Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Textbook Questions and Answers
स्वाध्याय :
1. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
प्रश्न 1.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
1. भारतात सर्वांत पहिली रेल्वे …………… येथून सुटली. (ठाणे, मुंबई, कर्जत, पुणे)
2. रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी …………….. ठेवले. (तिकीट, बक्षीस, इनाम, प्रलोभन)
उत्तर :
1. मुंबई
2. इनाम
2. आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
3. आकृती पूर्ण करा.
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
उत्तर :
4. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
5. कारणे लिहा.
प्रश्न अ.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय लोकांवर अंधश्रद्धांचा प्रभाव खूप जास्त होता. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधताहेत. त्यांच्या पायांत गाडायला जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा डाव आहे अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.
प्रश्न आ.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
उत्तर :
रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. शेवटी दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाची योजना सुरू केली. पैशाच्या लालुचीने ठाण्याचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले की, त्यांच्या घरचे लोक आजूबाजूला उभे राहून खूप रडायचे.
त्यांची समजूत काढणे खूप त्रासाचे असायचे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले की चौकशी करणाऱ्यांचे घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले आणि नंतर रेल्वे प्रवासाची लोकांची भीती निघून गेल्याचे पाहून इनामे बंद करण्यात आली.
6. स्वमत
प्रश्न अ.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला,’ तुमचे मत लिहा.
उत्तर :
आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही होय. याच मुंबईहून पहिली रेल्वे 18 एप्रिल, 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी धावली होती. या रेल्वेमुळेच ठाणे ते मुंबई हा दिवसभराचा प्रवास अवघा सव्वा तासावर आला. याच रेल्वेने मुंबई -पुणे ही दोन शहरे जोडून टाकली. कारखानदारी, व्यापार, नोकरीधंदा यांमध्ये प्रचंड वाढ झाली.
व्यापारी मंडळी, नोकरदार मंडळी यांचे कामधंदयाचा निमित्ताने येणे-जाणे वाढले, वेळेची बचत झाली, कामाचा पसारा वाढला.कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक या रेल्वेमुळे सहजपणे होऊ लागली. त्यामुळेच या शहरांची प्रगती वेगाने होऊ लागली. एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये भरच पडत गेली. नंतरच्या काळामध्ये रेल्वेचे जाळेच संपूर्ण देशभर विणले गेले. त्याचाच परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यामध्ये रेल्वेचे योगदान फार मोलाचे आहे.
प्रश्न आ.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय जनमानसांवर अंधश्रद्धांचा फार मोठा पगडा होता. कोणताही आधुनिक बदल सहजासहजी स्वीकारला जात नव्हता. पांरपरिक गोष्टींवर लोकांचा जास्त विश्वास होता.जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या रेल्वेला, भारतीयांनी सुरुवातीला इंग्रजांनी सुरू केलेली वाफेची गाडी म्हणजे विलायती भुताटकी आहे. असे म्हटले. लोकांना ठाणे-मुंबई रेल्वे प्रवासाची सवय व्हावी, गोडी लागावी म्हणून मोफत प्रवास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला होता.
त्यावेळी मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे, असा विचार केला जात होता. याचाच अर्थ नवी इमारत किंवा नवा पूल बांधायचा असला तर त्याच्या मजबुतीसाठी त्याच्या पायामध्ये माणसांना जिवंत गाडावे लागते किंवा त्यांचा बळी दयावा लागतो, अशी विचित्र अंधश्रद्धा स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये होती.
प्रश्न इ.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
उत्तर :
(उतारा 4 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहा.)
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Additional Important Questions and Answers
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
- आगीनगाडी निघणार त्या मुहूर्ताचा दिवस – [ ]
- कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले – [ ]
- एकेरी रस्ता – [ ]
उत्तर :
- दिनांक 18 एप्रिल सन 1853 (सोमवार)
- लोक
- मुंबई ते ठाणे
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
- बरोबर पाच वाजता आगगाडीने कूक शिटीचा कर्णा कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.
- मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
- सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
- मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.
उत्तर :
- मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
- सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
- मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.
- बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक शिटीचा कर्णा फुकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम कोणी केला?
उत्तर :
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला.
ii. लोकांना कोणती कल्पना अचंब्याची वाटली?
उत्तर :
लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पना लोकांना अचंब्याची वाटली. –
iii. किती वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली?
उत्तर :
सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
- ……….. मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे-पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. (सन-1835, सन – 1853, सन-1930, सन – 1630)
- दहा डब्यांची ………….. खुशाल चालली आहे. (माळका, माळ, मालिका, शृंखला)
- बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक ………….. कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली. (गाडीचा कर्णा, शिटीचा कर्णा, इंजिनाचा कर्णा, डन्याचा कर्णा)
उत्तर :
- सन – 1853
- माळका
- शिटीचा कर्णा
प्रश्न 6.
शब्दजाल पूर्ण करा.
उत्तर :
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पनाच…………..
(अ) लोकांना धक्कादायक होती.
(ब) लोकांना मोठी अचंब्याची होती.
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.
(ड) लेखकाला मोठी अचंब्याची होती.
उत्तर :
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.
ii. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!
(ब) विंग्रेजांनी पाण्यालाच गाडी ओढायला लावले!
(क) विंग्रजांनी हवेलाच गाडी ओढायला लावले!
(ड) विंग्रजांनी बाप्पाला गाडी ओढायला लावले!
उत्तर :
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!
प्रश्न 2.
चूक की बरोबर ते लिहा.
- 19 एप्रिल सन 1953, सोमवार रोजी सायंकाळी 4 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.
- इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे
- मुंबई ते पुणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
- विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!
उत्तर :
- चूक
- बरोबर
- चूक
- बरोबर
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. हि कल्पनाच लोकांना मोठी आचंब्याचि वाटली.
ii. कमल आहे बूवा या विंग्रेजांची!
उत्तर :
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. कमाल आहे बुवा या विग्रेजांची!
प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
- पेनिनशुला, पेनीनशुला, पेनिनशूला, पेनिशूला
- झुकझूक, झुकझूख, झुकझुक, झूकझूक
- मुहुर्ताचा, मुहुरताचा, मुहुतार्चा, मुहूर्ताचा
- विंग्रेजी, ईग्रजी, वीग्रजी, विग्रेजि
उत्तर :
- पेनिनशुला
- झुकझुक
- मुहूर्ताचा
- विंग्रेजी
प्रश्न 3.
वचन बदला.
- डबा – [ ]
- निशाण – [ ]
- रेडे – [ ]
- तोरण – [ ]
उत्तर :
- डबे
- निशाणे
- रेडा
- तोरणे
प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.
- युक्ती – [ ]
- सुमन – [ ]
- पताका – [ ]
- जल – [ ]
- आग – [ ]
उत्तर :
- कल्पना
- फूल
- निशाण
- पाणी
- विस्तव
प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. मोठा | (अ) बरोबर |
2. शेवट | (ब) छोटा |
3. चूक | (क) सुरुवात |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. मोठा | (ब) छोटा |
2. शेवट | (क) सुरुवात |
3. चूक | (अ) बरोबर |
प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
- निशाणे
- डबे
- खुर्ध्या
- लोक
- तोरणे
प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | मूळ शब्द | सामान्यरूप |
मुहूर्ताचा | मुहूर्त | मुहूर्ता |
दिवसाने | दिवस | दिवसा |
लाखांवर | लाख | लाखां |
कलियुगातला | कलियुग | कलियुगा |
प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
i. आ वासून उभे असणे
ii. पाठबळ असणे
उत्तर :
i. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : जादूचे प्रयोग पाहायला लोक आ वासून उभे होते.
ii. अर्थ : पाठिंबा असणे.
वाक्य : सह्याद्रीचे पाठबळ होते म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज उभारले.
प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ
प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. तुमचे मत लिहा.
उत्तर :
रेल्वेचा शोध हे 19 व्या शतकातले फार मोठे आश्चर्य होय. रेल्वेचा शोध लागल्यामुळे विस्तव व पाणी यांच्या समन्वयातून तयार होणाऱ्या वाफेवर रेल्वे गाडी चालू लागली. कमीत कमी वेळात ती लांब लांबचा प्रवास करू लागली. त्यामुळे लोकांचा वेळ वाचु लागला. व्यापारी वर्ग व्यापारासाठी रेल्वेचा वापर करू लागले. अवजड यंत्रे, निरनिराळ्या वस्तू यांची रेल्वेने वाहतूक होऊ लागली.
त्यामुळे त्यांची व्यापारात भरभराट होऊ लागली. दळणवळण सुलभ व प्रगत झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावला जाऊ लागला. देशाची आर्थिक प्रगती होऊ लागली. म्हणून रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तर लिहा.
लोकात कशाचे पीक पिकले होते?
उत्तर :
लोकात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
- दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दबंडी पिटण्यात आली.
- मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
- एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेडीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.
- लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
उत्तर :
- मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
- दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.
- लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
- एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. दुसऱ्या दिवसापासून कोणती दवंडी पिटण्यात आली?
उत्तर :
दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.
ii. विंग्रेजांची विलायती भुताटकी कोणती आहे?
उत्तर :
वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
- वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती ……………. आहे. (भुताटकी, राक्षस, यंत्र, मशीन)
- तेवढ्यानेही कोणाचे …………… होईना. (समाधान, कौतुक, दुःख, नवल)
- मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन …………… सुखरूप परत आली. (पुण्याला, मुंबईला, रत्नागिरीला, कोल्हापुरला)
- मुंबईला नव्या इमारती नि ………… बांधताहेत. (बांध, धरण, पूल, रस्ते)
उत्तर :
- भुताटकी
- समाधान
- मुंबईला
- पूल
प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
कचेरीतले कारकून :: व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे : ……………….
उत्तर :
गुमास्ते
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
कोण ते लिहा.
- सरकारी कचेरीतले – [ ]
- व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे – [ ]
- विंग्रेजांची विलायती भुताटकी – [ ]
- खूप आटापीटा करणारे – [ ]
उत्तर :
- कारकून
- गुमास्ते
- बाफेची गाडी
- रेल्वेचे कारभारी
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.
- आगगाडीत बसणे धोक्याचे आहे.
- लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
- वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीर झाला.
उत्तर :
- असत्य
- सत्य
- असत्य
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा.
i. लोकांत भलत्याच कंड्या नी अफवांचे पिक पिकले होते,
ii. तेवढ्यानेही कोणाचे समधान होइना.
उत्तर :
i. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
ii. तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना.
प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
- साळसूद, साळसुद, साळखुद, साळखूद
- मुहूरतावर, मुहूर्तावर, मुहुर्तावर, मुहर्तावर
- सुखरूप, सूखरूप, सुरुप, सुकरुप
उत्तर :
- साळसूद
- मुहूर्तावर
- सुखरूप
प्रश्न 3.
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. विलायती | (अ) धोका |
2. फुकट | (ब) विदेशी |
3. संकट | (क) कंड्या |
4. अफवा | (ड) मोफत |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. विलायती | (ब) विदेशी |
2. फुकट | (ड) मोफत |
3. संकट | (अ) धोका |
4. अफवा | (क) कंड्या |
प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
- दुःखाचा × [ ]
- उशीरा × [ ]
- जुन्या × [ ]
- मृत × [ ]
- मूर्ख × [ ]
- असमाधान × [ ]
उत्तर :
- सुखाचा
- लवकर
- नव्या
- जिंवत
- शहाणे
- समाधान
प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
- कारकून
- गुमास्ते
- इमारती
- पूल
प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
दिवसापासून | दिवसा |
धोक्याचे | धोक्या |
कारभाऱ्यांनी | कारभाऱ्या |
लोकांत | लोकां |
सुखाचा | सुखा |
वाफेच्या | वाफे |
व्यापाऱ्यांच्या | व्यापाऱ्यां |
प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
- दवंडी पिटणे
- फूस लावणे
- समाधान होणे
उत्तर :
- जाहीर घोषणा करणे
- गुप्तपणे/फसवून उत्तेजन देणे
- तृप्त होणे
प्रश्न 8.
काळ बदला. (वर्तमानकाळ करा)
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
उत्तर :
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले आहे.
प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारत देशात अंधश्रद्धेचे साम्राज्य होते. अंधश्रद्धेने समाजाला पोखरून काढलेले होते. सती जाणे, मांजर आडवे जाणे, केशवपन करणे, विधवेचे दर्शन होणे अशा कितीतरी प्रकारच्या अंधश्रद्धा देशात आ वासून उभ्या होत्या. भारतीय लोक निरक्षर असल्यामुळे ते या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडत होते. अर्धश्रद्धेचा लोकांवर इतका पगडा होता की त्यांची मानसिकताच जणू मृतप्राय झालेली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर या अंधश्रदधेने अनेक भारतीयांचे बळी घेतलेले होते. तरी देखील तत्कालीन लोक डॉक्टरकडे न जाता ढोंगी, साधू व मांत्रिकांवरच विश्वास ठेवत असत. खरोखरच देश स्वतंत्र होण्याअगोदर अंधश्रद्धा हा भारतीय समाजाला लागलेला एक फार मोठा कलंक होता आणि त्याचा प्रभाव कमी करण्याकरीता अनेक समाजसुधारकांना आपल्या जिवाचे रान करावे लागले होते.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलणारी
ii. समजूत काढता काढता टेकीला यायचे –
उत्तर :
i. घरची माणसे
ii. रेल्वेचे अधिकारी
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
- पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
- इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.
- दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला,
- समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
उत्तर :
- दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला.
- पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
- समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
- इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. इनामे बंद का झाली?
उत्तर :
रेल्वे प्रवास करताना लोकांचा धीर चेपला म्हणून इनामे बंद झाली.
ii. ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास किती दिवस खायचा?
उत्तर :
ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास तब्बल एक दिवस खायचा.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा.
मग मात्र लोकांची …………… लागली. (झुंबड, तुंबड, चंगळ, मौज)
उत्तर :
झुंबड
प्रश्न 6.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
i. प्रवास करणारी व्यक्ती –
उत्तर :
प्रवासी
b
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. समजूत काढता काढता रेल्वेचे ……………
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.
(व) पदाधिकारी अगदी टेकीला यायचे.
(क) अधिकारी अगदी आनंदी असायचे.
(ड) अधिकारी दु:खी व्हायचे.
उत्तर :
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.
ii. अवध्या सव्वा तासात ठाण्याचा असामी …………..
(अ) पुण्याला येऊ जाऊ लागला.
(व) कोल्हापूरला येऊ जाऊ लागला.
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.
(ड) ठाण्याला येऊ जाऊ लागला.
उत्तर :
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तर लिहा.
ठाण्याचा आसामी मुंबईला किती तासात येऊ जाऊ लागला?
उत्तर :
ठाण्याचा असामी मुंबईला अवघ्या सव्वा तासात येऊ जाऊ लागला.
प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.
i. अखेर दर माणशी दोन रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
ii. घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची.
उत्तर :
i. असत्य
ii. सत्य
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळिवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
उत्तर :
पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :
- मोफत
- दर
- एक
प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
i. खटारगाडीचा, कटारगाडीचा, खटारगाडिचा, खटारडीचा
ii. आजूबाजुला, आजुबाजुला, आजूबाजूला, आजुबाजूला.
उत्तर :
i. खटारगाडीचा
ii. आजूबाजूला
प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.
- बक्षीस – [ ]
- तपास – [ ]
- धिटाई – [ ]
- दिन – [ ]
उत्तर :
- इनाम
- चौकशी
- धीर
- दिवस
प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- सुरुवात × [ ]
- विकत × [ ]
- रात्र × [ ]
- मागे × [ ]
उत्तर :
- अखेर
- मोफत
- दिवस
- पुढे
प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
- लोक
- माणसे
- इनामे
- अधिकारी
- घोळके
- तिकिटे
प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | प्रत्यय | विभक्ती |
प्रवासाचा | चा | षष्ठी |
पैशाच्या | च्या | षष्ठी |
मुंबईला | ला | चतुर्थी |
लोकांची | ची | षष्ठी |
प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
प्रवासाचा | प्रवासा |
ठाण्याचा | ठाण्या |
पैशाच्या | पैशा |
प्रश्न 9.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा,
i. धाय मोकलून रडणे
ii. झुंबड उडणे
उत्तर :
i. अर्थ : मोठमोठ्याने रडणे.
वाक्य : आपल्या आवडत्या कुत्र्याचा अपघात झालेला पाहून रजनी धाय मोकलून रडू लागली.
ii. अर्थ : गर्दी करणे.
वाक्य : माकडाचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली होती.
प्रश्न 10.
काळ बदला. (भविष्यकाळ करा)
- ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतात.
- लोकांची झुंबड लागली होती.
- नंतर चार आणे झाले.
उत्तर :
- ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतील.
- लोकांची झुंबड लागेल.
- नंतर चार आणे होतील.
प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का? स्पष्ट करा.
उत्तर :
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असतो. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत, पद्धत वा तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास लोकांना फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ वा आश्चर्य वाटत नाही पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास थोडाफार वेळ लागतोच,
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास तासांत व्हायचा – [ ]
ii. घाट – उतरणीला किती तास लागायचे – [ ]
उत्तर :
i. अठरा
ii. चार
प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता | (अ) दोन स्टेशने |
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान | (ब) ‘ओपणिंग शिरोमणि’ |
3. कंत्राट घेणारा | (क) अठरा तासांचा |
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास | (ड) करशेटजी जमशेटजी |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता | (ब) ‘ओपणिंग शिरोमणि’ |
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान | (अ) दोन स्टेशने |
3. कंत्राट घेणारा | (ड) करशेटजी जमशेटजी |
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास | (क) अठरा तासांचा |
प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
- मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
- ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.
- आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे
- मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.
उत्तर :
- मोठ्या थाटामाटाने ‘ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
- मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.
- आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.
- ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.
प्रश्न 5.
खालील प्रश्नाचे उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. कोणत्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला?
उत्तर :
खंडाळ्याहून पुण्यापर्यंतच्या सपाटीच्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला.
ii. घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट कोणी घेतले होते?
उत्तर :
घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी यांनी घेतले होते.
प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
- ……… काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला. (मेळघाटाचे, कशेडी घाटाचे, फोंडाघाटाचे, बोरघाटाचे)
- खंडाळ्याहून पुण्यापर्यंचा सपाटीचा रेल्वे-रस्ता सन …………. च्या फेब्रुवारीत पुरा झाला. (1858, 1850, 1860, 1958)
- सगळा काफिल्ला ………… आला. (देवगिरीला, खोपवलीला, सोनखडीला, राजगीरीला)
उत्तर :
- बोरघाटाचे
- 1858
- खोपवलीला
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी ………………
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.
(ब) दोन उपाहारगृहे ठेवण्यात आली.
(क) दोन माणसे ठेवण्यात आली.
(ङ) दोन ठिकाणे ठेवण्यात आली.
उत्तर :
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.
ii. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास
(अ) अवघ्या वीस तासांत व्हायचा.
(ब) अवघ्या दहा तासांत व्हायचा.
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
(ड) अवघ्या तीस तासांत व्हायचा.
उत्तर :
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
प्रश्न 2.
कोण ते लिहा.
i. बोरघाट पोखरण्याची योजना करणारे – [ ]
ii. प्रवाशांची घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे – [ ]
उत्तर :
i. इंजिनीयर (इजनेर) लोक
ii. करशेटजी जमशेटजी
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.
- पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
- रस्ता दुहेरीच होता.
- आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.
उत्तर :
- सत्य
- असत्य
- सत्य
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. त्याचाहि मोठ्या थाटामाटाने ‘ओपणींग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पूण्याचा रेल्वेप्रवास जारीने चालू झाला,
उत्तर :
i. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.
प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
i. खंड्याळाहून, खंडाळ्याहून, खंडाळायाहून, खंड्याळहुन
ii. उतरणीची, उतरणिची, उतरणिचि, उतरणिच
उत्तर :
i. खंडाळ्याहून
i. उतरणीची
प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
- कर्म – [ ]
- आश्चर्य – [ ]
- गंमत – [ ]
- बेत – [ ]
उत्तर :
- काम
- नवल
- मौज
- योजना
प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
i. बंद × [ ]
ii. दुहेरी × [ ]
उत्तर :
i. चालू
ii. एकेरी
प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
- लोक
- पालख्या
- डोल्या
- खुर्ध्या
- स्टेशने
प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
पोखरण्याची | पुण्याच्या |
पोखरण्या | पुण्या |
खंडाळयाला | खंडाळ्या |
व्यापाऱ्याने | व्यापाऱ्या |
प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
- रवाना होणे
- नवल वाटणे
- योजना आखणे
उत्तर :
- निघून जाणे
- आश्चर्य वाटणे
- बेत आखणे
प्रश्न 8.
वाक्यांतील काळ ओळखा.
i. रस्ता एकेरीच होता.
ii. ज्याला त्याला मोठे नवलच वाटायचे,
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ
प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर सांगा.
उत्तर :
रेल्वेमुळे प्रवास लवकर आणि सुखाचा होतो. बाकी गाड्यांच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास जास्त सुरक्षित असतो. हा प्रवास स्वस्त आणि कमी खर्चिक असतो. एकाच वेळी अनेक शेकडो प्रवासी एकत्रितपणे प्रवास करू शकतात. शिवाय हलक्या तसेच वजनाने जड अशा वस्तू प्रवासात सुरक्षितपणे नेता येतात. रेल्वे फक्त शहराशहरांशी जोडलेली असल्याने गाव-खेड्यांपर्यंत प्रवास करता येत नाही. लांबच्या प्रवासासाठी तिकिट आधीच आरक्षित करावे लागते. अचानक प्रवास करायचा झाल्यास आपल्याला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी मर्यादित गाड्या असतात. दुर्घटना झाल्यास एकाच वेळी शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. पावसात रेल्वे यंत्रणा विस्कळीत होते व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.
जी. आय. पी. रेल्वे Summary in Marathi
लेखकाचा परिचय :
नाव : केशव सीताराम ठाकरे
कालावधी : 1885 – 1973 इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, फर्डे वक्ते. ‘कुमारिकांचे शाप’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे वैचारिक ग्रंथ; ‘खरा ब्राम्हण’, ‘टाकलेले पोर’, ही नाटके; ‘ग्रामण्यांचा सावंत इतिहास’, ‘हिंदवी स्वराज्याचा खून’, ‘कोंदडाचा टणत्कार’ इत्यादी इतिहासविषयक पुस्तके; ‘संत रामदास’, पंडिता रमाबाई, ‘संत गाडगेमहाराज’ इत्यादी चरित्रात्मक लेखन; ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध.
प्रस्तावना :
सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास, याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन लेखकांनी प्रस्तुत पाठात केले आहे.
In the year 1853, british started single railway track between Mumbai to Thane. Marvel of people watching running railway with help of steam, rumours about railway and finally after many hazards starting journey of railway, have beautifully narrated by writer in very easy and subtle language
शब्दार्थ:
- रूळ – लोहमार्ग (a railway line)
- मार्मिक – सूक्ष्म, भेदक (pointed)
- ओघवते – प्रवाही (flowing)
- शैली – पद्धत, रीत (style, mode)
- प्रांत – प्रदेश, विभाग (territory)
- उठाव – बंड (an outbreak)
- नामांकित – प्रख्यात (famous, reputed)
- पाठबळ – भक्कम पाठिंबा (strength of backing. good support)
- फाटा – भाग (part)
- आगीनगाडी – रेल्वे, वाफेवर चालणारी रेल्वे (railway train)
- अचंबा – आश्चर्य, विस्मय (surprise, wonder)
- मुहूर्त – मंगलदायक, शुभ असा क्षण (an auspicious moment)
- शृंगार – शोभा, थाट (decoration, adornment)
- जामानिमा – पोशाख (dress)
- दुतर्फा – दोन्ही बाजूस (to both sides)
- – चार युगांपैकी चौथे युग (the forth age)
- विंग्रजी – इंग्रजी (British)
- विस्तव – (येथे अर्थ) आग (fire)
- सांगड – एकत्र जुळणी, जोडणी (Joining together)
- धीर – धैर्य, संयम (patience, daring)
- दवंडी – जाहीर घोषणा (a public announcement)
- सुखाचा – आनंदाचा (happy)
- कारभारी – (येथे अर्थ) व्यवस्थापक (a manager)
- आटापीटा – कष्ट, मेहनत, परिश्रम (efforts, hardwork)
- कंड्या . अफवा, गप्पा (rumours.gossip)
- भुताटकी – भुतांची किंवा पिशाच्चांची करामत
- फूस – गुप्तपणे दिलेले उत्तेजन (secret instigation)
- साळसूद . साधा, प्रामाणिक (honest, simple, innocent)
- कचेरी – कार्यालय (an office)
- पेढी – जेथे पैशाच्या देवघेवीचे व्यवहार होतात ते ठिकाण (a place wherer money transactions take place)
- कारकून – लेखनकाम हिशेब इ. करणारा सेवक (aderk)
- गुमास्ते – मुनीम (agent)
- डंका – गाजावाजा, प्रसिद्धी (publicity)
- लालूच – लोभीपणा (greediness)
- घोळके – समुदाय, जमाव (groups)
- आठ आणे – पन्नास पैसे
- सर्रास – कित्येकवेळा, वारंवार (very frequently)
- असामी – व्यक्ती (person)
- झुंबड – आतोनात गर्दी (great crowd, rush)
- इंजनेर – इंजिनीयर पोखरणे – खणणे, उकरणे (to dig)
- योजना – बेत (a plan, a programme)
- सपाट – समतल, उंचसखल नसलेला (flat, smooth)
- ओपणिंग शिरोमणि – उद्घाटन सोहळा (Opening ceremony)
- काफिल्ला – प्रवाशांचा तांडा (a group of travellers)
- सरबराई – पाहुणचार, आदरातिथ्य (hospitality)
- कंत्राट – मक्ता , ठेका (contract)
टिपा :
- सर जमशेटजी जिजीभाई – हे प्रसिद्ध पारशी भारतीय व्यापारी होते. ते परोपकारी होते. चीनसोबत व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करण्यात ते ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहेत.
- जगन्नाथ नाना शंकरशेट – (10 ऑक्टोबर, 1800 – 31 जुलै, 1865). हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
- मोरारजी गोकुळदास – हे मुंबईतील कापड उद्योगाचे एक संस्थापक होते. मुंबईत त्यांच्या नावाची एक गिरणी होती.
- आदमजी पीरभाई – सर आदमजी पीरभाई हे भारतीय उद्योगपती, परोपकारी आणि मुंबईतील दाऊदी बोहरा समाजाचे प्रतिनिधी होते.
- डेविड ससून – डेविड ससून 1817 ते 1892 दरम्यान बगदादचे खजिनदार होते. मुंबईला स्थलांतरित झाल्यावर ते यहुदी समाजाचा नेता बनले. त्यांच्या नावाचे मुंबईला एक बंदर आहे. (Sassoon dock)
- बोरघाट – सहयाद्री पर्वतामधला एक घाटरस्ता. हा रस्ता रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला व पुणे जिल्हयातील लोणावळा गावाला जोडतो. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हटले जाते.
वाक्प्रचार :
- पाठबळ असणे – पाठिंबा असणे
- अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे
- जाहीर करणे – घोषित करणे, प्रसिद्ध करणे
- जामानिमा करणे – नटणे, सर्व पोशाख घालून तयार होणे.
- आ वासणे – आश्चर्यचकित होणे
- सांगड घालणे – एकत्र जुळणी करणे
- दवंडी पिटणे – प्रचार/ प्रसार करणे
- फूस लावणे – गुप्तपणे/ फसवून उत्तेजन देणे
- डंका वाजवणे – प्रसिद्धी/ प्रसार करणे
- धाय मोकलून रडणे – जोरजोरात रडणे
- टेकीला येणे – शौण होणे, अतिशय थकवा येणे
- धीर चेपणे – भीती नाहीशी होणे
- झुंबड होणे – अतोनात गर्दी होणे
- रवाना होणे – मार्गस्थ होणे
- नवल वाटणे – आश्चर्य वाटणे