Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा (गीत)

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा Textbook Questions and Answers

भावार्थ :

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

मुलाने शाळेत शिकण्यास सुरुवात केल्यापासून ते शिक्षण प्रवास पूर्ण होईपर्यंत कितीतरी शिक्षक त्याला प्रत्येक वळणावर भेटतात. ते सतत आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान, मूल्य, आदर्शाची शिकवण देतात. त्यामुळे आपण माणूस म्हणून आकारास येतो. गुरूच्या शिकवणीतून आपल्या अंगी सद्गुण येतात. याच सद्गुणांची शिदोरी घेऊन, तोच ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा वारसा पुढे दुसऱ्या पिढीपर्यंत चालवू (घेऊन जाऊ) असे कवी सांगतात.

पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा!

तुम्हीच आमचे पिता (वडील), बंधु (भाऊ), स्नेही (मित्र) आहात. तुम्ही आमची माऊली (आई) आहात. तुम्हीच आमच्या जीवनातील कल्पवृक्षाखालील सावलीप्रमाणे आहात. तुम्हीच ज्ञानरूपी सूर्य बनून आम्हांस ज्ञानाचा कवडसा (झरोका) दिला आहे.

जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!

जिथे काल जमिनीतील बीजाला अंकुर फुटले तिथे आज |अंकुराची वेल होऊन त्यावर फुले फुलेली आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी वृक्षालासुद्धा ज्ञानाची फळे लागून तो फलद्रूप व्हावा.

शिकू धीरता, शूरता, बीरता
धरू थोर विधेसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा।

गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या शिकवणूकीतून आपण सारे संयम, धाडस, पराक्रम शिकूया. थोर ज्ञानप्राप्तीने आपल्यामध्ये कशाप्रकारे नम्रता आणता येईल हा एकच ध्यास आपल्या मनाला लागला पाहिजे.

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा!

जरी कोणी दुष्ट असतील, त्यांना शासन (दंडीत) करू. जे कोणी गुणी आहेत, सज्जन आहेत, त्यांचेच पालन (रक्षण) करू. हाच पक्का विचार आमच्या सर्वांच्या मनात आहे.

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा!

हे पुण्यवंता, भल्या (ज्ञानी) माणसा, अशाप्रकारे तुम्ही केलेला त्याग, तुमची सेवा शेवटी आमच्या रूपाने फळाला येईल. तुमचा नावलौकिक, कीर्ति दाही दिशांना अबाधित राहिल.

आम्ही चालवू हा पुढे वारसा Summary in Marathi

काव्य परिचय :

जगदीश खेबूडकर रचित प्रस्तुत गीतातून गुरूने दिलेल्या ज्ञानाची महती वर्णिली असून गुरूंच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणवून सत्कार्ये करणे, म्हणजेच गुरूने दिलेला वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून दिले आहे.

The poet Jagdish Khebudkar has composed the song.’ Amhi chalavu ha pudhe varasa’ Through this song he has described the importance of knowledge and virtuous conduct given by his teacher and further he has also promised to carry on this legacy.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा

शब्दार्थ :

  1. वारसा – परंपरा वसा – legacy, heritage
  2. वास – व्रत, प्रतिज्ञा – Pledge
  3. पिता – वडील – father
  4. बंधु – भाऊ – brother
  5. स्नेही – मित्र, सखा – friend
  6. माउली – आई – mother
  7. कल्पवृक्ष – इच्छिल्याप्रमाणे देणारा वृक्ष – the tree that yields whatever is desired
  8. तळी – खालील – underneath
  9. अम्हां – आम्हांला – us
  10. कोंब, मोड – sprout
  11. बीज – बी – seed
  12. वेल – लता – creeper
  13. वृक्ष – झाड – tree
  14. धीर – संयम – patience
  15. थोर – मोठे, श्रेष्ठ – big, great
  16. विदया – ज्ञान – knowledge
  17. सवे – सोबत, बरोबर – with
  18. मनी – मनात – in mind
  19. ध्यास – सतत विचार करणे – constant thinking
  20. दुष्ट – वाईट – bad, cruel
  21. सज्जन – सभ्य – gentleman
  22. गृहस्थ मानसी – मनात – in mind
  23. त्याग – समर्पन, बलिदान – sacrifice
  24. कात ख्याता, प्रासधा – reputation, fame

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा

वाकाचार

फलद्रूप होणे – सफल होणे

टिपा

कवडसा – गवाक्षातून येणारा प्रकाशकिरण – a small ray of light coming through an aperture
पुण्यवंत – शुद्ध झालेला, पवित्र – virtuous.