Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात(स्थूलवाचन)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Textbook Questions and Answers

1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:

प्रश्न 1.
केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:
गेम ड्राइव्ह
उत्तर:
जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे ‘गेम ड्राइव्ह’ करणे व जंगलातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे हे ‘थ्रिल’ असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी चार-पाच तास ‘गेम ड्राइव्ह’ करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व फोरव्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते.

त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कुठे एखादे दुर्मीळ जनावर दिसले, की तिथे पोहोचा, अशा प्रकारच्या सूचनाही देता येतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

2. टिपा लिहा:

प्रश्न 1.
केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
उत्तर : पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मीळ प्राणी दिसला, तरच तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.

जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खादय देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्कबाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत.

प्रश्न 2.
‘बिग 5’चे थोडक्यात वर्णन.
उत्तर:
सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना ‘बिग 5’ असे म्हणतात. सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.

लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळचाने झाबून ठवतो.

3. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखक नकुरू ते मसाईमारा असा मोटारीने प्रवास करीत होते. दुपारचे जेवण आटोपून ते मारा सरिना लॉजकडे जात होते. इतक्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. पाहतात तो काय, गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सारे कुटुंब समोर आले. दोन-तीन सिंहिणी नि त्यांची दहा बाळे. शेजारी एक म्हैस मरून पडली होती. चारपाच बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या.

खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि ‘मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ’ सिंहाला सांगून निघून गेली, असा जणू त्यांचा संवाद झाला असावा, असे लेखकांना वाटले. सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू ‘त्रास देऊ नकोस’ असे त्याला बजावले असावे. हा सगळा चित्तथरारक सोहळा ‘डिस्कव्हरी चॅनेल’वर पाहावा, तसा लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

प्रवासवर्णन लिहूया:

प्रवासवर्णन म्हणजे एखादया स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.

प्रश्न 1.
प्रवासवर्णन कसे लिहावे?
प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
1. प्रवासाचे ठिकाण: ठरवलेल्या ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

2. नेमके काय पाहिले: जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व इत्यादी.

3. सूक्ष्म निरीक्षण: प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण मिळते.

4. सहज संवादात्मक लेखन: प्रवासवर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.

5. संस्मरणीय प्रसंग: प्रवासाचा आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो.

प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवासवर्णन तयार होते.

‘बिग 5’ च्या सहवासात Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लेखकांनी आफ्रिकेतील ‘बिग 5’ प्राण्यांची माहिती त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह मांडली आहे. तसेच केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयी अनोखा तपशील दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. जंगलांचा फेरफटका मारणे व त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे, हे ‘थ्रिल’ असते.

2. आफ्रिकेतील जंगलांचे स्वरूप दोन प्रकारचे आहे: (1) काही ठिकाणी उंच, घनदाट झाडांचे जंगल. (2) काही ठिकाणी झुडपांचे व सुकलेल्या गवताचे जंगल. घनदाट झाडीपेक्षा झुडपांत किंवा गवतात जनावरांचा शोध घेणे सोपे असते. जंगलात फिरताना ‘चिकाटी’ व ‘नशीब’ या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

3. केनिया सफारीत रोज सकाळ-संध्याकाळ चार-पाच तासांचा ‘गेम ड्राइव्ह’ (जंगलातील भटकंती) करण्याचा कार्यक्रम होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटडोर गाड्या व फोरव्हीलर्सची व्यवस्था असते. जंगलात फिरताना या मोटारीचे छप्पर उघडण्यात येते. त्यामुळे जनावरांना जवळून पाहता येते व फोटो काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. त्यामुळे वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो; आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग होतो व जनावरांच्या ठिकाणांच्या सूचना देता येतात.

4. वासोनैरो नदीच्या काठी वसलेले ‘सरोवा साभा लॉज’ची रचना आकर्षक आहे. जणू झाडांवर उभारलेली पंचतारांकित झोपडी. वासोनैरो नदीची वैशिष्ट्ये:

 1. तिच्यात जवळजवळ सहा फूट लांबीच्या अजस्र शेकडो मगरी आहेत.
 2. दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे.
 3. आदिवासी मगरींच्या नजरा चुकवून धाडसाने नदी ओलांडतात.
 4. कधी कधी सुस्त पडलेली मगर चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते.

5. अंबरडट्स नॅशनल पार्क हे घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्क लॉजची वैशिष्ट्ये:

 1. संपूर्ण लाकडांच्या खोल्या व सभोवती पाण्याचे मोठे डबके.
 2. डबक्याजवळ प्रचंड दलदलीत खनिजयुक्त मीठ मिसळल्यामुळे जनावरे आकर्षित होतात व पाणी पिण्यासाठी येतात.
 3. लॉजच्या बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरी असल्यामुळे तिथून जनावरांचे दर्शन होते व फोटो काढता येतात.
 4. रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट.
 5. गॅलरीतला बार चोवीस तास उघडा असतो.
 6. दुर्मीळ जनावरे आली की प्रवाशांना उठवण्यासाठी बेलची व्यवस्था.

6. नकुरू तलाव व पार्क हा आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मीळ पक्ष्यांचा परिसर आहे. नकुरू तलाव व पार्कची वैशिष्ट्ये:

 1. गुलाबी रंगाच्या दीड ते दोन लाख फ्लेमिंगोंचे वास्तव्य.
 2. दुर्बिणीतून फ्लेमिंगोंच्या हालचाली, तुरुतुरु पळणे, त्यांची परेड प्रेक्षणीय असते.
 3. चव्वेचाळीस चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा नकुरू तलाव खाऱ्या पाण्याचा आहे.
 4. फ्लेमिंगो मूळचे इथले. याच्या निळ्याशार पाण्यात फ्लेमिंगो अन्न शोधतात.
 5. पक्षिप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क मोठा खजिनाच आहे.
 6. काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्कमध्ये आहेत.

7. ‘बिग 5’ म्हणजे आकाराने मोठे असलेले पाच प्राणी :

 1. सिंह
 2. लेपर्ड-चित्ता
 3. गेंडा
 4. हत्ती
 5. जंगली म्हैस.

या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणे अत्यंत कठीण असते.

8.  नकुरू तलाव ते मसाईमारा हा प्रवास लेखकांनी मोटारीने केला; कारण गवतात दुर्मीळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक होती. सरिना लॉजमध्ये जायच्या आधी लेखक व त्यांच्या साथीदारांना वनराज सिंह व त्याचे कुटुंब यांचे दर्शन घडले.

9. सिंहाची वैशिष्ट्ये:

 1. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात.
 2. सिंहीण अडचणीत असली, तरच सिंह धावून जातो. तो शिकार क्वचितच करतो.
 3. सिंह ताशी 60 किमी वेगाने पळतो. पण त्याचा स्टॅमिना खूप कमी. म्हणून 200 मीच्या टप्प्यात असलेलेच सावज पकडतो.
 4. सुमारे 30 जणांचे कुटुंब असते.
 5. सिंहाचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असते.
 6. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. तरस त्याची पिल्ले पळवतात.
 7. नैसर्गिकरीत्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा मिळत नाही; कारण तरस त्यांना खातात.
 8. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस आहे.

10. लेपर्डची वैशिष्ट्ये:

 1. लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते. मारलेले जनावर तो ओढत झाडावर चढवू शकतो.
 2. लेपर्डची शेपटी लांब असते. टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.
 3. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो.
 4. त्याची दृष्टी व श्रवणयंत्रे खूप तीक्ष्ण असतात.
 5. त्याचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते.
 6. लेपर्डच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे.

11. चित्ता व त्याची वैशिष्ट्ये:

 1. जगातील सर्वांत चपळ प्राणी. ताशी 100 किमी वेगाने पळतो.
 2. त्याचे शरीर गोंडस, लवचीक, छाती भरदार व पाय लांब असतात.
 3. शिकार करायची पद्धत वेगळी आहे. सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला चढवतो नि गुदमरून टाकून त्याला मारतो.
 4. शिकार खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो; कारण तरस आयती मिळालेली शिकार खाऊन टाकतात.

12. केनियाची अर्थव्यवस्था प्रमुख चार प्रकारच्या उत्पन्नांवर आधारित आहे:

 1. पर्यटन
 2. कॉफी
 3. चहा
 4. फुले (गुलाब). यात पर्यटन महत्त्वाचे आहे.

केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत सरकारची भूमिका: पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना पाळावयाचे नियम:

 1. मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदीच दुर्मीळ प्राणी दिसला, तर झुडपात शिरावे; पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.
 2. जनावरांच्या जवळ बोलू नये; टाळ्या वाजवू नयेत, खायला घालू नये.
 3. ‘बिग 5’च्या सभोवताली पाचपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये.
 4. जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये.
 5. नियम मोडणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्कबाहेर काढण्याचे अधिकार सरकारने रेंजर्सना दिले आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात