Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 6 टप् टप् पडती वाचतो Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती (कविता)

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 6 टप् टप् पडती Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नाची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?
उत्तर:
जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टप-टप् आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिर् भिर् तालावर जुळून येते.

प्रश्न आ.
गवत खुशीने का डुलते?
उत्तर:
कुरणावर व झाडांखाली ऊन सावलीचा खेळ सुरू असतो तेव्ह्य मध्येच जोराचा वारा येतो व त्या वाऱ्याबरोबर गवत खुशीने डुलते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

प्रश्न इ.
मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते?
उत्तर:
मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोरपिसारा हे सर्व फुलते.

प्रश्न ई.
कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?
उत्तर:
फुलांसारखे जे फुलत नाहीत. आनंदी जे राहत नाहीत, सुरात सूर मिसळून जे आनंदाने गाणे गात नाहीत अशा सगळ्यांना कवितेत खुळे म्हटले आहे.

2. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
(अ) कुरणावरती, ………………………………..
(आ) हसते धरती, ………………………………..
(इ) पाऊस, वारा, ………………………………..
उत्तर:
(अ) कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विपते जाळी
(आ) हसते धरती, फांदीवरती झोपाळा झुले!
(इ) पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले!

खेळूया शब्दांशी.

(अ) टप् टप् या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.

प्रश्न 1.
टप् टप् या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.
उत्तर:
भिरभिर, दूरदूर, झुळझुळ, लुकलुक.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

(आ) खाली दिलेल्या ‘अ’ गट व ‘ब’ गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 1

प्रश्न 1.
खाली दिलेल्या ‘अ’ गट व ‘ब’ गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 1
उत्तर:

  • हसरी – धरती
  • झुळझुळ – वारा
  • लुकलुक – तारा
  • फांदी – झोपाळा

(इ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.
उदा. मोरपिसारा – मोर, पिसारा, पिसा, सार, सारा

प्रश्न 1.
खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.
उदा. मोरपिसारा – मोर, पिसारा, पिसा, सार, सारा

  1. कुरणावरती
  2. झाडाखाली
  3. ऊनसावली
  4. फुलांसारखे

उत्तरः

  1. कुरण, वर, वरती, तीर
  2. झाड, खाली, झाली, डाली
  3. ऊन, सावली, सान, नसा
  4. फुल, सारखे, सार, रफू

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

(ई) खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेल्या विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
उदा. बरे × वाईट
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 2

प्रश्न 1.
खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेल्या विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
उदा. बरे × वाईट
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 2
उत्तर:

  • अशुभ × शुभ
  • अपयश × यश
  • उतार × चढ
  • लहान × मोठे
  • तोटा × नफा
  • दु:ख × सुख
  • बाहेर × आत

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

खेळ खेळूया.

खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्यडोंगर बनवा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 3

प्रश्न 1.
खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्यडोंगर बनवा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 3
उत्तर:
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 4

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 6 टप् टप् पडती Important Additional Questions and Answers

खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

प्रश्न 1.

  1. टप टप पडती अंगावरती …………….. फुले.
  2. येतो वारा पाह्य ……………… , गवत खुशीने डुले!
  3. हसते धरती, फांदीवरती ह्य …………….. झुले!
  4. पाऊस, वारा ……………… या गाण्यातून फुले!

उत्तरः

  1. प्राजक्ताची
  2. भरारा
  3. झोपाळा
  4. मोरपिसारा

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

एक किंवा दोन शब्दांत लिहा.

प्रश्न 1.

  1. प्राजक्ताची फुले अंगावर कशी पडत आहेत?
  2. मुलींच्या अंगावर कोणती फुले पडत आहेत?
  3. ऊन-सावलीची जाळी कोठे विणली आहे?
  4. गवत कसे बुलते?
  5. झोपाळा कोठे झुलत आहे?
  6. शहाणे कोणाला म्हटले आहे?

उत्तर:

  1. टप्टप्
  2. प्राजक्ताची
  3. कुरणावरतीव झाडांखाली
  4. खुशीने
  5. फांदीवर
  6. गावे गाणाऱ्यांना

खालील प्रश्नाची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते?
उत्तर:
मुलांना त्यांचे गाणे झुळझुळ वारा तसेच लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे वाटते.

कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
गाणे गाती तेच शहणे, ………………………………..
उत्तर:
गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे !

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

कवितेच्या पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट कग.

प्रश्न 1.
कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विणते जाळी येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने बुले!
उत्तर:
मोकळ्या मैदानावरील गवतावर तसेच झाडाखाली ऊनसावलीचा पाठशिवणीचा (ये-जा करण्याचा) खेळ चालू असतो. मध्येच जोराचा वारा येतो त्यामुळे गवत वाऱ्याच्या झुळकीने आनंदाने डुलते.

पुढील कवितेच्या आधारे पूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून बाक्ये लिहा.
(i) दूरदूर हे ………………….. वाहती, उन्ह्यत पिवळ्या पाह्य नाहती. (नदी, सूर, भाव)
(i) गाणे गाती तेच ……………….. बाकी सारे खुळे! (शह्मणे, हुशार, बरे)
उत्तर:
(i) सूर
(ii) शहाणे

खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

प्रश्न i.
धरणी हसत आहे, फांदीवर झोपाळा झुलतो आहे.
उत्तर:
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले!

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

प्रश्न ii.
गवतावर, झाडांखाली ऊनसावलीची जाळी विणलेली दिसते आहे.
उत्तर:
कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विणते जाळी

कृती 2 : आकलन कृती

खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
गाणे अमुचे ………………, गाणे अमुचे लुकलुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा …………………. !
उत्तरः
गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातून फुले!

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

खालील आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
मुलांच्या गाण्यातून फुलणाऱ्या गोष्टी
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 5

प्रश्न 2.
मुलांचे गाणे काय वाटते
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 6

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘फुलांसारखे सर्व फुला रे, सुरात मिसळूनी सूर, चला रे गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे!’ या काव्यपंक्तीतून सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
कवीने आपल्या कवितेतून प्राजक्ताच्या नाजूक फुलाचे मोहक वर्णन केले आहे. या प्राजक्ताच्या फुलांसारखे सर्वांनी फुलत रहावे, मोठे होत रहावे असे कवीला वाटते. एकमेकांच्या सुरात सूर मिसळून चालत राहण्याचा सल्ला कवी सगळ्यांना देतो. त्याच्या मते गाणे गात राहणारे शहाणे असतात. मात्र जे गाणे गात नाहीत ते खुळे ठरतात. थोडक्यात सतत गाणे म्हणत राहण्याचा, आनंदी राहण्याचा आग्रह कवी प्रस्तुत काव्यपंक्तीतून करतो.

व्याकरण व भाषाभ्यास 

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 7
उत्तर:

  • भरारा – वारा
  • प्राजक्ताची – फुले
  • दूर दूर – सूर
  • भिर् भिर् – ताल

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

प्रश्न 2.
खाली दिलेल्या रंगीत चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेले समान अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 9
उत्तर:

  • झाड – वृक्ष
  • सावली – छाया
  • फुल – सुमन
  • गाणे – गीत
  • धरती – जमीन
  • खुळे – वेडे
  • झोपाळा – झुला
  • कुरण – गवत

प्रश्न 3.
खालील शब्दांचे एकवचन व अनेकवचनाच्या जोड्या लावा व लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 10
उत्तरः

  • फुल – फुले
  • वारा – वारे
  • खुळा – खुळे
  • पिसारा – पिसारे
  • तारा – तारे
  • गाणे – गाणी

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

माहिती मिळवूया

प्रश्न 1.
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?
उत्तर:
फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये’ असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अंथोसायनीन या रंगद्रव्यांमुळे मिळतात. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रव्ये असावीत, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठराविकच असतो, तो बदलत नाही.

वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
फुलांमध्ये किती प्रकारची रंगद्रव्ये असतात?
उत्तर:
फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात.

प्रश्न 2.
अंथोसायनीन या रंगद्रव्यामुळे फुलांमध्ये कोणते रंग दिसतात?
उत्तर:
अंथोसायनीन या रंगद्रव्यामुळे फुलांमध्ये लाल, गुलाबी, निळा इत्यादी रंग दिसतात.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

वाचा

रंगीबेरंगी फुलांचे ताटवे’ पाहिले, की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत, गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. आज उमललेले फूल उक्या कोमेजून जाणार असते; पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत-बागडत राहते.ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना, की ‘मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा,खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख-समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.’

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मन प्रसन्न का होते?
उत्तरः
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन प्रसन्न होते.

प्रश्न 2.
खरा आनंद कशात दडला आहे?
उत्तर:
दुसऱ्यांना आनंद, सुख – समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.

टप् टप् पडती Summary in Marathi

पाठ परिचय:

पारिजातक किंवा प्राजक्ताचे फूल इतके नाजूक की आपल्या हळूवार स्पर्शनही कोमेजून जाणारे, उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणूनच कदाचित रात्री उमलणारे. आकाशात प्रकट झालेल्या असंख्य तारकांसारखे भासतात. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजूक आविष्कार. मोकळ्या कुरणावरती टवटवीत असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले. या फुलांचा रस, सुगंध, ताजेपणा आणि सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद कवीने कवितेतून व्यक्त केला आहे. सूर्यप्रकाशाच्या छायेखाली मध्येच वेगाने येणारा वारा, डुलणारे गवत, फुले या सर्व वातावरणामुळे आनंदित होऊन मुले गाणे गात आहेत.

‘Parijatak’ flower is so delicate that even if we touch, it gets hurted. May be it can not bear sun’s heat so it prefers to blossom at night. It looks like a star which twinkles at night. It’s a nature’s beautiful creation. It has white petals and saffron stalk. These flowers showers on green open meadows. Children who enjoys it’s essence, freshness, odur and beauty sings song. Poet has beautifully elaborated the joy and happiness of the children in cool breeze and waving grass

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

कवितेचा भावार्थः

अंगणात खेळत असताना अंगावर प्राजक्ताची फुले टप टप पडतात. त्या भिर् भिर् तालावर आमचे गाणे जुळते. खुल्या गवतावर, झाडांखाली ऊनसावलीचे सुंदर जाळे विणले आहे. भरार वाहणाऱ्या वाऱ्यावर गवत आनंदाने डोलत आहे. भिरभिरत्या तालावरील गाण्याचे सूर पिवळ्याधम्म ऊन्हात न्हात आहेत, लांबवर वाहत जात आहेत. सगळी धरती सुमधुर हसत आहे व फांदीवरती झोका झुलत आहे.. आमचे गाणे झुळझुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे आहे. या गाण्यातून पाऊस बरसतो, वारा वाहतो व सुंदर मोरपिसारा फुलतो. कवी म्हणतात, फुलासारखे तुम्ही सर्व फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चालत रहा. जे गाणे गातात तीच शाणी मुले असतात व जी मुले गात नाही ती खुळी असतात.

शब्दार्थ :

  1. अंग – शरीर – body
  2. प्राजक्त – पारिजातकाचे फूल – Parijatak
  3. फूल – कुसुम, पुष्प – flower
  4. ताल – ठेका – rhythm
  5. कुरण – गाय, शेळी इ. ना चरण्यासाठी राखून ठेवलेला भूभाग – a meadow
  6. झाड – वृक्ष – tree
  7. ऊन – सूर्यप्रकाश – sunshine
  8. सावली – – छाया – ashade
  9. विणणे – गुंफणे – to weave
  10. जाळी – झरोका – a little window
  11. वारा – वात – wind
  12. भरारा – वेगाने येणारा – rushing violently
  13. गवत – तृण – grass
  14. खुशीने – आनंदाने – happily
  15. हुले – डोलणे – to nod
  16. फांदी – शाखा, डहाळी – a branch
  17. झोपाळा – झुला, हिंदोळा – a swing
  18. लुकलुक – झळाळी, टवटवी – bright freshness
  19. पाऊस – वर्षा – rain
  20. सूर – मधुर ध्वनी, स्वर – a tune
  21. खुळे – वेडे, असमंजस (Absurd)
  22. रंगद्रव्ये – depigmentation
  23. आनुवंशिक – वंशपरंपरेने चालणारे (hereditary)
  24. ताटवे – एकत्रित फुललेली फुले (bunch of flowers)
  25. क्षणभंगुर – चंचल, तात्पुरते (transitory)

वाकाचार :

  1. खुशीने डुलणे – आनंदाने इकडे तिकडे वावरणे
  2. सूर मिसळणे – सूर एकत्र होणे