कर्तरी प्रयोग.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

2. सूचनेनुसार सोडवा

प्रश्न अ.
कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा.
(a) गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेले.
(b) सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. [✓]
(c) विदयार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत गायले.
उत्तर :
(b) सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. [✓]

प्रश्न आ.
कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा.
(a) सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.
(b) शिक्षकाने विदयार्थ्यास शिकवले.
(c) भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. [✓]
उत्तर :
(c) भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. [✓]

प्रश्न इ.
भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा.
(a) आज लवकर सांजावले.
(b) त्याने कपाटात पुस्तक ठेवले. [✓]
(c) आम्ही अनेक किल्ले पाहिले.
उत्तर :
(a) आज लवकर सांजावले. [✓]

Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण प्रयोग Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
उदाहरण वाचा. कृती करा : विदयार्थी पाठ्यपुस्तक आवडीने वाचतो.
(१) वाक्यातील क्रियापद. → [ ]
(२) पाठ्यपुस्तक आवडीने वाचणारा तो कोण? → [ ]
(३) वाचले जाणारे ते काय? → [ ]
(४) वरील वाक्यातील क्रिया कोणती? → [ ]
उत्तर :
(१) वाचणे
(२) विदयार्थी
(३) पाठ्यपुस्तक
(४) वाचण्याची

पुढील वाक्य नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष दया :

  • समीर पुस्तक वाचतो.
  • वरील वाक्यात ‘वाचतो‘ हे क्रियापद आहे. त्यात वाचण्याची क्रिया दाखवलेली आहे.
  • वाचण्याची क्रिया समीर करतो.
  • वाचण्याची क्रिया पुस्तकावर घडते आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

जो क्रिया करतो, त्याला कर्ता म्हणतात. म्हणून समीर हा कर्ता आहे. ज्यावर क्रिया घडते, त्याला कर्म म्हणतात. म्हणून पुस्तक हे कर्म आहे.

म्हणून,
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 1

वाक्यात क्रियापदाचा काशी व कर्माशी लिंग-वचन-पुरुष याबाबतीत जो संबंध असतो, त्या संबंधाला प्रयोग म्हणतात.

मराठीत प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत :

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग.

कर्तरी प्रयोग

प्रश्न  1.
पुढील उदाहरणे वाचून कृती करा :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 3
उत्तर :
(१) कर्त्याचे लिंग बदलले.
(२) कर्त्याचे वचन बदलले.
(३) कर्त्याचा पुरुष बदलला.

पुढील वाक्य नीट वाचा :
समीर पुस्तक वाचतो. (समीर कर्ता आहे.)
कर्त्याचे अनुक्रमे लिंग-वचन-पुरुष बदलू या.

  • सायली पुस्तक वाचते. (लिंगबदल केला.)
  • ते पुस्तक वाचतात. (वचनबदल केला.)
  • तू पुस्तक वाचतोस. (पुरुषबदल केला.)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

म्हणजे,
कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष बदलामुळे अनुक्रमे वाचतो हे क्रियापद → वाचते, वाचतात, वाचतोस असे बदलले. म्हणजेच कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलले.

जेव्हा कर्त्याच्या लिंग-वचन-पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो.

कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. (प्रत्यय नसतो.)
  • कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असते.
  • कर्तरी प्रयोगातील क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते.
  • क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलते.

कर्मणी प्रयोग

प्रश्न  1.
पुढील उदाहरणे वाचून कृती करा :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 4
उत्तर :
(१) कर्माचे लिंग बदलले.
(२) कर्माचे वचन बदलले.

पुढील वाक्य नीट वाचा :
समीरने पुस्तक वाचले. (पुस्तक कर्म आहे.)
कर्माचे लिंग व वचन बदलू या.

  • समीरने गोष्ट वाचली. (लिंगबदल केला.)
  • समीरने पुस्तके वाचली. (वचनबदल केला.)

म्हणजे,
कर्माच्या लिंग-वचन बदलामुळे अनुक्रमे वाचले हे क्रियापद → वाचली, असे बदलले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

म्हणजेच कर्माप्रमाणे क्रियापद बदलले.

जेव्हा कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे क्रियापद बदलते, तेव्हा कर्मणी प्रयोग होतो.

कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • (१) कर्ता बहुधा तृतीयेत असतो. (प्रत्यय असतो.)
  • (२) कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. (प्रत्यय नसतो.)
  • (३) कर्मणी प्रयोगातील क्रियापद बहुधा भूतकाळी असते.
  • (४) क्रियापद कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते.

भावे प्रयोग

प्रश्न  1.
पुढील वाक्यात रोखणे क्रियापदाचे योग्य रूप लिहा :

(a) सैनिकाने शत्रूला सीमेवर ………………………………..
(b) सैनिकांनी शत्रूला सीमेवर ………………………………..
(c) सैनिकांनी शत्रूना सीमेवर ………………………………..
उत्तर :
(a) रोखले
(b) रोखले
(c) रोखले.

प्रश्न  2.
पुढील वाक्यात बांधणे या क्रियापदाचे योग्य रूप लिहा :
(a) श्रीधरपंतांनी बैलांना ………………………………..
(b) सुमित्राबाईंनी गाईला ………………………………..
(c) त्याने घोह्याला ………………………………..
(d) आम्ही शेळ्यांना ………………………………..
उत्तर :
(a) बांधले
(b) बांधले
(c) बांधले
(d) बांधले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

पुढील वाक्य नीट पाहा :
समीरने पुस्तकास वाचले.
प्रथम कर्त्याचे लिंग-वचन बदलू या.

  • सायलीने पुस्तकास वाचले. (लिंगबदल केला.)
  • त्यांनी पुस्तकास वाचले. (वचनबदल केला.)

आता कर्माचे लिंग-वचन बदलूया.

  • समीरने गोष्टीला वाचले. (लिंगबदल केला.)
  • समीरने पुस्तकांना वाचले. (वचनबदल केला.)

म्हणजे,
कर्त्याच्या व कर्माच्या लिंग-वचन बदलाने क्रियापदाचे रूप बदलले नाही. ‘वाचले’ हेच क्रियापद कायम राहिले.

जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग-वचन-पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, तेव्हा भावे प्रयोग होतो.

भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • कर्त्याला बहुधा तृतीया विभक्ती असते. (प्रत्यय असतो.)
  • कर्म असल्यास द्वितीया विभक्तीत असते. (प्रत्यय असतो.)
  • क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असते. बहुधा ते एकारान्त असते.
  • क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलत नाही.

लक्षात ठेवा :

  • समीर पुस्तक वाचतो. → कर्तरी प्रयोग
  • समीरने पुस्तक वाचले. → कर्मणी प्रयोग Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग
  • समीर पुस्तकास वाचतो. → भावे प्रयोग

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

11th Marathi Digest Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ.
……………………….. हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
(a) नाटक, कथा
(b) नाटक, एकांकिका
(c) नाटक, काव्य
(d) नाटक, ललित
उत्तरः
(b) नाटक, एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न आ.
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ………………………………… .
(a) अभिनय करणारा उपस्थित असतो.
(b) नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.
(c) नाटकाची जाहिरात होते.
(d) नाटकाची संहिता वाचता येते.
उत्तरः
(b) नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.

प्रश्न इ.
नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण
(a) खूप पात्रे त्यात सहभागी असतात.
(b) डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.
(c) दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.
(d) नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.
उत्तरः
(b) नाटक ही दृक-श्राव्य कला आहे कारण डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.

2. चुकीचे विधान शोधा.

प्रश्न अ.
(a) अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यपरंपरेला गती दिली.
(b) विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला.
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.
(d) संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात.
उत्तरः
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.

प्रश्न आ.
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.
(b) नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा.
(c) नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा.
(d) नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा.
उत्तरः
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
(a) परस्परविरोधी स्वभावांतून संघर्ष निर्माण होतो.
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.
(c) भूमिकांच्या नात्यात परस्पर संघर्ष दाखवता येतो.
(d) भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते.
उत्तरः
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.

प्रश्न ई.
(a) नाटकात संहिता महत्त्वाची असते.
(b) नाट्यसंहिता परिपूर्ण असावी.
(c) नाट्यसंहिता दर्जेदार असावी.
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.
उत्तरः
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.

3. प्रश्न अ.
फरक स्पष्ट करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 1
उत्तर :

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
1. या नाटकातील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात.व्यावसायिक नाटकात विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांवर आधारित संवाद असतात.
2. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले असते.प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते.
3. प्रायोगिक नाटकांच्या आकृतिबंधात, विषयांत नाविन्यता असते.व्यावसायिक नाटकांचे विषय कौटुंबिक, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक यांवर आधारित असतात.
4. प्रायोगिक नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.व्यावसायिक नाटकांचे स्वरूप प्रामुख्याने करमणूकप्रधान असते.
5. प्रायोगिक नाटकांमध्ये नेपथ्य, अभिनय, तंत्र यामध्ये जाणीवपूर्वक बदल केलेला असून व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळेपणा जाणवतो.व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांना महत्त्वाचे स्थान आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 2
उत्तर :

नाटकइतर साहित्य प्रकार
1. नाटक हा समूहाचा आविष्कार असून त्यात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला या सर्व कलांचा समावेश असतो.कथा, कादंबरी व कविता हे इतर साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत.
2. नाटकामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून असंख्य प्रेक्षक एकाच वेळी त्याचा दृश्य स्वरूपात अनुभव घेऊ शकतात.कथा व कादंबरी या साहित्यप्रकारात फक्त लेखक व वाचक हे दोनच घटक असतात.
3. नाटक सामूहिकरित्या रंगमंचावर, कलाकारांना सादर करता येते.कथा, कवितांचे वाचन रंगमंचावर करता आले तरी त्याचे सादरीकरण करता येत नाही.

प्रश्न आ.
खालील कृती करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 10

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 4
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 11

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(c)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 5
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 12

(d)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 6
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 13

(e)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 14
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 15

(f)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 16
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 17

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 7
उत्तर :

घटना/कृतीपरिणाम
1. एखादया प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो.नाट्य निर्माण होते.
2. नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखननाटकाचे यश खात्रीलायक.
3. नाटकात संघर्ष असला तरकथानकातील आशयातरंगत येते किंवा नाटक परिणामकारक वठते.
4. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेला अनुभव, आनंद, दु:ख सांगावेसे वाटते.साहित्याची निर्मिती होते.

4. स्वमत.

प्रश्न अ.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ते लिहिणारे, अभिनय करणारे कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक, समीक्षक अशा सर्वांच्या सहकार्यावर नाटकाची यशस्विता अवलंबून असते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर केले जाते. नाटकाचा प्रयोग आशय व प्रयोग या दोन्ही दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेक जणांचा समन्वय व प्रयत्न महत्त्वाचे असतात. कलावंत, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, दिग्दर्शक यांचा समावेश त्यांत असतो. पडदयामागील कलाकारांचे श्रेयही यात तेवढेच आहे.

दिग्दर्शक : लेखकाच्या संहितेएवढेच दिग्दर्शकाचे महत्त्वही नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटकाची तांत्रिक व कलात्मक बाजू या दोन्ही दृष्टीने दिग्दर्शक एकात्मिक विचार करतो. नृत्य, अभिनय, संगीत या कलांचीही जाण त्याला असणे महत्त्वाचे असते. संहितेवर नोंदी करून त्या कलाकार व तंत्रज्ञाला त्याची कल्पना त्याला दयावी लागते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नेपथ्यकार : नाटकातील स्थळ, काळ व कथानकाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दृश्यांना योग्य पडदे, वस्तू यांची मांडणी नेपथ्यकार करतो. कलाकारांचे कपडे, विग्ज, झालरी व त्याला अनुरूप संगीत, प्रकाशयोजना या सर्व घटकांचा अंतर्भाव नेपथ्यामध्ये असतो. कथानकाला साहाय्य होईल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती म्हणजे नेपथ्य.

प्रकाशयोजना : प्रकाशयोजनेसाठी रंगमंचावर विविध साधनांचा उपयोग केला जाते. फ्लडलाइट्स, स्पॉटलाइट्स, डीमर इ. रात्रीच्या प्रसंगात रंगभूमीवर अंधार दाखवण्यासाठी डीमरचा उपयोग करतात. एखादया मुख्य कलाकाराचा प्रवेश (एण्ट्री) स्पॉटलाइटच्या मदतीने तसेच प्रवेशबदलाची सूचनादेखील प्रकाशयोजनेतून दिली जाते. पार्श्वसंगीतः कथानकातील प्रसंगांना अनुकूल, पात्रांची मनस्थिती अधोरेखित करण्यासाठी, नाटक गतिमान करण्यासाठी आणि वातावरणनिर्मितीसाठी नाटकातील पार्श्वसंगीताचा वापर केला जातो. यादृष्टीने ‘लेकुरे उदंड झाली’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांचा उल्लेख करावा लागेल.

रंगभूषा : नाटकात रंगभूषेला फार महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव या गोष्टी लक्षात घेऊन कलावंतांचा चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा. लांबच्या प्रेक्षकांनासुद्धा नटांचा चेहरा व्यवस्थित दिसावा या दृष्टीने रंगभूषाकार काम करत असतो. त्यामुळे नाटकाच्या सादरीकरणात मेकअप, (रंगभूषा), वेशभूषा व केशभूषा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. नाटकात निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा कलावंत आपल्या संवादफेकीतून, आवाजातील चढ-उतारांतून, हावभावातून आपल्या अभिनयाद्वारे सशक्तपणे लोकांसमोर जिवंत करतात.

प्रेक्षक : या नाटकाचे सादरीकरण पाहण्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे प्रेक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादानेच हा खेळ रंगत असतो. म्हणूनच नाटक हे एकाचे काम नसून तो एक सांघिक आविष्कारच म्हणता येईल. त्या सर्वांवर नाटकाची सफलता असते.

प्रश्न आ.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
1. नाटकाचे नेपथ्य
2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
3. नाटकातील संवाद
4. नाटक अनेक कलांचा संगम
5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
उत्तरः
1. नाटकाचे नेपथ्य : नेपथ्य म्हणजे नाटकाच्या कथानकाला साहाय्यकारी ठरेल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती होय. हे नेपथ्य जो करतो तो नेपथ्यकार. कथानकातील स्थळ, काळ यांना सुसंगत ठरतील अशा वस्तू, नाटकातील नटांचे कपडे, त्यांना भूमिकेनुरूप लागणारे विग्ज, रंगमंचावर (स्टेजला) लागल्या जाणाऱ्या झालरी, प्रकाशयोजना आणि पोषक संगीत इत्यादी सर्व गोष्टींचा अंतर्भाव हा नेपथ्यामध्ये असतो. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी मांडणी नेपथ्यकार करतो.

2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व : प्रकाशयोजनेसाठी रंगभूमीवर विविध प्रकारची साधने वापरली जातात. प्रकाशयोजना हा नेपथ्याचाच भाग असतो. स्पॉट्स, फ्लडलाइट्स, फूटलाइट्स या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी-अधिक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विदयुत उपकरणाला ‘डीमर’ असे म्हटले जाते. नाटकात एखादा रात्रीचा प्रसंग दाखवायचा असेल तर या डीमरच्या साहाय्याने रंगभूमीवर संपूर्ण अंधार केला जातो. या प्रकाशयोजनेच्या माध्यमातून एखादया प्रवेशबदलाची सूचनादेखील देता येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

3. नाटकातील संवाद : मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यांमधील विविध भाव-भावनांचे, अनुकरण करणारे चित्रण म्हणजे नाटक. या चित्रणासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद होत. लेखकाने लिहिलेले संवाद नाटकांतील पात्रांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद घेता येतो. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवून रसिक प्रेक्षकांच्या टाळ्याही घेतात. नाटकाच्या विषयाला साजेसे उत्तम संवाद नाट्यातील आशय अचूक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्रांच्या संवादफेकीच्या शैलीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना समजतो.

4. नाटक अनेक कलांचा संगम : महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. पूर्वी लळित, दशावतार, वगनाट्य, तमाशे असे मनोरंजनाचे प्रकार होते. यातूनच नंतर नाटक हा प्रकार उदयास आला जो समूहाचा आविष्कार असतो. नाटकाशी संगीत, नृत्य, वक्तृत्व, कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला, रंगभूषा अशा बहुतेक सर्व कला संबंधित आहेत. नाटक हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने कथेनुरूप आलेल्या संगीत, नृत्य, काव्यात्म व अर्थपूर्ण संवाद यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येतो आणि त्यामुळे कथेचा आशय उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

अशा तहेने अनेक कलांचा संगम नाटकामध्ये झाला असल्याने त्यामध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. रंगमंचावरील सादरीकरणामुळे प्रेक्षकांना या कलांचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या अनुभूतीने प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होऊन त्यांचे रोजचे धकाधकीचे जीवन आनंदी व अर्थपूर्ण, समृद्ध करण्यात या कलांचे फार मोठे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच नाटकाचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे.

5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा : नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात अंधश्रद्धा, अनेक रूढी परंपरा, चालीरीती यांसारखे अनेक अडथळे होते. स्त्रीजीवन धर्मबंधनांमुळे जखडले होते. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. विचारांचे स्वातंत्र्य नव्हते. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने सामाजिक वातावरणही पोषक नव्हते. स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेदेखील स्वातंत्र्य नव्हते. फक्त ‘चूल व मूल’ हेच तिचे आयुष्य होते. त्यामुळे नाटकात काम करणे ही तर फारच चौकटीबाहेरची गोष्ट होती. त्यामुळे स्त्रिया तयारही होत नसत. त्यासाठी घरच्यांची परवानगी मिळणे तर फारच कठीण. त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्रेच साकारत असत. त्याकाळी नाटकातील कलावंतांना आजच्यासारखी प्रतिष्ठाही नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्व यांनी अनेक नाटकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारल्या आणि आजही त्यांच्या नाटकांतील पदे लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या भूमिका त्यामुळेच अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. लेखकाला जो विषय सांगायचा तो लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. नाटकांतून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण विविध विषयांतून झालेले दिसते आणि ही परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळातील वास्तव चित्रण नाटकातून होते. सामाजिक समस्या मांडल्या जातात. मानवी भाव-भावना, स्वभाव यांमधील विविध छटांचे दर्शन नाटकांतून होते. माणसाच्या आयुष्यातील अवतीभवती घडणाऱ्या अनेक प्रसंगांमधून प्रेरणा घेऊन नाटक साकार होते. पूर्वी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, हुंडा पद्धती, केशवपन इत्यादी सामाजिक ज्वलंत प्रश्न नाटकांच्या प्रयोगातून सादर केले जात. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकात जरठकुमारी विवाह या अनिष्ट प्रथेवर मार्मिक टीका केली आहे तर अनेक नाटकांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांसारखे विषय निवडून चांगले विचार लोकांमध्ये रुजवून त्यांचा प्रसार करून जनजागृतीचे काम केले आहे. नाटक या दृक-श्राव्य माध्यमातून मनोरंजनाच्या साथीने समाज जागृती घडवण्याचे काम खूप वर्षांपासून आजपर्यंत केले गेले आहे म्हणून नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे.

प्रश्न ई.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरः
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर ‘बोट’ ठेवले जाते.
  • संगीत नाटकाची रचना ही रसिक प्रेक्षकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन केलेली असते.
  • संगीत नाटकांत संवाद कमी असून संगीतावर जास्त भर दिलेला असतो.
  • संगीत नाटकातील संगीत व अभिनय यांमधून रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते.
  • शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा समावेश संगीत नाटकात असतो.
  • संगीत नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वैविध्यपूर्ण गाणी.
  • संगीत नाटकातील पदे ही आशयाला अनुरूप व कथानकाला वेग/गती देणारी असतात.
  • लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ साधणारे संगीत हे संगीत नाटकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय.
  • संगीत नाटकामध्ये गायकाला साथ-संगत करणाऱ्या सर्व कलावंतांचाही मोठा सहभाग असतो.
  • आजदेखील मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर संगीत नाटकाची ओळख आहे.

प्रश्न उ.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
नाटकात संहितेला महत्त्वाचे स्थान आहे. नाट्यसंहिता परिपूर्ण व दर्जेदार असेल तर नाटकाला हमखास यश मिळते. सशक्त कथानक नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो आणि कथानकात वैशिष्ट्यपूर्ण रचनेद्वारे नाटक रंगतदार करतो. त्यासाठी कथानक उत्तम असणे आवश्यक आहे. नाटककार आपल्या नाटकातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडतो. नाटकाचे ध्येय सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणे असून ते घडवताना माणसांच्या मनातील भाव-भावना, स्वभाव लक्षात घेणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

पात्रांच्या मनातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन होण्यासाठी स्वगताचा परिणामकारकरित्या वापर केलेला असतो. त्यासाठी नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकाचा तोल सांभाळला जाईल अशा पद्धतीने नाटकातील पात्रांच्या शाब्दिक चित्रणाची जबाबदारीसुद्धा नाटककाराला पार पाडणे आवश्यक असते. परस्परविरुद्ध स्वभाव, कृती व भाव-भावनांमधील तणाव यांमधून संघर्ष निर्माण होऊ शकतो.

कथानकातील आशयात संघर्ष येणे महत्त्वाचे. भूमिकांच्या परस्पर नात्यांमधील संघर्ष तसेच भूमिका व परिस्थिती यांमधील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारक होऊन त्याची रंगत वाढते. त्यासाठी खटकेबाज, चुरचुरीत नर्मविनोदी संवादांची आवश्यकता असते. नाट्यातील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकातील संवाद करतात. कथानकामधील प्रसंग, दृश्य, काळ यांमधील बदलांसंबंधित सूचना कंसातील रंगसूचनांमधून नाटककार देतो त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात आणि त्यातील संदर्भ स्पष्ट झाल्यामुळे कथानकाचा प्रवाह सहजरित्या पुढे जातो.

आशयाला अनुरूप अशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देण्याचे काम करते. त्यातील भाषिक सौंदर्य संपूर्ण नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तरः व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • व्यावसायिक नाटकाच्या माध्यमाद्वारे सामाजिक प्रश्न मांडले जातात.
  • व्यावसायिक नाटकांचे स्वरूप हे प्रामुख्याने बोधपर व मनोरंजनात्मक असते.
  • एखादे गंभीर विषयावरील नाटक पाहतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते.
  • नाटक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक प्रकारचे नाते तयार होते. व्यावसायिक नाटके ही कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर अधिक प्रमाणात असतात.
  • व्यावसायिक नाटकाची मांडणी प्रेक्षकांच्या आवडीनुसार केलेली असते.
  • व्यावसायिक नाटकातील संवाद हे विनोद, उपहास, श्लेष व शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होईल असे असतात.
  • व्यावसायिक नाटकाची निर्मिती बोध, मनोरंजन प्रेक्षकांना आवडणारी असून व्यावसायिक हेतूनेच झालेली असते.

प्रश्न ऊ.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये पुढीलप्रमणे :

  • प्रायोगिक नाटकामध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.
  • प्रायोगिक नाटकाच्या आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असते.
  • या नाटकांमध्ये आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते.
  • स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग केले जातात.
  • नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना त्याबरोबरच नाट्यप्रयोग, नेपथ्य यांमध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा या नाटकात दिसून येतो.
  • प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता आणि परिचित नसलेली सूचकता यांचा कौशल्याने वापर केलेला दिसतो.
  • भाषिक प्रयोग केले जातात तसेच घटना सहज व नैसर्गिक करण्याकडे कल असतो.
  • या नाटकांमधील संवाद बरेचदा बोलीभाषेप्रमाणे असतात.
  • प्रायोगिक नाटकात आशयाला अनुरूप असणाऱ्या घटना, प्रसंगांवर भर दिलेला असतो.
  • या नाटकामध्ये आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हा कथा, कादंबरी, कविता यांप्रमाणे एक वाङ्मय / साहित्य प्रकार आहे. परंतु तो इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे. बाकीचे साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत परंतु नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा अंतर्भाव होतो. कथा कादंबऱ्यांमध्ये लेखक व वाचक हे दोनच घटक असतात पण नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून लेखकाचे शब्द नट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटक हे दृक-श्राव्य साहित्य प्रकार असून ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाटक रंगमंचावर दिग्दर्शनाच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, कलाकारांनी प्रेक्षकांसमोर सादर करायचे असते.

प्रश्न आ.
विदयार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विदयार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
उत्तरः
शिक्षक-पालक : कुणाल, शालांत परीक्षेत तू ९७.२०% मिळवून घवघवीत यश आज मिळवले आहेस. त्याबद्दल तुझे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन! खूप आनंद झाला आहे ना.

11th Marathi Book Answers Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Additional Important Questions and Answers

कृती : १

स्वमत:

प्रश्न 1.
‘लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
नाटक ही आपल्या संस्कृतीमधील अगदी प्राचीन कला आहे. ज्याचे स्वतःचे शास्त्र आहे, अभ्यास आहे. एकाच वेळी अनेक विषयांना बांधून ठेवणारा हा साहित्य प्रकार आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद घडतो. यातन लोकांशी संवाद साधता साधता त्यांचे मनोरंजन करता येते. जेव्हा जेव्हा समाजात काही बदल, घडामोडी होत असतात तर त्याचे प्रतिसाद मनुष्य स्वभावावर, मानवी जीवनांवर होत असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

त्यातून भावनिक, मानसिक, सामाजिक राजकीय संघर्ष होतात. त्याची दखल नाटकाचा नाटककार घेत असतो. त्या नाटकातून समाजात बदल टिपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते प्रेक्षकांसमोर पोहोचवताना तो सुखात्मिका वा शोकात्मिकेच्या आधारे ते पोहोचवेल. त्याकरता नट रंगमंचावर सादरीकरण करताना अभिनय करतो. कृती, संवाद, स्वगत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांच्या आधारे नाटकातून लोकांशी संवाद साधल्याने केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधनदेखील होते.

कृती : २.

प्रश्न 1.
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → [ ]
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे

कृती : ३.

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली → [ ]
उत्तर :
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली. → १९६०

उपयोजित कती

स्वमत:

प्रश्न 1.
‘आजच्या काळात करमणुकींचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे’ या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
आजच्या काळात करमणुकीची विविध माध्यमे लोकप्रिय आहेत. दृकश्राव्य माध्यमात चित्रपट, डी.व्ही.डी., दूरचित्रवाणी, नाटक यांचा समावेश होतो. परंतु नाटक पाहणाऱ्या लोकांची संख्या आजदेखील लक्षणीय असण्याचे कारण म्हणजे समाजातील चालीरीती काळानुसार बदलल्या असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या कायम राहिल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वाभावांतील विविध छटांचे दर्शन प्रेक्षकाला नाटकातून घडते. नाटकांची निर्मिती ही मुख्यत: मनोरंजनाच्या हेतूने केली जात असली तरी प्रेक्षक स्वत:च्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो.

त्यामुळे नाटक हे त्याला आपले वाटते. मानवी जीवनातील नाट्य प्रेक्षकांना नाटकातून पहायला मिळते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर होत असल्यामुळे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे प्रेक्षकांना आत्मिक समाधान मिळते. जे इतर करमणुकीच्या माध्यमांतून मिळत नाही. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न नाटकातून केला जातो. त्यामुळे नाटकाच्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे आणि करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक हा कलाप्रकार जिवंत राहिला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नाटक- साहित्यप्रकार-परिचय प्रास्ताविक :

ललित साहित्यप्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेल्या सुख–दु:खाचा अनुभव सर्वांना सांगावासा वाटतो. त्यातूनच साहित्यनिर्मिती होते. लेखकाला प्रतिपादन करायचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्त्वाचा भाग असून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. मानवी भाव–भावना स्वभाव तसेच समाजाचेही वास्तव दर्शन नाटकांतून होते. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. नाटक दृक–श्राव्य साहित्य प्रकार असून ते कलाकारांनी रंगमंचावर सादर करायचे असते. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

नाट्यसंहितेचे स्वरूप :

नाट्यसंहिता परिपूर्ण, दर्जेदार असेल तर नाटकाचे यश खात्रीदायक. सशक्त कथानक नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो. वैशिष्ट्यपूर्ण रचनेने तो नाटकात रंगत आणतो. नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककार करतो. कथानकातील आशयात संघर्षामुळे रंगत येते. भूमिकांच्या परस्पर नात्यांतील संघर्ष, परिस्थिती व भूमिका यांमधील संघर्षामुळे नाटक परिणामकारक होते. नाटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. नाट्यकृतीतील आशय योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संवाद करतात. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते.

नाटक या साहित्यप्रकाराचे वेगळेपण :

कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांपेक्षा नाटक हा प्रकार वेगळा आहे. नाटक हा सामूहिक आविष्कार आहे तर इतर साहित्य प्रकारांमध्ये फक्त लेखक व वाचक हे दोन घटक असतात. विष्णुदास भावे यांचे ‘सीतास्वयंवर’ हे आधुनिक मराठी नाटकांतील पहिले नाटक तर महात्मा फुले लिखित ‘तृतीयरत्न’ ही लेखन स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्याआधी लळित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा अनेक कला होत्या ज्या नाटकाच्या उदयास पूरक ठरल्या.

संगीत नाटक :

अण्णसाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ व ‘संगीत सौभद्र’ या नाटकांनी भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता, नाट्यतंत्र व स्वाभाविक संवाद या सर्व बाबतील एक मापदंड तयार केला. संगीताचा वापर हा त्यांतील महत्त्वाचा घटक होता.

संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. यात संवाद तुलनेने कमी असून अभिनय व संगीत यांच्याद्वारे रसिकांना खिळवून ठेवले जाते. या नाटकांमध्ये शास्त्रीय संगीताचा समावेश असतो. आशयानुरूप व कथानकाला पुढे नेणारी यातील पदे असतात. विविधतापूर्ण गाणी हे या नाटकाचे वैशिष्ट्य असून लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम संयोग यांतील संगीतात असतो. गायक व कलावंत यांचा फार मोठा सहभाग या नाटकांमध्ये असतो. १९०० सालच्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत होते.

यातूनच संगीत दिग्दर्शक ही संकल्पना पुढे आली. त्या काळातील ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’, ‘बळवंत नाटक मंडळी’ व ‘बालगंधर्व नाटक मंडळी’ यांनी संगीत नाटकाला समृद्धता प्राप्त करून दिली. त्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांमुळे स्त्रिया नाटकात काम करण्यासाठी तयार नसत त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा पुरुष पात्र साकारत. बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजदेखील अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रायोगिक नाटक :

नाटकाचा विषय व सादरीकरण यांत प्रयोग करणे हा या नाटकांचा मुख्य हेतू. आशय व अभिव्यक्तीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. काळ बदलला, प्रसारमाध्यमांमध्ये वाढ झाली, करमणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध झाले. तिकिटांचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे झाले. त्यामुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली.

प्रायोगिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडली जाते. आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असून आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांत जाणीवपूर्वक बदल केलेला असतो. नाटकांचे बीज, नाटकाचा विषय, आशय, रचना, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा असतो. भाषिक प्रयोग केले जातात. या नाटकांतील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात. या नाटकांमध्ये आशयानुरूप होणारे प्रसंगांचे प्रमाण अधिक असते. आपल्याला वाटणारे, आपल्या पद्धतीने या नाटकात मांडता येते.

व्यावसायिक नाटक :

व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. हे नाटक व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व त्याच हेतूने नाटकाचा प्रयोग केला जातो. समाजातील समस्या घेऊन अनेक व्यावसायिक नाटके निर्मिली गेली.

व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांच्या माध्यमातून तत्कालीन समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मनोरंजनात्मक असते. नाटक व प्रेक्षक यांच्यात एका नात्याची निर्मिती होते. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होणारे संवाद या नाटकात असतात. नाट्यप्रयोग हे एक सांघिक कार्य आहे.

नाटक लिहिणारे, अभिनय करणारे कलावंत, तंत्रज्ञ, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषाकार आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक आणि या नाटकांचे समीक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नाटक साकार होते. या सर्वांच्या सहकार्यावर प्रयोगाची यशस्विता अवलंबून असते. पडदयामागच्या कलाकारांचीही यात महत्त्वाची भूमिका असते. नाटक या साहित्यप्रकाराची व्याप्ती व इतिहास खूप मोठा आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

प्रवृत्ती – स्वभाव (nature), परिचय – ओळख (introduction), संहिता – कथानक (script), आधुनिक – सध्याचे (modern), आस्वाद – चव, रुची (flavour, taste), खर्चिक – महागडा (expensive), प्राचीन – जुने (ancient, primitive).

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण वाक्यरूपांतर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर

12th Marathi Guide व्याकरण वाक्यरूपांतर Textbook Questions and Answers

कृती

1. खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर 1
उत्तर :
(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा.

  • वाक्यप्रकार → आज्ञार्थी वाक्य
  • विधानार्थी वाक्य → दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

  • वाक्यप्रकार → उद्गारार्थी वाक्य
  • विधानार्थी – नकारार्थी वाक्य → तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?

  • वाक्यप्रकार → प्रश्नार्थी वाक्य
  • विधानार्थी – होकारार्थी वाक्य → स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे.

(४) मोबाइलचा अतिवापर योग्य नाही.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी – नकारार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य → मोबाइलचा अतिवापर टाळा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी – नकारार्थी वाक्य
  • प्रश्नार्थी वाक्य → खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का?

(६) विदयार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य → विदयार्थ्यांनो, संदर्भग्रंथांचे वाचन करा.

2. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

(a) सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)
(b) तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
(c) किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.)
(d) पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
(e) चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
(f) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
(g) अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
(h) तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)
(i) निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही ? (विधानार्थी करा.)
(j) दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)
उत्तर :
(a) सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही.
(b) तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे.
(c) ही पाषाणमूर्ती खूप सुंदर आहे.
(d) पांढरा रंग कुणाला आवडत नाही?
(e) चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात.
(f) किती आनंद झाला तुझ्या भेटीने!
(g) हा अजब चमत्कार आहे.
(h) तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला.
(i) निरोगी राहावे असे सर्वांना वाटते.
(j) दवाखान्यात हळू आवाजात बोलावे.

  • लेखन करताना काही वेळा वाक्यरचनेत बदल करण्याची गरज भासते, अशा बदलाला ‘वाक्यरूपांतर किंवा वाक्यपरिवर्तन’ असे म्हणतात.
  • वाक्यांचे रूपांतर करताना वाक्यरचनेत बदल होतो, पण वाक्यार्थाला बाध येत नाही.

विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी या वाक्यांचे एकमेकांत रूपांतर होते.

उदाहरणार्थ,
पुढील वाक्ये नीट अभ्यासा :

  • मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. (विधानार्थी वाक्य.)
  • किती आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे! (उद्गारार्थी वाक्य.)
  • मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का? (प्रश्नार्थी वाक्य.)
  • मुलांनो, शिस्त अवश्य पाळा. (आज्ञार्थी वाक्य.)

म्हणून :

वाक्यार्थ्याला बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरूपांतर होय.

होकारार्थी – नकारार्थी (वाक्यरूपांतर)

पुढील वाक्ये नीट अभ्यासा.

  • क्रिकेट मालिकेत भारतीय संघ विजयी झाला. (होकारार्थी वाक्य.)
  • क्रिकेट मालिकेत भारतीय संघ पराभूत झाला नाही. (नकारार्थी वाक्य.)

होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना आपण काय केले?

  • विजयी x पराभूत
  • झाला x झाला नाही.

दोन विरुद्धार्थी शब्दबंध घेऊन वाक्य बदलले. पण वाक्याचा अर्थ बदलला नाही.

म्हणून,

वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल झाला, तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण वाक्यप्रकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

12th Marathi Guide व्याकरण वाक्यप्रकार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

प्रश्न 1.
(a) गोठ्यातील गाय हंबरते.
(b) श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.
(c) किती सुंदर देखावा आहे हा!
(d) यावर्षी पाऊस खूप पडला.
(e) तुझा आवडता विषय कोणता?
उत्तर :
(a) विधानार्थी वाक्य
(b) विधानार्थी – नकारार्थी वाक्य
(c) उद्गारार्थी वाक्य
(d) विधानार्थी वाक्य
(e) प्रश्नार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

2. खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

प्रश्न 2.
(a) प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.
(b) सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
(c) विदयार्थी कवायत करत आहेत.
(d) विदयार्थ्यांनी सभागृहात गोंगाट करू नका.
(e) क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.
उत्तर :
(a) आज्ञार्थी वाक्य
(b) संकेतार्थी वाक्य
(c) स्वार्थी वाक्य
(d) आज्ञार्थी वाक्य
(e) स्वार्थी वाक्य

  1. मूलध्वनींच्या आकारांना अक्षरे म्हणतात.
  2. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात.
  3. अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य म्हणतात.
  4. आपण मराठी भाषेत बोलताना व लिहिताना अनेक प्रकारची ‘वाक्ये’ एकापुढे एक मांडतो.
  5. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो.
    • उदा., पाऊस धो धो पडला.
    • किती जोरात पडला पाऊस!
    • पाऊस तर पडायलाच हवा.
  6. पाऊस न पडून कसे चालेल?
  7. वाक्यांच्या अशा अनेकविध वापरातून ‘वाक्यांचे प्रकार’ निर्माण झाले आहेत.
  8. वाक्यांच्या प्रकारांचे मुख्य दोन विभाग आहेत. –
    • आशयावरून व भावार्थावरून.
    • क्रियापदाच्या रूपावरून
    • आशय व भावार्थ असलेला वाक्यप्रकार.
  9. वाक्याच्या आशयावरून व भावार्थावरून वाक्यांचे तीन प्रकार आहेत.
    • विधानार्थी वाक्य
    • प्रश्नार्थी वाक्य
    • उद्गारार्थी वाक्य.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

1. विधानार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • हे फूल खूप सुंदर आहे.
    • माझी शाळा मला खूप आवडते.
  2. वरील दोन्ही वाक्यांत ‘विधान’ केले आहे.
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • हे फूल खूप सुंदर आहे. → विधानार्थी वाक्य
  • माझी शाळा मला खूप आवडते. → विधानार्थी वाक्य

2. प्रश्नार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • हे फूल सुंदर आहे का?
    • तुझी शाळा कुठे आहे?
  2. वरील वाक्यांत ‘प्रश्न’ विचारले आहेत.
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • हे फूल सुंदर आहे का? → प्रश्नार्थी वाक्य
  • तुझी शाळा कुठे आहे? → प्रश्नार्थी वाक्य

3. उद्गारार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • किती सुंदर आहे हे फूल!
    • किती आवडते मला माझी शाळा!
  2. वरील दोन्ही वाक्यांत बोलणाऱ्याच्या मनातील भाव उत्कटपणे उत्स्फूर्तपणे व्यक्त झाला आहे.
ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उद्गाराद्वारे उत्कटपणे व्यक्त होतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

3. विध्यर्थी वाक्य

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • मी दररोज शाळेत जातो.
    • मी पहाटे व्यायाम केला.
  2. वरील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • मी दररोज शाळेत जातो. → स्वार्थी वाक्य
  • मी पहाटे व्यायाम केला. → स्वार्थी वाक्य

4. आज्ञार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • दररोज शाळेत जा.
    • नेहमी पहाटे व्यायाम कर.
  2. वरील दोन्ही वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून आज्ञा केली आहे.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद व सूचना या गोष्टींचा बोध होतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • दररोज शाळेत जा. (आज्ञा)
  • देवा, मला चांगली बुद्धी दे. (प्रार्थना)
  • कृपया, मला पुस्तक दे. (विनंती)
  • मुलांनो, खूप अभ्यास करा. (उपदेश)
  • तुम्हांला नक्की यश मिळेल. (आशीर्वाद)
  • येथे धुंकू नये. (सूचना) → आज्ञार्थी वाक्ये

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

5. विध्यर्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :

  • विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. (इच्छा/अपेक्षा)
  • वर्ग स्वच्छ ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्यदक्षता)
  • बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील. (शक्यता)
  • आत्मविश्वास असणाराच विदयार्थी यशस्वी होतो. (योग्यता)
  • वरील वाक्यांमधील क्रियापदावरून विधी (म्हणजे वरच्या कंसातील गोष्टी) व्यक्त होतात.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता वगैरे गोष्टी (विधी) व्यक्त होतात, अशा वाक्याला विध्यर्थी वाक्य म्हणतात.
म्हणून, वरील सर्व वाक्ये ‘विध्यर्थी वाक्ये’ आहेत.

6. संकेतार्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :

  • तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील.
  • जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल.

वरील दोन्ही वाक्यांत पहिली अट पूर्ण केली, तर पुढचा परिणाम होईल, असा संकेत दिला आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून अट किंवा संकेत दिसून येतो, त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील. → संकेतार्थी वाक्य
  • जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल. → संकेतार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

12th Marathi Guide Chapter 11 आरशातली स्त्री Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 2

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 4

आ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

प्रश्न 1.
घनगर्द संसार – ……………..
उत्तर :
घनगर्द संसार – संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
प्रेयस चांदणे – ……………..
उत्तर :
प्रेयस चांदणे – चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी.

प्रश्न 3.
प्राण हरवलेली पुतळी – ……………..
उत्तर :
प्राण हरवलेली पुतळी – भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री. निर्जीव मनाची स्त्री.

प्रश्न 4.
फाटलेले हृदय – ……………..
उत्तर :
फाटलेले हृदय – विस्कटलेले वेदनामय मन.

2. अ. वर्णन करा.

प्रश्न 1.
आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल –
उत्तर :
ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वत:ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतल्या आहेत.

प्रश्न 2.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
उत्तर :
अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो. परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारुन टाक. मनमोकळी हो. रडू नको. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे.

आ. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

प्रश्न 1.
बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
उत्तर :
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
उत्तर :
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

इ. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंगअ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
2. आभाळ झुल्यावर झुलणारीआ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
3. देह तोडलेले फूलइ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
4. पारंपरिकतेचे वरदानई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाउ. मनातले सुंदर भाव

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंगउ. मनातले सुंदर भाव
2. आभाळ झुल्यावर झुलणारीइ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
3. देह तोडलेले फूलई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
4. पारंपरिकतेचे वरदानआ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाअ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न अ.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते तू नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

प्रश्न आ.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येय गंधाचं होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाहय बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

5. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली –
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद जागृत कशी करते, त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळींमध्ये केले आहे.

काव्यसौंदर्य : आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सदयः परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरले. तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते. स्वत:तच हिंदकळते. त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते – तू रडू नकोस.

ऊठ, तुझी उमेद जागव. तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ-फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वत:लाच स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, असे कवयित्रीला म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तच्छंद यांचे (मुक्त शैलीचे) माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व आवाहक झाली आहे. जोखडात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थ रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील ‘डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे’ व ‘उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे’ या वेगळ्या व प्रत्ययकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे. बिंब-प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

6. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले.

तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

उपक्रम :

‘स्त्री’विषयक पाच कवितांचे संकलन करा. त्यांचे वर्गात लयीत वाचन करा.

तोंडी परीक्षा.

‘आरशातली स्त्री’ या कवितेचे प्रकट वाचन करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Additional Important Questions and Answers

(काव्यसौंदर्य / अभिव्यक्ती)

पुढील ओळींचा अर्थ लिहा :

प्रश्न 1.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य…!
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते -त् नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते – पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येये उराशी बाळगलीस. तू ध्येयगंधाच होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस, आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस, त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाहय बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा
स्वतःशी केलेला सार्थ संवाद आहे,’ हे विधान स्पष्ट करा. –
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला, परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली.

म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वत: केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

व्याकरण

वाक्यप्रकार :

आशयावरून पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. किती बदललीस तू अंतर्बाय! → [ ]
  2. आरशात पाहून डोळे भरून आले. → [ ]
  3. तू बोलत का नाहीस? → [ ]

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

क्रियापदांच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. अंगणातील चांदण्याला आत घ्यावे. → [ ]
  2. तू रडू नकोस. → [ ]
  3. जर आत्मविश्वास असेल, तर जीवन समृद्ध होईल. → [ ]
  4. डोळ्यांतले आसू तळ्यात सोडून दे. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. संकेतार्थी वाक्य
  4. आशार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. तू रडू नकोस. (होकारार्थी करा.)
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घे, (विधानार्थी करा.)
  3. अंगणात दिवे लावावेत. (आज्ञार्थी करा.)
  4. शुभ्र कमळाची फुले आण. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर :

  1. तू हसत राहा.
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घेतले पाहिजेत.
  3. अंगणात दिवे लाव.
  4. शुभ्र कमळाची फुले आणशील का?

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा व समास ओळखा :

सामासिक शब्दविग्रहसमास
1. नवयौवना
2. ध्येयगंगा
3. पूर्वरंग
4. अस्तित्वहीन

उत्तर:

सामासिक शब्दविग्रहसमास
1. नवयौवनानवीन अशी तरुणीकर्मधारय समास
2. ध्येयगंगाध्येयाची गंगाविभक्ती तत्पुरुष समास
3. पूर्वरंगपूर्वीचा रंगविभक्ती तत्पुरुष समास
4. अस्तित्वहीनअस्तित्वाने हीनविभक्ती तत्पुरुष समास

प्रयोग :

प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. आरशातल्या स्त्रीने मला विचारले. → [ ]
  2. तळ्यात कमळे फुलली. → [ ]
  3. स्त्रीने आरसा पाहिला. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात.
2. जेव्हा उपमेय हेच उपमान आहे असे सांगितले जाते.
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

आरशातली स्त्री Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

संसारात पूर्ण बुडालेली स्त्री एकदा सहज आरशात पाहते. आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते. त्या वेळच्या संवादाचे आत्मीय चित्र कवयित्रीने रेखाटले आहे.

संसारात गुंतलेल्या स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यांत अब्रू उभे राहिले. आरशात तिचेच प्रतिबिंब होते. त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले – ‘तूच तीच आहेस, जिला माझेच रूप लाभले आहे. तरीही तू मी नाहीयेस. तू तर आतून-बाहेरून पूर्णत: बदलली आहेत. तू पूर्वीची ‘ती’ राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू, ऐक. मी तुला सांगते तू कशी होतीस ते, तुझी पूर्वस्मृती मी जागृत करते.

तू पावसाच्या लाटा ओंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावेत तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध नवतरुणी होतीस, स्वप्नांचे पंख . लावून गगनझुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस आणि आजमितीला, या वर्तमानात तू अतिशय स्थिरचित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस. तुझ्यातला अल्लडपणा, मुग्धता, ध्येयनिष्ठा लोप पावली आहे.

आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. डहाळीवरून जसे खसकन एका झटक्यात देठापासनू फूल तोडून घ्यावे, तसे तुझे ओठ म्लान, निपचित, पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस. मनातच कुढत चालली आहेस. संसाराच्या घनदाट पसाऱ्यात स्वतः जायबंदी झाली आहेस. दिवसरात्र तू आतल्याआत मनाला जाळत ठेवले आहे. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे, अशी तू स्वत:ची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस.

तुझ्या दाराबाहेर अंगणात तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणीचे चांदणे थांबलेले आहे. त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून आत घेण्याची जाणीव तुला होत नाही. मनाच्या दाराची कवाडे तू मुद्दामहून घट्ट लावून घेतली आहेस. ज्या बागेत तू आनंदाने बागडली होतीस, त्या बागेतली तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुळते आहे. पण तुझी जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झाली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे. तुझे अस्तित्व हरवले आहे.

असे तुझे अस्तित्वहीन व्यक्तिमत्त्व पाहून माझे काळीज वेदनेने आक्रंदते. रात्रीच्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंदका दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले, फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस, तनामनाला सहन न होणाऱ्या वेदना तु पदराने झाकतेस. नि बळेबळेच हसतमुखाने सर्वत्र वावरतेस.’

आरशातल्या स्त्रीचे (बाईच्या दुसऱ्या मनाचे) बोल ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचे मन हेलावून गेले. स्वत:च्या अस्तित्वाचे भान येऊ लागले; तेव्हा त्या स्थितीत आरशातली स्त्री तिला गोंजारीत, मायेने जवळ घेऊन कुरवाळीत हक्काच्या वाणीने म्हणाली – ‘अशी उन्मळून रडू नकोस. सावर स्वत:ला. ऊठ. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तलावात सोडू दे. दुःखाला, वेदनेला, अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला तिलांजली दे. विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीसत्वाने जग. जा त्या तळयात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम, ताजी टवटवीत फुले हातात घेऊन ये. नवविचारांच्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा घे. नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचे स्वाभाविक आयुष्य जग. परंपरेचे हे जोखड झुगारून टाक.’

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

शब्दार्थ :

  1. ल्यालेली – अंगिकारलेली, घेतलेली.
  2. अंतर्बाहय – आतूनबाहेरून.
  3. अंतर – मन.
  4. पूर्वरंग – गतस्मृती.
  5. तरंग – लाटा.
  6. बहर – फुलोरा.
  7. नवयौवना – नवतरुणी.
  8. ध्येयगंधा – ध्येयाने प्रेरित व गंधित झालेली.
  9. नखशिखान्त – पावलांपासून डोक्याच्या केसापर्यंत.
  10. स्थितप्रज्ञा – स्थिर बुद्धीची.
  11. देह – अंग, शरीर.
  12. घनगर्द – घनदाट.
  13. अहोरात्र – रात्रंदिवस.
  14. पारंपरिकता – पूर्वीपासून आचरणात आलेली जीवनमूल्ये.
  15. वरदान – कृपा, आशीर्वाद
  16. प्रेयस – अतिशय प्रिय.
  17. भान – जाणीव.
  18. अल्लड – खेळकर.
  19. पेंगुळणे – झोपेची झापड असणे.
  20. अस्तित्वहीन – अस्तित्व नसलेली.
  21. पुतळी – स्थिर, शिल्प.
  22. हंबरणे – गहिवरणे.
  23. कंठ – गळा.
  24. हुंदका – रडण्याचा आवाज.
  25. असहय – सहन न होणाऱ्या (कळा).
  26. हिंदकळणे – पाणी हलणे.
  27. अधिकारवाणी – हक्काने बोलणे.
  28. खुळे – वेडे.
  29. आसू – अश्रू.
  30. शुभ्र – पांढरीस्वच्छ.
  31. प्रसन्न – टवटवीत.
  32. गोंजारणे – कुरवाळणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. डोळे भरून येणे – गलबलून डोळयांत अश्रू येणे.
  2. मन उलगडणे – मनातील भावना मोकळ्या करणे.
  3. भान नसणे – जाणीव नसणे, गुंग होणे.
  4. काळीज हंबरणे – मन गलबलणे.
  5. फाटलेले हृदय शिवणे – विखुरलेल्या भावना एकत्र करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

12th Marathi Guide Chapter 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Textbook Questions and Answers

कृती

1. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर :
मानवी जीवन बातम्यांनी वेढलेले आहे. बातमी वाचली वा सांगितली, तरी वाचकांच्या मनातील उत्सुकता संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते. परंतु घटनेच्या भोवताली असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो, त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या बाबी निदर्शनास येत नाहीत, त्या शोधून रंजक, नावीन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फिचर असे म्हणतात. फिचर या शब्दाचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशातील अर्थ आहे, ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

म्हणजेच बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्याचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करीत असतात. वाचकांच्या मनात बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे, वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख बातमीचे आस्वादनीय रूप असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार मनुष्य जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे मनुष्य स्वभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येते. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर विशेष लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत महत्त्वाचे असते. बातमीत ‘मी’ असत नाहीत. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखादया घटना/प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते.

वृत्तलेख बातमीच्या पलीकडे असणारी बातमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमीत न आलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख बातमीच्या पायावर उभा असला, तरी वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. काल्पनिकता नसली तरी बातमीतील अस्पर्शित नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात.

3. वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाचा विषय, मांडणी यानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार पाहायला मिळतात. ते असे :
(१) बातमीवर आधारित वृत्तलेख (२) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख (३) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख (४) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख (५) नवल, गूढ, विस्मय यांवर आधारित वृत्तलेख. या सर्व प्रकारांमधील व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारात एखादया विशिष्ट क्षेत्रातील नामवंत, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्यप्रवासावर लिहिले जाते. एखादया क्षेत्रात काम करीत असताना त्या व्यक्तीच्या जीवनात आलेले अनुभव, यश, अडचणींचा केलेला सामना, संघर्ष, उपक्रम, विक्रम इत्यादींसंदर्भात विस्ताराने लिहिले जाते.

या प्रकारचे वृत्तलेख औचित्य साधून लिहिले जातात. पुरस्कार, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिले जातात. काही वेळा त्या व्यक्तिसंबंधाने झालेले पूर्वीचे लेखन, त्या व्यक्तीने अन्य लोकांबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीसोबत काम केलेल्या अन्य व्यक्तींचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांकडून मिळवलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती इत्यादींचाही वृत्तलेख लिहिताना उपयोग होतो. केवळ आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

4. ‘वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
उत्तर :
वृत्तलेख वाचकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत जे अस्पर्शित आहे, ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो. वाचक नेहमीच वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते. वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो. वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते.

वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो, त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो.

वृत्तलेखात शैली या घटकावरही लक्ष दयावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यांतून वृत्तलेखनातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते.

5. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
वृत्तलेखाची गरज
उत्तर :
बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील बातमीविषयीची उत्सुकता संपत नाही. बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. घटना समजून घ्यायची असेल, तर बातमीत न आलेल्या बाबींचा शोध घेणे आवश्यक असते. वृत्तलेख बातमीच्या आतील बातमी उलगडून दाखवण्याचे काम करीत असते. वृत्तलेखातून बातमीच्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य होते. घडून गेलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा संबंध असतो. वृत्तलेख वाचकांना आनंद देणारा, माहिती देणारा असतो. वाचकांच्या विचारांना धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. बातमीचा आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची मदत होत असते. वृत्तलेख वाचकांच्या भावनांची दखल घेत असतो. वाचकांचे समाधानही वृत्तलेख वाचनातून होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

प्रश्न आ.
वृत्तलेखाचे स्रोत
उत्तर :
प्रसारमाध्यमांवर प्रकाशित, प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज तयार होत असते. बातमीच्या अनुषंगाने असणारे संदर्भ, गोष्टी, मुलाखती या बाबींचा पाठपुरावा केला की वृत्तलेखाला आवश्यक वातावरण निर्माण होत असते. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी संपर्क होत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असे नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते, त्यातील छुपे कंगोरे शोधावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडित अनेक लोकांशी संभाषण करावे लागते. यातून वृत्तलेखाला बीज सहज मिळू शकते. वृत्तलेखासाठी बारकाईने निरीक्षण अपेक्षित असते. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधून वृत्तलेखाचा विषय निर्माण करता येऊ शकतो.

प्रश्न इ.
वृत्तलेखाची भाषा
उत्तर :
वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी बातमीपेक्षा अधिक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखात प्राधान्याने केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी चटकन ५ विषय लक्षात येईल अशी असणे अपेक्षित असते. भाषेचे स्वरूप सरळ असले, तरी परिणामकारकता असणे गरजेचे असते. वृत्तलेख वाचकांची उत्सुकता वाढवत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील, तर विषय समजण्यास सोपे होते. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी, अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे अभिप्रेत असते.

प्रश्न ई.
वृत्तलेखाची वैशिष्ट्ये
उत्तर :
अनेकदा एखादया बातमीच्या वाचनानंतर वाचकाच्या मनात त्या बातमीविषयी कुतूहल निर्माण होते. बातमीच्या स्वरूपानुसार घटनेमागील घटना बातमीत सांगितली जात नाही. अशा वेळी वाचकांच्या उत्सुकतेसाठी वृत्तलेख लिहिले जातात. वृत्तलेख तात्कालिक असतात. घटनेचे निमित्त वृत्तलेखाच्या पाठीशी असते. वृत्तलेख घडून गेलेल्या घटनेबद्दल बोलत असते. बातमीत घटनेचा तपशील देता येत नाही. वृत्तलेखात बातमीतील अदृश्य दुवे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तलेखाचा विषय नेहमी ताजा असतो. वृत्तलेखाला ‘धावपळीतले साहित्य’ असेही म्हणतात. वाचकांना बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

6. वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. मीना वैशंपायन यांनी लेखिका दुर्गा भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. दहा फेब्रुवारी हा दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिवस. या निमित्ताने ‘मुक्ता’ या शीर्षकाने हा वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवतांची वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि दुर्गाबाई भागवत यांच्यातील स्त्री जाणिवांचा वेध घेणे हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ १९७५ च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि दुर्गाबाई भागवतांची परखड भूमिका या संदर्भांनी केला आहे.

१९७५ ची आणीबाणी, त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि १९७५ ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचक म्हणून उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्रीस्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता याबद्दल दुर्गाबाई भागवतांच्या विचारांचे विश्लेषण लेखिकेने विस्तृतपणे केले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई भागवत यांनी लिहिलेल्या ‘विदयेच्या वाटेवर’ या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे.

सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील ‘मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार’ संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीन पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवतांचे संयत व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलगडून दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे.

7. बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाची प्रकृती बातमीवर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठपणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखादया घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्दयांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) प्रस्तावना

‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार माणूस जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे हे मानवी स्वभावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येते. जे ‘सांगणे’ केवळ स्व-रक्षणासाठी होते, त्याचा प्रवास हळूहळू व्यक्त होण्यापर्यंत येऊन पोहोचला. अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणून वृत्तपत्रांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला. मानवी जीवन बातम्यांनी व्यापले गेले. वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांसोबत नव्याने स्थिर झालेल्या समाजमाध्यमांत आपण बातम्या ऐकत आणि पाहत असतो.

बातमी औत्सुक्य निर्माण करते. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनात बातमीतल्या घटनेबद्दल अधिकाधिक जिज्ञासा निर्माण होत असते. बातमीत वस्तुनिष्ठता महत्त्वाची असल्याने जे घडले तसेच बातमीत सांगितले जाते. बातमीत न सांगितली गेलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती आणि सूक्ष्म धागेदोरे वाचण्यासाठी वाचकांना वृत्तलेखाचा (फिचर रायटिंगचा) उपयोग होतो.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) वृत्तपत्र अर्थ आणि स्वरूप :

  • बातमीपत्रात जसे घडले तसे सांगितले जाते. बातमीपलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे आवश्यक असते.
  • इंग्रजीत याला ‘फिचर’ असे म्हणतात. बातमी ज्या घटनेशी निगडित आहे तिचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते.
  • या गरजेतूनच वृत्तलेख या लेखनप्रकाराचा जन्म झाला आहे.
  • फिचर म्हणजे नॉन न्यूज असे रूढ असले, तरी वृत्तलेखाचा संबंध बातमीशी असतो.
  • घडून गेलेल्या घटनेशी अथवा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा घनिष्ठ संबंध असतो.
  • वृत्तलेखाला बातमीचा आधार असावा लागतो. निमित्त असावे लागते.
  • वृत्तलेखाला ‘धावपळीचे साहित्य’ असेही म्हणतात. वृत्तलेख तातडीचा असतो.
  • वृत्तलेख बातमीमागची बातमी सांगत असतो. वृत्तलेखात रंजकता असली, तरी कल्पकतेला फारसा वाव नसतो.
  • अचूकता वृत्तलेखात महत्त्वाची असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी लेखनकृतीत स्वतंत्र असतो. मजकूर आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असणे हे वृत्तलेखाचे वैशिष्ट्य असते.
  • बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाचा उपयोग होतो. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांचा विचार करून लेखन केलेले असते.
  • वृत्तलेखात वाचकांचे समाधान हा घटकही महत्त्वाचा मानला जातो.
  • वृत्तलेखाची भाषा सोपी, ओघवती असावी.
  • वाचकांना सहज समजणारी, आपलीशी वाटणारी, वाचकांना खिळवून ठेवणारी, परिणाम साधणारी भाषाशैली असावी.
  • वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली वाचकांना आकृष्ट करणारी असते.
  • वाचकांच्या विचारांना धक्का देणारी ताकद वृत्तलेखात असते.
  • वृत्तलेखातील माहिती विश्वसनीय असते. मुद्द्यांच्या समर्थनार्थ वृत्तलेखात नकाशे, छायाचित्रे, व्यंगचित्रे, आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो.
  • वृत्तपत्रलेखन हे कौशल्यपूर्ण काम आहे. वृत्तलेखन करणास लेखक आपले अनुभव आणि विषयाच्या संदर्भाने असलेली तज्ज्ञता वापरत असतो.
  • वृत्तलेखक वाचकांना आनंद देणारा, माहिती, ज्ञान देणारा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बातमीपलीकडची बातमी जिवंत करणारा असतो.
वर्तमानपत्रांचा जन्म पाश्चात्त्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतात देखील रुजल्या. त्यापैकी एक म्हणजे फिचर, म्हणजेच वृत्तलेख. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात ‘फिचर’चा अर्थ ‘It is a non news article in a news paper’ असा देण्यात आला आहे. म्हणजे ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

वृत्तलेखांचे प्रकार :

बातम्यांचा विषय आणि लेखनप्रकारानुसार वृत्तपत्र लेखनाचे पुढील प्रकार –
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 1
1. बातमीवर आधारित वृत्तलेख :

  • या वृत्तलेखाच्या नावावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येते. एखादया बातमीच्या संदर्भाने हा वृत्तलेख लिहिलेला असतो.
  • वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा या प्रकारात नव्याने विचार करणे प्रस्तुत ठरते.
  • वर्तमानपत्रातील घटनेत असणारी सर्व माहिती वृत्तलेखात नसते; परंतु बातमीमागची बातमी वाचकांना या प्रकारच्या वृत्तलेखात वाचायला मिळते.
  • बातमीवर आधारित वृत्तलेखन करताना बातमीतील घटनेचा सविस्तर आढावा घेणे अपेक्षित असते.
  • वर्तमानपत्रातील बातमीत ज्या नोंदी आल्या नसतील, अशा नोंदींवर प्रकाश टाकण्याचे काम या प्रकारच्या वृत्तलेखनात होणे आवश्यक असते. या
  • प्रकारच्या वृत्तलेखात बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण करणे गरजेचे असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • कधी कधी वृत्तलेखकाला बातमी संदर्भातील विशेष तज्ज्ञ व्यक्तींशी बोलून घटनेचा तळ गाठावा लागतो.
  • वृत्तलेखकाकडे लेखनासाठी असणारी माहिती स्वतंत्र आणि विश्वसनीय असणे आवश्यक असते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात.
  • स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कोणत्याही बातमीवर या प्रकारचे वृत्तलेखन करता येऊ शकते.
  • बातमीपेक्षा अधिक काही मिळाल्याचा आनंद वृत्तलेख वाचकांना मिळणे हेही वृत्तलेखकाला ध्यानात घेणे आवश्यक असते.
  • उदा., पेट्रोल-डीझेलचा वाढत जाणारा तुटवडा – स्वरूप आणि कारणे, लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी – कारणे आणि उपाय, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम इत्यादी.

2. व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात एखादया क्षेत्रात देदीप्यमान कार्य केलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा आढावा घेतला जातो.
  • सामान्य असो की असामान्य कुठल्याही व्यक्तीच्या संघर्षाची दखल या वृत्तलेखात घेतली जाते.
  • एखादया क्षेत्रातील यश, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्ठा, अडचणींचा केलेला सामना, महत्त्वपूर्ण कृती, उपक्रम, विक्रम या संदर्भातील लेखन या वृत्तलेखात करणे आवश्यक असते.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख बहुतकरून औचित्य साधून लिहिलेले असतात.
  • पुरस्कार, गौरव, वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, अमृत महोत्सव इत्यादी प्रसंगी या प्रकारचे वृत्तलेख लिहिले जातात.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखात वाचकांपुढे विशिष्ट व्यक्तीचा केवळ जीवनपट उभा करणे अपेक्षित नसते.
  • व्यक्तीच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवणे आवश्यक असते.
  • अशा वेळी त्या व्यक्तीसंबंधी पूर्वी झालेले लेखन, चरित्र, आत्मचरित्र, सोबत काम केलेल्या व्यक्ती, स्नेहीजन यांच्या मुलाखती अशी विस्तृत माहिती मिळवणे उपयुक्त ठरते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या लेखनात व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखा, सनावळ्या, आकडेवारी एवढ्याचीच नोंद करून, परिचयात्मक माहिती लिहून चालत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीचे विचार, भूमिका, दृष्टिकोन, खास शैली, सवयी इत्यादी बाबींचा सखोल परामर्श घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
  • माहितीतील तांत्रिक बाबींत अधिक न अडकता व्यक्ती जीवनातील भावनिक स्पर्श हे या वृत्तलेखाचे वैशिष्ट्य म्हणता येते. उदा., सिंधुताई सकपाळ, बीजमाता राहीबाई पोपरे, डॉ. श्रीराम लागू इत्यादी.

3. मुलाखतीवर आधारित वृत्तलेख :

  1. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या प्रसार माध्यमांवर होणाऱ्या मुलाखती लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. त्याला मुलाखतीवर आधारित वृत्तलेख असे संबोधले जाते.
  2. या प्रकारच्या वृत्तलेखातून विशिष्ट क्षेत्रात कार्याने आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या व्यक्ती, त्यांचा कार्यप्रवास, महत्त्वपूर्ण संशोधन, मतप्रणाली, त्यांचे कार्यक्षेत्र, यश, अडचणी, अनुभव यांसारख्या ५ मुद्दयांची गुंफण करणे आवश्यक असते.
  3. कार्यसिध्द व्यक्तींची स्वतःची भूमिका मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या वृत्तलेखात करणे महत्त्वाचे असते. सर्वसामान्य लोक व्यक्तिजीवनातील ज्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत, अशा गोष्टींचा परिचय करून देणे वृत्तलेखाचे प्रधान कार्य असते.
  4. विशिष्ट व्यक्तीच्या कर्तृत्वाची उंची आणि संबंधित क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या वृत्तलेखात करणे गरजेचे ठरते. उदा., नामवंत लेखक, गिर्यारोहक, संशोधक इत्यादींच्या मुलाखतीवर आधारित लेख.

4. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात संशोधनात्मक लेखन असते. प्राचीन मंदिरे, लेण्या, स्थळे, गावे इत्यादी संदर्भातील उपलब्ध माहितीच्या आधारे नव्याने माहिती देणारा ऐतिहासिक स्वरूपाचा वृत्तलेख लिहिणे अपेक्षित असते.
  • गावे, स्थळे, प्राचीन मंदिरे, वस्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात.
  • या वृत्तलेखात अशा ऐतिहासिक संदर्भांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करणे आवश्यक असते.
  • शिलालेख, नाणी, भूर्जपत्रे, ताम्रपट यांच्या इतिहासकालीन रूपाचा बदलत्या काळात नव्याने अर्थ शोधला जात आहे. नवनवीन माहिती समोर येत आहे.
  • संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यासातून एखादया वस्तू किंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. या नव्या माहितीच्या संदर्भात वृत्तलेख करणे महत्त्वाचे ठरते.
  • लोकसाहित्य, लोककला, लोकसंस्कृती यासंदर्भात वृत्तलेखक विविध क्षेत्रभेटीतून जे जे अनुभवास आले, त्याला अनुलक्षून वृत्तलेखन करू शकतो. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख लिहित असताना इतिहास तज्ज्ञ, त्यांच्याशी विषयानुरूप केलेल्या चर्चा, व्याख्यान, मुलाखती इत्यादीचे साहाय्य घेणे उपयुक्त ठरते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखात आवश्यकतेनुसार नकाशा, चित्रे, छायाचित्रे यांचा वापर करता येऊ शकतो. उदा., शनिवारवाडा, हेमाडपंथीय मंदिराचे शिल्पकाम, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर इत्यादी.

5. नवल, गूढ इत्यादींवर आधारित वृत्तलेख :

  • एखादी विस्मयकारक घटना, निसर्गातील नवलाई यासंबंधीच्या अनुभवांवर आधारित लेखन या प्रकारच्या वृत्तलेखात केले जाते.
  • एखादया परिसरातील निसर्गाच्या आश्चर्यजनक किमया, गूढ, अनाकलनीय गोष्ट, निसर्गातील एखादी लक्षवेधी परंतु चमत्कारिक गोष्टदेखील वृत्तलेखाचा विषय होऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या वृत्तलेखात माहितीची विश्वासार्हता तपासणे फार महत्त्वाचे असते. उपलब्ध माहितीची शहानिशा करणे, माहितीची पारख करणे, चिकित्सा करणे यांसारख्या बाबी प्राधान्याने विचारात घेणे गरजेचे असते.
  • निसर्गातील अनाकलनीय गोष्टी सत्यतेच्या चाचणीतून लेखात मांडणे अतिशय कौशल्यपूर्ण काम असते. वृत्तलेखकाला जबाबदारीने या प्रकारच्या वृत्तलेखाचे लेखन करणे आवश्यक असते.
  • कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा अफवा पसरवणारी माहिती, नोंदी, नकारात्मकता वृत्तलेखातून प्रकट होणार नाही याची काळजी कटाक्षाने या प्रकारच्या वृत्तलेखात घ्यावी लागते.
  • उदा., सांगलीत नदीच्या पाण्याची पातळी ५८ फूट, रांजणखळगे, गरम पाण्याचे कुंड इत्यादी. वृत्तलेखांच्या वरील प्रकारांशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, लोकरुचीचे कार्यक्रम, खादयसंस्कृती इत्यादी विषयांवरही वृत्तलेख लिहिले जाऊ शकतात.

वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत :

प्रसारमाध्यमातील व्यक्तींना सध्या घटनेतही बातमी दिसत असते. वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना येणारे अनुभव, प्रवास, भेटणाऱ्या व्यक्ती विविध वर्तमानपत्रातील बातम्या, पुस्तके, नियतकालिके, संकेतस्थळ यांसारख्या विविध साधनांच्या आधारे वृत्तलेखाचे विविध विषय मिळत असतात. वृत्तलेखाच्या विषयांचे काही महत्त्वाचे स्रोत पुढीलप्रमाणे –

1 बातमी :

  •  वृत्तलेखात बातमीपलीकडची बातमी चित्रित केलेली असते. वर्तमानपत्रात, नियतकालिकात छापील स्वरूपात आलेल्या बातम्या वृत्तलेखाला विषय पुरवत असतात.
  • दूरचित्रवाणीवर दाखवली जाणारी एखादी घटना लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज रुजवत असते.
  • बातमीपेक्षा अधिक काही जे बातमीत दडलेले असते, त्याचा शोध वृत्तलेखात घेणे आवश्यक असते.
  • बातमीसोबत जोडले असलेले संदर्भ, दुवे, महत्त्वाच्या गोष्टी, मुलाखती यांच्या साहाय्याने बातमीच्या आधारावर वृत्तलेखनाचा मजकूर फुलवता येऊ शकतो.
  • कुठल्याही बातमीकडे सूक्ष्मपणे पाहिले, त्यातील बारकावे लक्षात घेतले, तर वृत्तलेखासाठी भूमी तयार होऊ शकते.
  • बातमी, बातमीभोवती असणारे विविध कंगोरे, बातमीचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला, तर वृत्तलेखासाठी अनेक विषय मिळू शकतात.
  • उदा., ‘अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त’ या बातमीच्या आधारे, दादासाहेब फाळके पुरस्काराचे महत्त्व, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ५ अभिनयाचा प्रवास, महत्त्वाचे चित्रपट, कौटुंबिक पार्श्वभूमी, अमिताभ बच्चन यांचा जीवनप्रवास इत्यादी मुद्द्यांच्या आधारे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. व्यक्तिगत अनुभव :

  • पत्रकारितेचे क्षेत्र म्हणजे नित्यनवा जिवंत अनुभव असणारे क्षेत्र मानले जाते.
  • पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना रोज नव्या आव्हानात्मक घटना/प्रसंगांना सामोरे जावे लागते.
  • बातमी बघताना अनेक अनुभव मिळत असतात. या अनुभवांपैकी काही मूळ बातमीस पूरक ठरतात, तर काही अनुभव लेखकाच्या मनात साठवले जातात. या अनुभवांची शिदोरी लेखकाला वृत्तलेखात उपयोगी पडते.
  • या अनुभवांचा पुनरुच्चार एखादया वृत्तलेखात करता येऊ शकतो. गतकाळातील अनुभवात भविष्यातील एखादया वृत्तलेखाची बीजे रुजलेली असतात.
  • उदा., ‘आश्रमातील मुलांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप’ अशा बातमीच्या भोवताली लहान मुलांचे भावविश्व, मुलांचे आश्रमातील जीवन, कुटुंबापासून दूर असल्याची भावना, लहान मुलांची शैक्षणिक, वैचारिक जडणघडण असे कितीतरी बातमीमागचे पैलू लेखकाला दिसू शकतात.
  • यासंदर्भाच्या आधारे ‘एकटेपणात अडकलेले बालविश्व’ अशा प्रकारचा वृत्तलेख निश्चितच आकाराला येऊ शकतो.

3. भेटीगाठी/संभाषण :

  • पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना नेहमी लोकसंपर्कात राहणे गरजेचे असते. यासाठी व्यवसायाची गरज म्हणून संवादकौशल्य हवे असते. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक असते. लेखनकौशल्यावर प्रभुत्व असावे लागते.
  • पत्रकारितेत अनेकदा विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी ते सामान्य व्यक्ती अशा प्रत्येक घटकातील व्यक्तींशी संवाद साधावा लागतो.
  • प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, खेळाडू यांच्याशी संभाषण करीत असताना कितीतरी स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कितीतरी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करावी लागते.
  • कधी कधी व्यक्ती बोलत नाहीत; अशा वेळी बातमी जाणून घेण्यासाठी व्यक्तींना बोलते करण्याचे काम पत्रकारांना करावे लागते.
  • या गप्पांमधून वृत्तलेखासाठी आवश्यक बरेच विषय मिळू शकतात. व्यक्ती ते घटना/प्रसंग यामागील अनेक पैलूंचा वेध घेण्याचे काम वृत्तलेखक करीत असतो. या सर्वांतून वृत्तलेखाचा विषय सहज मिळू शकतो.

4 निरीक्षण :

  • पत्रकारिता क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीला सदैव चौकस राहावे लागते. बातमीचे धागेदोरे शोधावे लागतात.
  • अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून त्यातून बातमी शोधता येणे पत्रकारितेत आवश्यक असते.
  • अशा सजगतेतून वृत्तलेखाचे विषय मिळत असतात. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात.
  • उदा., ‘खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी’, ‘शेतीसाठी बैलांऐवजी माणसांचा वापर’ अशा कितीतरी गोष्टी भोवती घडत असतात.
  • यातूनच वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात.

वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि पडदयामागे घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेणे महत्त्वाचे असते. तर्कबुद्धी या लेखनात गरजेची असते.

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी :

वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल, याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्रांच्या विक्रीची आर्थिक गणिते अवलंबून असतात. त्यादृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयांची निवड यांचा विचार करावा लागतो.

वृत्तलेखात पुढील बाबी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात –

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 2

(१) वाचकांची अभिरुची : वर्तमानपत्राला बातमीसोबत वाचक वर्ग कोणता आहे, याचा विचारही प्राधान्याने करावा लागतो. वाचकांची अभिरुची वर्तमानपत्रीय गणितात महत्त्वाची मानली जाते. वाचकांची गरज आणि आवड बघून वृत्तलेखाच्या विषय, आशय, भाषा यांची निवड करावी लागते. वाचकांना आवडतील, उत्सुकता निर्माण करतील, अशा वृत्तलेखांची मांडणी केली तर लोकांच्या पसंतीस पडू शकतात. वाचकांच्या अभिरुचीचा विचार करून लिहिलेले वृत्तलेख वाचकांच्या मनावर अधिराज्य करू शकतात. वृत्तलेखात वाचकांच्या अभिरुचीचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक असते.

(२) तात्कालिकता : वृत्तलेख नैमित्तिक असतात. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. तात्कालिक कारण असेल तर वाचक तो लेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.

(३) वेगळेपण : वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा, समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात येण्याची गरज असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

(४) वाचकांचे लक्ष वेधणे : वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. वृत्तलेखाचा आराखडा ठरवणे आवश्यक असते. वृत्तलेखाचा विषय, संदर्भ, शीर्षक, उपशीर्षके, चित्रे, तक्ता, नकाशा, छायाचित्र इत्यादी बाबींचा विचारही वृत्तलेखाच्या मांडणीत करणे गरजेचे असते. मजकुराला समर्पक चित्र/छायाचित्र कुठे उपलब्ध होईल, तसेच त्याचा नेमकेपणाने उपयोग मजकुराच्या कोणत्या भागात करता येईल, याचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाच्या उत्तम मांडणीसाठी या सर्व बाबींचा सविस्तर विचार लेखकाला करावा लागतो. यासंबंधीचे नियोजन केले, टिपण काढले, चित्रांची मांडणी ठरवली, तर वृत्तलेख लिहिणे सोपे होते.

(५) वृत्तलेखाची शैली : वृत्तलेखात बातमीच्या पलीकडे असणारे कंगोरे शोधावे लागतात. साधारणपणे वृत्तलेखाच्या मांडणीत तीन टप्पे मानले जातात. पहिल्या टप्प्यात वृत्तलेखातील बातमीचा उलगडा केला जातो. बातमीतील ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती वृत्तलेखाच्या आरंभीच्या भागात होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या मध्य भागात बातमीचे विवेचन अपेक्षित असते. वृत्तलेखाच्या समारोपात वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार मांडणे गरजेचे असते.

वृत्तलेख सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरणे आवश्यक असेल, तर त्याची साधी, सोपी सहज आकलन करता येण्याजोगी असावी. बोजड शब्द, गुंतागुंतीची वाक्यरचना, शब्दबंबाळपणा वृत्तलेखात टाळावा. वृत्तलेखातील वाक्यरचना लहान वाक्यांची असल्यास वाचकांना विषय समजून घेणे सुलभ होते. मनावर पकड घेण्यास परिणामकारक भाषा असावी. ज्या विषयासंबंधी वृत्तलेखाचे औचित्य आहे, तो विषय लोकांच्या जिज्ञासेची पूर्तता करण्यात सफल झाला आहे, याचा विचार करणे आवश्यक असते.

वृत्तलेखातील व्यावसायिक संधी :

  • आज वेगवान माध्यमांच्या काळात लोकांपर्यंत बातमी पोहोचण्याचा वेग प्रचंड आहे. ब्रेकिंग न्यूजचा हा काळ आहे, असे म्हणता येते.
  • बातमीच्या मुळापर्यंत जाऊन समग्र घटना लोकांना वाचनास उपलब्ध करून देणे हे आव्हानात्मक आणि कौशल्याचे काम आहे.
  • अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी आवश्यक असतात.
  • चौकस दृष्टी, लेखनकौशल्य बातमीचा शोध घेण्याची जिज्ञासा असणाऱ्या व्यक्तींना वर्तमानपत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
  • वृत्तपत्रांसाठी वृत्तलेखन करणाऱ्या लेखकांना विशिष्ट रकमेचे मानधनदेखील दिले जाते.
  • वृत्तलेखन बदलत्या माध्यमांच्या काळात युवावर्गाला आकर्षित करणारे क्षेत्र बनत आहे.

नोंद : वृत्तलेख समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.११० व १११ वर दिलेला वृत्तलेख नमुना अभ्यासा.