Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा Textbook Questions and Answers

सर्वात्मका शिवसुंदरा Summary in Marathi

कवीचा परिचय :

नाव : विष्णु वामन शिरवाडकर
कालावधी : 1912 – 1999

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. ‘जीवनलहरी’, विशाखा’, ‘समिधा’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘मारवा’, ‘किनारा’ इत्यादी काव्यसंग्रह; ‘वैजयंती’, ‘राजमुकुट’, ‘कौतेय’, ‘नटसम्राट’, ‘वीज महणाली धरतीला’, ‘विदूषक’ इत्यादी नाटके प्रसिद्ध.

प्रस्तावना :

‘सर्वात्मका शिवसुंदरा’ ही प्रार्थना कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. या प्रार्थनेत परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती देण्याची विनंती कवीने केली आहे.

A famous poet Kusumagraj has written the prayer Sarvatmaka Shivsundara’. In this prayer, the poet is seeking guidance from the almighty God. He is asking the Lord to bestow upon him the strength to survive in all tough, difficult situations. He is asking the God to transport him from the darkness of everyday life to enlightenment

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

भावार्थ :

सर्वात्मका शिवसुंदरा …………………….. आमुच्या ने जीवना।।
हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या शिवसुंदरा परमेश्वरा, तू आमचे वंदन स्वीकार कर. हे परमेश्वरा, तू आमच्या जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा. आमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखव.

सुमनांत तू गगनात …………………….. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ।।
हे परमेश्वरा, सुमनात म्हणजेच प्रत्येक फुलात, गगनात तूच सामावलेला आहे. तान्यांमध्ये देखील तू फुललेला म्हणजेच भरलेला, व्यापलेला आहेस. या जगामध्ये जे जे सद्धमनि वागतात त्या सर्वांमध्ये तू राहतोस. या सृष्टीमध्ये चोहीकडे तुझीच रूपे आहेत, याची मला जाणीव आहे.

श्रमतोस तू शेतामधे ……………………. तिथे तुझे पद पावना ।।
हे परमेश्वरा, शेतामध्ये त्या कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तू स्वत: मेहनत करतोस. या जगामध्ये जे जे दुःखी, कष्टी जीवनाने त्रासलेले आहेत, त्या लोकांची आसवे तू पुसतोस. म्हणजेच या सर्वांचे दुःख, त्रास तू दूर करतोस. जिथे कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझी सेवा केली जाते, तिथे तुझे पावन चरण पाहायला मिळतात. तिथे तुझे अस्तित्व जाणवते.

न्यायार्थ जे लढती रणी………………….मुनी होतोस त्यांची साधना।।
पुढे कवी सांगतात की, जे लोक अन्यायाविरुद्ध लढतात, न्यायासाठी तलवार हातात घेऊन रणांगणावर लवण्यासाठी जातात, त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये परमेश्वरा तू राहतोस. तसेच जे लोक ध्येयवेडे असतात. जे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अंधारातून (संकटातून) ही मार्ग काढतात तू त्यांच्यामध्ये दीप बनून राहतोस. त्यांच्यात आत्मविश्वास, हिंमत निर्माण करतोस. म्हणजेच ध्येय प्राप्तीचा योग्य मार्ग तू त्यांना दाखवतोस. तसेच जे ज्ञानाची लालसा मनामध्ये धरून त्याची कास धरतात, त्यासाठी तप करतात, त्यांची ज्ञानसाधना तू होतोस.

करुणाकरा करुणा तुझी ………………. नित जगवि भीतीवाना।।
कवी परमेश्वराला सांगतो, हे करुणाकरा तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्या प्रत्येक पावलाबरोबर तुझे पाऊल असेल, याची मला पक्की खात्री आहे. त्यामुळे माझ्याकडून नेहमीच सूजनत्व मणजेच नवनिर्मिती होईल. माझ्या मनात त्याविषयी कोणतीच भीती असणार नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

शब्दार्थ :

 1. ज्ञानपीठ पुरस्कार – साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार
 2. सर्वात्मका – सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असलेला जीवात्मा, परमेश्वर (the soul of all, the entire self)
 3. शिव – शंकर (God Shiva)
 4. सुंदरा – सुंदर (beautiful)
 5. स्वीकार – अंगीकार (acceptance)
 6. अभिवादन – वंदन, नमन (salutation)
 7. तिमिर – अंधार, काळोख (darkness)
 8. तेज – प्रकाश, लकाकी (brightness)
 9. प्रभु – ईश्वर, देव (God, Lord)
 10. जीवन – आयुष्य (life)
 11. सुमन – फूल (a flower)
 12. गगन – आकाश, नभ (the sky)
 13. तारा – चांदणी (star)
 14. सद्धर्म – चांगला धर्म, सदाचार (good quality, good conduct)
 15. जग – दुनिया, विश्व (the world, the universe)
 16. वसणे – राहणे, वस्ती करणे (to establish, to stay)
 17. चोहिकडे – सभोवार, सर्वत्र (everywhere, all round)
 18. रूप – आकार (form, shape)
 19. जाणीव – बोध, आकलन (consciousness, realization)
 20. मन – चित्त, अंत:करण (the mind)
 21. राबसी – राबतोस, भरपूर कष्ट करतोस (to work hard)
 22. श्रमिक – कामकरी, कष्ट करणारा (a labour, a worker)
 23. रंजले – त्रासले (to be harassed)
 24. गांजणे – त्रासून जाणे, सतावले जाणे (to be harassed)
 25. आसवे – अश्रू (tears)
 26. स्वार्थ – स्वत:चा लाभ, मतलब (selfishness)
 27. पद – पाय, पाऊल (a foot, a foot step)
 28. न्याय – नीती (justice)
 29. रण – रणभूमी, युद्धाची जागा, रणांगण (battlefield)
 30. कर – हस्त, ह्यत (hand)
 31. ध्येय – उद्दिष्ट, साध्य (a goal, an aim)
 32. तमी – तम, अंधकार काळोख (darkness)
 33. अंतरी – आतमध्ये (in interior)
 34. ज्ञान – माहिती, प्रतिती (knowledge)
 35. तपती – तपतात (experience burning, blazing, heat)
 36. मुनि – ऋषी, साधू, तपस्वी (a holy sage)
 37. साधना – तपश्चर्या (penance)
 38. करुणा – दया (compassion, mercy)
 39. भय – भीती, धास्ती (fear, fright)
 40. मार्ग – रस्ता (way)
 41. सदा – नेहमी (always)
 42. तव – तुझे (yours)
 43. पावले – पाऊले, पाय (feet)
 44. सूजनत्व – नवनिर्मिती (creation)
 45. नित – नेहमी, सदा (always, daily, everyday)
 46. जगवि – जागव (to wake up)